सहयाद्री

वेड आपुले सह्याद्री !  नभा नभातुनी,दऱ्या खोऱ्यांतुनीगर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांनासाद घालूनीपुलकित होतो सह्याद्री !गड किल्ल्यांचारत्नमनी तोअभिमान आपुला सह्याद्री !शिवरायांचे, पराक्रमांचेगुणगान गातो हा सह्याद्री !मनी उभरतो,उरी फडकतो ,शक्तिस्थळ अपुलासह्याद्री !मना मनातुनीनाद घुमतेशान आपुला सह्याद्री !कणखर,रौद्र रुप त्याचेगौरवशाली सह्याद्री !महाराष्ट्राचा मुकुटमनी तो,वेड आपुले सह्याद्री !– संकेत पाटेकर वेड आपुले सह्याद्री !

जवळ जवळ पाच सहा वर्षाच्या.. मोठ्या अश्या गॅप नंतर , कर्जत पासून जवळच ठामपणे उभा असलेला उत्तुंग असा पेठचा किल्ला म्हणजेच कोथळीगड, ह्या किल्ल्याला भेट देण्याचं भाग्य , मला पुन्हा एकदा मिळालं. म्हणजेच ते नव्यानं जुळुन घेता आलं.   माझे मित्र, बंधू आणि माझ्या भाच्यांमुळे…  तसं रानवाटा सोबत , काही वर्षांपूर्वी इथं येणं झालं होतंच. …

पेठ / कोथळी गड : पावसाळी जत्रा Read More »