Marathi Quotes on Life & Love – Part 1
- प्रेमाला मरणं नसतं, पण असह्य मरण यातना जरूर असतात .– संकेत पाटेकर
- आयुष्यात कुठलही संकट येवो , अथवा अटीतटीची परिस्थिती उद्भवो, आपल्याला हवी असलेली आपली माणसं अन त्याचं प्रेम – पाठिंबा आपल्या सोबत असेल तर त्या परिस्थितीला किंव्हा आलेल्या संकटाना हसत हसत तोंड देण्याची प्रेरक शक्ती.. आपोपाप निर्माण होते. बस्सss त्यांची साथ सोबत तेवढी हवी. – संकेत पाटेकर
आपुलकीचा, प्रेमाने ओतपोत असा कोणतेही शब्द..मग तो ‘ Dear’ असो Love u असो वा ‘मूर्ख’ असो…. ते शब्द अंतर्मुख करून जातात. जिव्हाळा निर्माण करतात अन नेहमीच हवेसे वाटतात. आपल्या प्रिय जनांकडून .. – संकेत पाटेकर
- प्रेमाचं स्वरूप सेम असतं. इथून तिथून कसही, फक्त नाती, त्यानुसार व्यक्ती अन त्यानुसा कथा बदलत जाते तितकंच .. – संकेत पाटेकर
समजण्याइतपतं समजुददारपणा जर सगळ्यात असता तर मनाशी विणल्या गेलेल्या नात्यातील माधुर्यता हि कायम तशीच राहिली असती. मधाळ हास्य रंगांची चौफेर उधळण करत .. पण अस होत कुठे ? एक सावरणार तोच दुसरा अधिक दूर होत जात जातो . प्रेमाच्या चौकटी पासून अगदीच दूर.. आपले एकजुटीचे प्रयत्न हि असे अश्यावेळेस निष्फळ ठरतात. पण मनातलि सैरभैर करणारी ओढ नि आस मात्र कणभर हि कमी होत नाही. – संकेत पाटेकर
Marathi Quotes on Life & Love – Part 1
नाती अन त्यातील व्यक्ती, त्याच्यातील निरागसपणा , हास्यपणा , खोडकरपणा , गोडवा , रंगत संगत, एकजूटपणा जशेच्या तसं बांधून ठेवण्याची कसब आपल्या अंगी असावी लागते. अन्यथा दूर क्षितिजाशी मावळतीला झुकणार्या तेजो भास्करा सारखी आपली काही माणसं हि एकदिवस हळूच दिसिनाशी होतात. – संकेत पाटेकर
आयुष्याचा शेवट हा कसा अन कधी होईल ते सांगता येत नाही. म्हणून जीवनातला हर एक क्षण आपल्या प्रियजना सोबत त्यांच्या सहवासातला असा जगावा ..कि आपल्या असण्या नसण्यात हि त्यांच्या चेहर्यावर आपल्या एखाद्या आठवणीने किंव्हा नुसत्या नावाने सुद्धा हासू अन आसू एकत्रित उमटू येतील.– संकेत पाटेकर
आपल्यातले ‘ दुर्गुण’ लोकांना दाखवून देण्याची गरज भासत नाही ते लोकांना आपोआप कळत. पण आपल्यातले ‘ कलागुण’ लोकाना दाखवूनच द्यावे लागतात. तेंव्हाच त्यानां ते कळतात. नजरेस येतात. – संकेत पाटेकर
कळत नकळत मनाला योग्य तो आकार उकार देणारी आपलीच माणसं असतात . प्रसंगी घडवतात, प्रसंगी बिघडवतात हि , एक वेळ निसर्गावर जीव ओतावा पण कुणा मनावर नाही, तो कधी फसवेल, कधी रडवेल हे सांगता येत नाही. निसर्गाच मात्र तसं नसत . मनमुराद हसवण अन निव्वळ आंनद देण हेच त्याला ठाऊक. अन म्हणूनच मला निसर्ग भावतो . आपलासा वाटतो, आपला म्हणवून घेणाऱ्या माणसांपेक्षा…. – संकेत य पाटेकर
जीवनात येणारी हर एक संकट दुख वेदना सहन करता येतात, पण एखाद्याचा अश्रुचा बांध तो आक्रोश सहनकरण्या पलींकडचा असतो. – संकेत पाटेकर
मनावरच्या ताणाला (असलेला ताण कमी होण्यासाठी ) आपलेपणाचाच स्पर्श लागतो. तिथे औषधांचा काहीच उपयोग होत नाही. – संकेत
कुणी रागावतं, कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं.नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली काहींकडना काही ना काही अपेक्षा हि असतेच . अन म्हणून रागावणं, रुसणं ह्या सारख्या गोष्टी अधेमधे घडत राहतात. कुणाला आपलं वागणं पटत नसतं. कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो. कुणीकडे आपला स्वभाव नडत असतो तर कुणाला प्रेमभरल्या मायेची अपेक्षा असते पण त्याची पूर्तता होत नसते, कुणाची काही औरच मागणी असते ती पुरी होत नसते. ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचं लहान मोठं भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतच . आणि ते आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतो .व्यक्तीव्यक्ती नुसार .. – संकेत य पाटेकर
गेलेले क्षण पुन्हा परत येत नाहीत, पण ते क्षण पुन्हा नव्याने अनुभवता येतात. आठवणींच्या स्वरूपात ..
