Marathi Quotes on Life & Love – Part 2

माझं हे असं आहे . जे क्षण वाट्याला येतील त्या त्या क्षणात आकंठ घुसळून निघायचं . 
मग तो क्षणभरचा आनंद असो …वा वेदनांचा साठलेला महा सागर ….लोटून द्यायचं स्वतःला…जगायचं ते एक एक क्षण..!
– संकेत पाटेकर  
एकाकी अस शांत राहून, सारी मनाची कवाडं बंद करून  सगळेच प्रश्न काही सुटत नाहीत.  उलट काहीवेळा .. त्यातलं ते अंतर वाढत जाऊन असलेल्या त्या प्रश्नांचाच गुंता अधिकाधिक वाढत जातो. अन त्या गुंत्यात आपण अधिकाधिक ओढले जातो. म्हणून ..वेळीच विचार कर ..अंतर वाढवू देऊ नकोस, असलेला गुंता सोडव, मोकळी हो ..मोकळा श्वास घे.. – संकेत पाटेकर  
कुणावर प्रेम करायचं तर …अगदी मनापासून करा. आतल्या कंठानं,  स्वतःला झोकावून देऊन अगदी.. – संकेत पाटेकर  
‘अहंभाव’ हा नात्यातला एक फार मोठा ‘अडसर’ आहे. तो मध्ये आला कि दोन मनांमधली झुळझुळनारी  सुसंवादी कवाडं ..आपोआप बंद होतात.  – संकेत पाटेकर  
भीती, लाज (लोक काय म्हणतील ) अन ढासळलेला आत्मविश्वास, काळाच्या पडद्या आड नेउन ठेवतात . – संकेत पाटेकर  
नुसता समजुददारपणा असून नात्याला बहर येत नाही. तर त्यासाठी (खेळकरपणा)खेळकर अन खोडसर वृत्ती हि हवीच .  – संकेत पाटेकर  

Marathi Quotes on Life & Love – Part 2

हव्या त्या सगळ्याच गोष्टी काही मिळत नाही आपल्याला ..  तो हि( ईश्वर )  एकदाच काही देत नाही. 
मग ती म्हणायला एखादी वस्तू असो वा  हवी असलेली व्यक्ती  वा त्या व्यक्तीच आपलेपणाचं प्रेम वा  नातं वा इतर काही ..
काही गोष्टींचा शोध हा घ्यावाच  लागतो. किंव्हा  आपल्या नकळत  तो शोध एका टप्प्यावर  पुरा होतो.  
मला वाटतं  तिथेच  पूर्णत्वेला खरा विराम मिळतो.  मन समाधानी पावतं.  
– संकेत पाटेकर  
दोघांचं मन जुळवणारा  अन नात्याची नाळ प्रेमाने जोडणारा एक ‘समान’ धागा हा असतोच ..
दोघांच्याही स्वभावामध्ये , 
बाकी इतर गुण अथवा दोष कितीही भिन्न असो ..हा एक समान धागा नातं अन मन बांधून ठेवतो. 
– संकेत पाटेकर  
 
