Still i am waiting…

माझ्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम कश्याला , असा सारासार विचार धरून तू चाललेस हे ठाऊक आहे  गं मला , 
पण सखे असा विचार करून चालणे कितपत योग्य आहे.? कुठलीही वाट गवसण्यासाठी आधी एक पाऊल पुढे टाकण गरजेचं असत न्हाई ?  ते पाऊलंच भीतीने पुढे टाकलं नाही तर पुढचा मार्ग मिळेलच कसा ?
तू तो पाऊल तर उचल..
लाईफ मध्ये अगं एकमेकांना समजून घेणं हे जास्त महत्वाच असतं. आणि तितकंच गरजेचं हि  ,
एक कमी पडला कि दुसरा , दुसरा कमी पडला कि आपणहुन पुढे सरायचं , एकजुटीने प्रयत्न करायचं ह्यालाच तर संसार म्हणतात ना?संसाराची व्याख्या इतकी  साधी सोपी आहे.
पण अगं असा कुणी विचारच करत नाही. आपलाच अहंभाव आपल्या नात्याच्या आड येतो. अन तुटतात अन दुःखावली जातात मनं..त्यास कारणीभूत आपणच.. 
तुला एक सांगू , म्हणजे तुला माहित्ये  ?
अधिकाधिक संसार वा ह्या नाती गोती का उध्वस्त  होतात ते?
मनातलं सांगतच नाही कुणी,? दाबून ठेवतात सर्व , आतल्या आत…
आपल्याला काय हवं काय नाही, हे अगं बोलल्याशिवाय उघड कसं होणार ?
एक अंदाज बांधता येतो चला, मानलं ठिकायं, पण सगळ्याच गोष्टी,  ज्या खरंच गरजेच्या आहेत , त्या सांगितल्याशिवाय वा बोलल्याशिवाय,  नाही कळून येत रे, भावनेला हि कधी कधी संवादाचा हळुवार स्पर्श हवा असतो . तेंव्हा त्या मनमोकल्याने उमलून येतात . संवाद तेच काम करत . म्हणून तर तो हवा असतो.  जिथे संवाद नाही, जिथे समंजसपणा नाही, तिथे नातं तग धरून राहत  नाही.
माझं तुझ्यावर प्रेम आहे रे . . खरं तर हि शब्दात  सांगण्यासारखी  गोष्ट नाही. ती सहवासातून आपोआप उमलून येते.   कळते .   पण तरीही मला सांगावं लागतं.  कारण तू पळतेयस .  दुरं सारते आहेस मला , तुझ्यावाचून ..
आणि  हे तुला हि चांगलं ठाऊक आहे.
माझ्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम कश्याला, असा विचार तू मनात आणू नकोस.
अंग एकमेकांच्या साहाय्याशिवाय , समजुतीशिवाय आणि प्रेमाशिवाय कुठलंही नातं नाही. संसाराची व्याख्या म्हणून तर मी दिलेय .
दोष उणिवा प्रत्येकात असतात . आणि तसे गुणही असतात . आपण गुणांच्या बाजूने पाहावं .
पाहशील ना ? हो म्हणतंय बघ, मन माझं …,

तुझ्यावाचून खरं  तर  दुसऱ्या कुणाचाही विचार माझ्या मनात नाही . दर्पणा प्रमाणे प्रतिबिंबित होऊन तू नजरेशी खेळत असतेस सदा…. हृदयात प्रेम संगीताचं वलय निर्माण करत ……..
बघ विचार कर  ..
Still i am waiting….…….. तुझी वाट पाहतोय .
तुझाच…
Xxxxxxx
हृदया – एक स्वप्न सखी
– संकेत पाटेकर
०४.०१.२०१७ 

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »