Recent Posts


प्रेम हे..
अहंभाव
अनमोल
यशाची पायरी
आठवणी
मन
प्रेम हे..

प्रेमाचं ‘स्वरूप’ जरी तेच असलं तरी ..प्रत्येक ‘Love Story’ हि वेगळी असते . –  संकेत

अहंभाव

‘अहंभाव’ हा नात्यातला एक फार मोठा ‘अडसर’ आहे . तो मध्ये आला कि दोन मनांमधली झुळझुळनारी  सुसंवादी कवाडं ..आपोआप बंद होतात. – संकेत

अनमोल

अनमोल नातं , त्यातलं प्रेम अन आशीर्वाद हेच खरं तर  मोठं  धन असतं आयुष्यातलं…अन तेच कमवायचं असतं . -संकेत

यशाची पायरी

यशाची पायरी चढायची असेल तर अपमानाच्या निखाऱ्यातून हि चालत राहण्याची धमक , आपल्या अंगी असावी लागते.– संकेत

आठवणी

गेलेले क्षण पुन्हा परत येत नाहीत, पण ते क्षण पुन्हा नव्याने अनुभवता येतात. आठवणींच्या स्वरूपात .. – संकेत

मन

‘ नातं’ तुटत नाही , तुटतात ती ‘ मनं ‘

अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप…अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द…कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द, एक हलकसा स्पर्श…मनातला’ सारा राग क्षणात विसरून लावतं.

म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . अन नात्यांशिवाय प्रेम .

प्रेम जिथे नातं तिथे .  संकेत