– संकेत पाटेकर
आपल्याच लाडक्या व्यक्तीचा आपल्याशी झालेला पूर्वीचा संवाद (मग तो फेसबुक वरचा असो व इतर कुठला ) पुन्हा वाचताना ..’ मन ‘ त्या गोड आठवणीत नकळत वाहून जातं. मन स्वतःशीच गुणगुणत राहत.कुठे ते रम्य हसरे, आठवणीतले खेळकर दिवस ..अन कुठे आजचे हे …दिनगेलेले ते रम्य दिवस पुन्हा तर येत नाहीच हे खर ..पण ‘ आठवणी ‘ मात्र त्या दुनियेत पुन्हा पुन्हा खेचत घेऊन जातात आपल्याला . त्या क्षणांना उजाळा देत . मनात आशेची एकच ज्योत दिपवून … ‘ काश ते दिवस पुन्हा बहारावेत ‘ गेलेले ते क्षण पुन्हा यावेत पुन्हा नव्याने .. – संकेत य पाटेकर
इच्छेप्रमाणे काही गोष्टी मिळतात खर्या …पण त्या पूर्णपणे नाही. अन म्हणून तेवढ्यावर आपलं मन काही समाधानी होत नाही . त्याला अधिक हवं असत. पूर्णपणे अन म्हणून ते धडपडत. जखमी होतं तरीही उभरतं.पण काही गोष्टी सहज सोप्या कधीच नसतात . एक तर माघार घ्यावी लागते. किंव्हा मनाचा संघर्ष चालूच ठेवावा लागतो. त्या गोष्टीसाठी ती मिळेतोपर्यंत …पूर्णपणे.– संकेत य पाटेकर
Marathi Quotes on Life & Love – Part 1
- एखाद्याच्या मर्जीत असेपर्यंत , त्यांच्यानुसार वागेपर्यंत जो तो आपणास जवळ करतो. प्रेमाने बोलतो चालतो ऐकतो..आपली सोबत करतो. पण एकदा का त्यांच्या मर्जी पलीकडे गेलो कि लोक स्वताहून आपल्याला दूर सारतात . धारदार शब्दांच प्रमाणपत्र आपल्या मनी उमटवून … – संकेत पाटेकर
एखाद्यावरचा राग हा कितीही गडद अन तप्त असला तरी हि काही दिवसाने तो हळू हळू का होईना निवळतोच. तो कायमस्वरूपी असा कधीच नसतो. – संकेत पाटेकर
माणसाच्या गर्दीला हि माणूस कधी काळी कंटाळतो, नकोसं वाटतं सार त्याला.. ना कोणाची जवळीक ना कुणाचं हवं असलेलं प्रेम. नको हवी असते स्तुती नि कौतुकाची थाप हि …अशावेळेस हवा असतो तो फक्त ‘एकांत’ कधी मनात उद्भवलेल्या असंख्य प्रश्नांचा निरासन करण्यसाठी.. तर कधी सार काही विसरून मनाला एक तजेला देण्यासाठी , अशावेळेस मन भरकटतं…दूर कोसा दूर …त्याची भागदौड सुरु होते. अन कटाक्ष नजरेनी सारया दिशा धुंडाळत ते एका जागी विसावतं.
