’ती’ एक ग्रेट भेट…

‘ती‘ एक ग्रेट भेट मला आयुष्यात फक्त भरभरूनं प्रेम हवं होतं, संकेत… तेच मिळालं नाही. क्षणभर स्मित करून , कुठल्याश्या भावगर्दीत ती पुन्हा गढून गेली.  मी मात्र एकटक तिच्याकडे पाहत राहिलो. मनातील दबलेल्या त्या भावना उघडकरताना  तिच्या डोळ्यातून आसवं तरळून येत होती. गोठलेल्या त्या जुन्या जखमां, आज पुन्हा नव्याने पाझरू लागल्या होत्या. त्याचा दाह , त्या मनास  सलत  होता.  त्यास  कारण अन निमित्त मात्रआज मी ठरलो होतो. एक मित्र म्हणून, मैत्रीतला विश्वास म्हणून , तिचं अनुभव विश्व ,जीवनपट  माझ्यासमोर उलगडलं   जात होतं . ती बोलत होती, नजरेच्याआसवांतून ,  काळजाच्या  दुखिव वेदनेतून अन मी ते सर्व कानी घेत होतो. हळुवार .. संकेत , हसावं लागतं बघ, जीवनासोबत ह्या  चालायचं झाल्यास.. अगदी म्हणायचं तर लहानपणापासूनच संघर्ष सुरु आहे माझा ह्या  जीवनाशी… आधी स्वतःच्या शिक्षणासाठी  संघर्ष ,  मग घरातील व्यक्तींच्या आनंदासाठी आणि मग प्रेम ….. ते हि आलं खरं जीवनात , पण सुखानं  नांदलं नाही. ज्याच्या सोबतीनं  मी आयुष्याची विविध रंगीन स्वप्नं  पहिली. एकत्रित सहवासाने स्वप्नं रंगिवली . त्यानेच  ऐनवेळी न सांगता , विविहबद्ध होतं , माझ्या स्वप्नांची आशाच मावळून दिली. मला एकाकी करून सोडलं.  खूप रडले होते रे मी तेंव्हा ,…

Continue Reading →