चाळ

चाळीचं आपल एक वेगळंच वैशिष्ट्य असतं.कधी हशा तर कधी भांडण तंटा तर कधी भजन कीर्तन, उत्सवांच उत्सव, नाच गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम हे ते चालूच असतं. एकत्रितपणे रसमिसळून राहणं ..हे चाळीतल्या लोकांच एक मुख्य वैशिष्ट्य. अनेकानेक घडामोडी इथे दिवसभर घडत असतात.तसा मी सुद्धा चाळीतच राहतो नि आज आमच्या चाळीत एकच मोठाच हशा पिकला. त्याच काय झालं. […]

Marathi Lekh | मराठी लेख | लग्न

फोनवरच काय ते आमचं परस्पर बोलणं झालं आणि मी लगेचच होकार देऊन टाकला.इतक्या झटपट मी होकार देईन असं वाटलं सुद्धा न्हवतं त्यावेळेस,पण काय कुणास कसं ? म्हणून मी होकार दिला. हे मलाच काही कळेना..एव्हाना वडीलधाऱ्या माझ्या भावाने, पुढची बोलणी करण्याकरिता सुरवात देखील केली होती.मी मात्र आपल्याच त्याच विचाराच्या गुंगीत गर्क होतो . ना अजून मी […]

आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..

कित्येक दिवस जागलेल्या वा पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चक्काचूर व्हावा असे हि क्षण येतात आयुष्यात..तेंव्हा आपण आपले कुठे असतो ? नसतोच कुठेही, आपण पुरते कोलमडलो, तुटतो आतून..तीळतीळ.. मुरलेल्या त्या जखमा, ते सारे क्षण ..पुन्हा उफाळून येतात वर, अंग अंग त्यानं थथरलं जातं. ओघळत्या आसवांचा जलाभिषेक होत जातो.गहऱ्या विचारांची एकच धारा वाहू लागते.हे असं का ?अपेक्षांचं भार […]

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..

कधीतरी कुठेशी वाचनात आलेल्या त्या ओळी पटकन ओठी स्थिरावल्या. खुद से ज्यादा संभालकर रखता हूं मोबाइल अपना, क्योंकि रिश्ते सारे अब इसी मै कैद है ।

आज कामाचा इतका काही ताण न्हवता.मोकळा असा वेळ मिळाल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून काहीतरी वाचावे म्हणून प्रतिलिपी वर गेलो. तिथल्या मोजक्या अश्या कथा वाचण्यात इतका दंग झालो कि त्यातच सहा कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. ऑफिस मधून निघायची वेळ ती. पटापटा आवरतं घेतलं. कॉम्पुटर बंद केला. डेक्सवरच्या फाईल्स, ड्राइंग्स जागच्या जागी ठेवल्या. आणि अंधेरीकडे […]

प्यार हमें किस मोड पे ले आया.. | Pyaar Hamen Kis Mod Pe Le Aaya

प्यार हमें किस मोड पे ले आया.. | Pyaar Hamen Kis Mod Pe Le Aaya आपण कधी,  कसे आणि कुठल्या मूड मध्ये जाऊ ना  ह्याचा खरंच काही नेम नाही ओ..आपल्या ह्या बहुरंगी आणि बहुढंगी मनाची अवस्था हि सतत बदलतचं असते. क्षणारूपे, क्षणासंगे..ना ना रंग रूप धारण करत. त्यामुळेच कधी कुठे हास्यचा नुसताचं खळखळाट होतो तर […]

इतकंच सांगायचंय..

इतकंच सांगायचंय..

इतकंच सांगायचंय.. कसं असतं ना..आपण कुणाच्या मनात किती जागा व्यापून आहोत, ह्याचा अचूक पट कधीच नाही रे मांडता येत. हवं तर एक अंदाज तेवढा घेता येतो. तेही केवळ आपल्या समाधानासाठी, पण तो ही कितपत खरा आणि खोटा ? ह्याचा अचूक दावा देता येत नाही. हा..पण एक अंदाजाने घेतलेला तो विचार मात्र नात्यात फूट आणू शकतो. […]

त्या बसल्या जागेवर..| Marathi Lekh | Marathi Article

त्या बसल्या जागेवर | Marathi Lekh | Marathi Article

त्या बसल्या जागेवर | Marathi Lekh | Marathi Article  झाडांना ही स्पर्शाची जाणीव होते का ?मनात विचारांची कोंडी सुरू झाली आणि मोबाईलवर चुलबुल करत फिरणारे हात, तसेच मागे घेत. उठून उभा राहिलो. मोबाईलचा नेट बंद करून, चार्जिंगला लावत ठेवला. आणि सरळ…पायात चपलांची जोडी घालत, झप झप पाऊलानिशी, शेत बांधावरच्या आंबाच्या झाडाखाली येऊन बसलो. मोकळं उघडं […]

नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं प्रेम हे… प्रेम फक्त ‘आपलेपणाचं’ जाणतं अन म्ह्णूनच हृदयाशी पडणारे घाव कितीही गहिरे असले ना, तरी ते आपलेपणानेच प्रत्येक गोष्ट स्वीकरतं जातं. हे ‘स्वीकारणं’ म्हणजे काही हतबलता नाही हा..ती प्रेमातली अन नात्यातली सर्वात मोठी जबाबदारी आहे. जी तुझ्या माझ्या नात्यातला सुसंवादीपणा आणि आपलेपणा टिकवून ठेवते. मी म्हणूनच तर म्हणतोय ना, तू फक्त […]

सिग्नल | Signal

सिग्नल | Signal इथे साईबाबा मंदिर कुठे आहे ओ ?माझी दुचाकी रस्त्याकडेला घेत, तिथे उभ्या असलेल्या एका गृहस्थाला मी विचारलं.त्याने माझ्याकडे पाहून, गोंधळलेल्या मनस्थितीसारखं ..अ sssअsss करत, हे काय पुढे.. सिग्नल क्रॉस केलं कि तिथेच.. अच्छा.. ठीक आहे. मी थँक्स असं म्हणायला जावंच तर त्याने आपला सूर पुन्हा ओढला.नीट जा..सिग्नल क्रॉस करताना..गाड्या बघा, थांबा पहा..आणि […]

जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar

On the Way of Life

जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar शालेय जीवनात,  वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं हाती बॅग वगैरे घेऊन  टापटीप होत ऑफिसला निघायचं आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं. ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?कसलंच कुठे बंधन […]