जिथे ते विसावतं तिथे असतो तो सृष्टीचा अद्भुत चमत्कार , त्याचं ते अलंकारित वैभव..मनाला तारणारं , मनी असलेल्या सारया दुख विवंचनांना क्षणात दूर करणारं..
आईच्या उबदार कुशीत कसलीही चिंता न करता लेकरू ने शांतपणे निजावं ना ..असंच काहीसंरोज त्याच त्याच जीवनशैली पासून कुठेतरी दूर निघावं , शांतपणे एका ठिकाणी विसावं जिथे मिळेल एकांत …असा एक विचार स्पर्शून जातो कधी ना कधी…तेंव्हा आपल मन हि कळत नकळत तिथपर्यंत, आपल्याला घेऊन हि जातं …कधी कल्पनाच्या दुनियेतून ..तर कधी प्रत्यक्ष वर्तमानातून ..!
एकांत मिळविण्यासाठी…स्वतःसाठी स्वतःच्या गती साठी ..! – संकेत पाटेकर
‘नातं’ तुटत नाही , तुटतात ती ‘ मनं’ अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द…कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द, एक हलकसा स्पर्श…मनातला’ सारा राग क्षणात विसरून लावतं. म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . अन नात्यांशिवाय प्रेम . प्रेम जिथे नातं तिथे .– संकेत य पाटेकर
दोन प्रकारची लोकं असतात :-एक आपल्या हयातीत , आपल्या सोबत असणारी ,कौतुकाची थाप हळूच आपल्या पाठीशी घालणारी… आपल्या चुका दाखवून वेळोवेळी योग्य तो मार्गदर्शन करणारी अन आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी अन दुसरी आपल्या हयातीत आपलं साथ न देणारी. साऱ्या गोष्टी दुरूनच पाहणारी आपल्या पश्चात आपल्या बद्दलच्या त्यांच्या मनी असलेल्या भावना जगभर सांगणारी . – संकेत पाटेकर
हव्या त्या गोष्टी हव्या त्या वेळेस मिळतातच असे नाही. काही वेळा आपल्या मनाची समजूत हि घालवी लागते . – संकेत पाटेकर
आपले छंद , आवड नि आपले विचार …आपल्याला अनेक चांगले मित्र जोडून देतात. – संकेत पाटेकर
Marathi Quotes on Life & Love – Part 1
म्हणतात कि आपण जितकं प्रेम देऊ त्याहीपेक्षा अधिकतेने आपणास परत ते मिळत आणि ते खर हि आहे. पण हे हि इतकंच खर कि ते आपल्या अपेक्षप्रमाणे जिथून हव असत. जिथून मिळाव अस मनोमनी वाटत असतं तिथून सहसा मिळत नाही .त्याचे मार्ग काही वेळा बदलतात. – संकेत य पाटेकर
- कोणतेही नातं असो …ते अनमोल असत. कोणत्याही कारणासाठी कृपया ते अनमोल नातं तोडू नका. – संकेत पाटेकर
- एक अनमोल नातं जपण्यासाठी स्वताहावर किती बंधनं घालावी लागतात ते आपलं आपणच जाणतो समोरील व्यक्ती ते समजू शकत नाही. ते समजलच तर ते उत्तमच ..- संकेत पाटेकर
- मनात खूप राग असतो. पण समोरच्यावर, त्याच्या भावना न दुखावता कसा व्यक्त करायचं तेच काही वेळा कळत नाही. – संकेत पाटेकर
- बोलताना विचार करून बोलावे असं आपण म्हणतो खरे ….पण प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. कधी कधी शब्द हे वेगवान वाहना सारखे सरकन निघून जातात ते कळत हि नाही. कळतं तेंव्हा वेळ पुढे गेलेली असते . – संकेत पाटेकर
- आपल्या मनातील दुखालां कुणीतरी भागीदार नेहमीच हवा असतो . – संकेत पाटेकर
- एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण दु:ख मनात साठवून ठेवू शकतो. दु:खाच ओझं जस जस वाढत जातं तस तस मग मनाची ‘दु:ख’ पेलण्याची क्षमता हि कमी कमी होत जाते. आणि मग नंतर काय तर ” विस्फोट ” ठरलेला. – संकेत पाटेकर
- गेलेलं ते दिवस, ते क्षण पुन्हा परतुनी येतात. पण वेगळ्या स्वरूपात .. वेळ जशी बदलते, तशी वेळेसोबत परिस्थिती हि बदलते . पण उशिरा का होईना . हवे असलेले ते दिवस पुन्हा बहरतात. – संकेत पाटेकर
- एक नातं जपण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते, ते त्या नात्याचं महत्व अन त्याची किंमत कळल्याशिवाय कळून येत नाही. – संकेत पाटेकर
- काही गोष्टींकरिता कधी कधी स्व:ताहाच्या स्वभावात सुद्धा बदल घडवावा लागतो. पण ते बदल घडवणं कठीणं असतं. – संकेत पाटेकर
- मनातली ती एक ओढ असेपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात असतो …ती ओढ संपताच प्रेम हि हळू हळू ओसरत जातं. कमी होत जातं. पण खर प्रेम ह्यावूनी वेगळ असतं. ते तुटत नाही ना तोडता येत नाही. – संकेत पाटेकर
- कुणाच्या मनाशी खेळणं अन त्याच्या आयुष्यातं दखल देणं …ह्याचा मला काहीही हक्क नाही. हक्क असेलच तर तो माझ्या मनावर. – संकेत पाटेकर
- एखादी जिवलग व्यक्ती जेंव्हा बरेच दिवसाने आपणास भेटते, बोलते. त्यावेळेसचा तो आनंद काही औरच असतो …..तो शब्दात व्यक्त करता येत नाही . – संकेत पाटेकर
- कुणी सोबत असो वा नसो …हि पुस्तकं नेहमीच साथ करतात. कधी हसवतात – कधी मोकळेपणानं रडवतात देखील .कधी विचार करण्यास भाग पाडतात. कधी अनमोल शिकवण देतात. अन आपल्यातला एकटेपणही दूर करतात. – संकेत पाटेकर
कोणताही नातं असो ”विश्वास” महत्वाचा …!!– संकेत पाटेकर
Marathi Quotes on Life & Love – Part 1
- नाती अनेक जुळविता येतात , पण त्या जुळलेल्या नात्या मध्ये आपलेपणा नांदत असेल तरच त्या नात्याला अर्थ निर्माण होतो . – संकेत पाटेकर
- कुणी सोबत असो वा नसो …हि पुस्तकं नेहमीच साथ करतात. कधी हसवतात – कधी मोकळेपणानं रडवतात देखील .कधी विचार करण्यास भाग पाडतात. कधी अनमोल शिकवण देतात. अन आपल्यातला एकटेपणही दूर करतात. – संकेत पाटेकर
- म्हणतात , प्रेमाने जग जिंकता येतं , पण मला जग जिंकायचं नाही.
आपल्या माणसाच ‘ मन ‘ जिंकायचं आहे , भले आज मी त्यात हरलो , अपयशी झालो .
ह्या घडीला मला त्यांचं मन नाही जिंकता आलं , पण एक ना एक दिवस माझा येइलच .
तेंव्हा त्यांना अभिमान हि असेल .
स्वतःचा अन स्वतःबरोबर माझा हि , तेवढी मी खात्री देतो . – संकेत य. पाटेकर
Marathi Quotes on Life & Love – Part 1
मानवी मनासारखा तो कधी भावनेशी खेळत नाही .
अन म्हणून मन दुखावण्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही . अन म्हणून कधी कधी वाटतं ‘ विवधरंगी जड- अवजड मनाची हि नाती ‘ जपण्यापेक्षा निसर्गाच्या उबदार मायेने भरलेल्या कुशीत शांत पडून रहावं. त्याच्याशीच मनमोकळेपणाने काय तो संवाद साधावा .
तृप्त नजरेने निसर्गाच्या विवध घटकांकडे नुसतंच पाहत राहावं.
अन त्यातून उतू जाणारा आनंद घटका घटकाने गिळंकृत करावा .
बस्स.. – संकेत य पाटेकर

- Trekking & Hikking
- Camera’s & Accessories
- Antique Home Decor Products
- Book store