अनमोल नातं, त्यातलं प्रेम अन आशीर्वाद हेच खरं तर मोठ धन असतं आयुष्यातलं… 
अन तेच कमवायचं असतं . – संकेत पाटेकर  
आयुष्यातील बरेसचे निणर्य हे ‘हो किंव्हा नाही’ ह्या दोनच गोष्टींवर अवलंबून असतात आणि असे हे निर्णय घेणं  अथवा देणं म्हणजे महां कठीण काम ..
कारण ह्या दोन गोष्टींवरच आपल्या आयुष्याची पुढची चाल ठरली जाते. 
ती चाल योग्य दिशेने ठरली तर आनंदच आनंद, नाही तर क्लेश, वेदना ह्याचा महापूर ..नाहीतर काहीच नाही..
भावनेचा अन दोघा मनाचा खेळ आहे हा…
फारच जपून, समजून उमगून निर्णय घ्यावा लागतो . कारण सहभाग दुसर्या मनाचा हि असतो.
असे निर्णय घेताना ..
मनाचा सयंमीपणा अन काठीन्यता ह्याची खरच कस लागते .. 
– संकेत पाटेकर  
घाव देणाऱ्या वेदना सहन करण्याची किंव्हा ते पचवण्याची  मानसिक शक्ती  ज्याकडे असते . 
त्यानेच एखाद्यावर प्रेम करावं.  जीवापाड अगदी..ते हि  आंधळेपणानं केले तरी चालेल. 
कारण तेच  खर खुर प्रेम असत .अगदी आतून उमगलेलं , समजलेलं… समजून घेतलेलं. 
नाहीतर उगाच प्रेम प्रेम करणारे बरेच दिसतात . त्यांचीच कुठेशी बातमी येते अधून मधून वर्तमानपत्रातून .. 
प्रेम होत म्हणून ..तिचा जीव घेतला.   वैगरे वगैरे..ह्याला प्रेम म्हणतात का ?  छेsss अजिबात नाही. म्हणताच येणार नाही. 
कारण प्रेमाची व्याख्याच ‘जीवन’ आहे. 
प्रेम जगायला शिकवतं. प्रेम जगण  शिकवतं . ( भले हि त्यात वेदनेचे घाव असो )
एखाद्याच जीव घेणे नाही. 
 – संकेत पाटेकर  
वेळ निघून जाते. ती  थांबत नाही कधी..
पण आपल्या स्वप्नांचा ओझा मात्र दिवसेंदिवस वाढतच जातो. त्यात अधिकाधिक  भर पडत जाते दिवसेंदिवस ..
त्यातल्या काहीच  गोष्टी साध्य होतात काही गोष्टी होत नाही . कारण हा वेळ अपुरा पडतो. 
आयुष्य हे असंच…अवघ्या मोजता येणाऱ्या क्षणा सारखा वाटतो कधी कधी …. आणि आहेच  ते . 
– संकेत पाटेकर  
‘माणूस’ आतून अन बाहेरून ज्याला पूर्णतः कळला त्याला खऱ्या अर्थाने तो ‘माणूस’ कळला …
अस म्हणायला हरकत नाही . 
– संकेत पाटेकर  
ज्या नात्यात आपल्या असण्याला (एकमेकांना ) ‘महत्व अन किंमत’ असते. त्या नात्यातले भेटीचे अथवा  सहवासातले एक एक  क्षण देखील लाखमोलाचे असतात. अन ज्या नात्यात , जिथे आपल्या असण्यालाच  काही किंमत नसते.  ते  नातं हिरमुसल्या कळीसारखं असतं  . जिथे फुलणं म्हणजे  काय तेच माहित नसतं. – संकेत पाटेकर  
यशाची पायरी चढायची असेल तर अपमानाच्या निखाऱ्यातून हि चालत राहण्याची धमक आपल्या अंगी असावी लागते.
– संकेत पाटेकर  
एखादं कादंबरी वाचताना एकेक पानं जशी उलगडत जावीत. 
अन नेमकेपणाची काही वाक्यच काय ती अधोरेखित व्हावीत. स्मृतीत कायम राहावीत.
तशी काही माणसं असतात ..आपल्या आयुष्यात येणारी..अन कायम स्मरणारी .. 
– संकेत पाटेकर  
गोंधलेलं मनं बहुदा रागाच्या बाजूनेच झुकतं . 
— संकेत पाटेकर  
कधी कधी ( बऱ्याचदा ओ ) ह्या मनाची दोलायमान स्थिती होते. अर्ध मन इकडे तर अर्ध मन तिकडे. 
अश्या वेळी नेमक काय करायचं तेच सुचत नाही. अन जेंव्हा अशी स्थिती निर्माण होते, 
तेंव्हा हि ‘वेळ’ निमुटपणे तिच्या पद्धतीने तीच कार्य साधून घेते. – संकेत पाटेकर  
संवादात आपलेपणा अन मोकळेपणा असेल तर अन तरच तो ‘संवाद’ समोरच्या मनाला स्पर्श करितो. . 
– संकेत पाटेकर  
काही मोजकीच अशी ‘घरं’ असतात अन त्या घरातील आपलेपणाने जोडलेली गेलेली मनमिळाऊ अन प्रेमळ ‘माणसं’ जिथे आपलं येणं जाणं सतत चालू असत. 
– संकेत पाटेकर  
प्रेमं हे सहवासातून मिळत जातं अन हळू हळू (त्या त्या व्यक्ती च्या स्वभावानुसार वाढत जातं. 
इतकं कि कधी कधी त्यावर आंधळेपनाची पट्टी नकळत बसली जाते.
अन मग काय, पुढे व्ह्यायचं तेच होतं. ठेच लागते. कळवळतं मनं , चाचपडतो आपण ..
आधार शोधतो , मिळतो का कुठे ? नाही…नाही मिळत आधार , कुणीच नसतं तिथे .
 
आपण दाट अंधारल्या जागी पोचलो असतो .
जिथे एकटेच असतो ..अगदी एकटे..वेदनेने अश्रू ढासळत.
अश्रूंनाही थोपवणार कुणीच नसतं तिथे…सावरतो आपण, मनाची एक निश्चय करत.  
पडतो बाहेर कसेतरी, एक एक पाऊल हळूहळू मागे घेत, पुन्हा चाचपडतच …, प्रकाशाचा मागोवा घेत.
 
येतो एकदाचं बाहेर…तेंव्हा आंधळेपानाची ती पट्टी हि गळून पडते.एक शिकवण मिळते त्यातून ..
प्रेमं …., प्रेमालाही मर्यादा आहेत.एका ठराविक स्थितीपर्यंत ते फुलतं …बहरतं, अन दरवळतं .
पण त्याही पुढे गेलात …कि संपल. मग वेदनेची किनार लागते.
पण तिथपर्यंत कुणी जावूच नये..
सहज सूचल अन लिहलं.. 
-संकेत पाटेकर  
सहज सोपं असतं सगळ रेss
फक्त आपल्याला हवं त्याच हवं तसं प्रेम मिळणं किंवा ते मिळविणं हेच काय ते कठीण.. – संकेत पाटेकर 
सहज सोपं असतं सगळ रेss
फक्त आपल्याला हवं त्याच हवं तसं प्रेम मिळणं किंवा ते मिळविणं हेच काय ते कठीण.. – संकेत पाटेकर 
प्रत्येकाच्या अंगी एखादी कला किंव्हा एखाद अस गुण असतोच ज्याच्या बळावर आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी कमवू शकतो . अन दाखवून देऊ शकतो ..
ज्या लोकांना ज्या लोकांनी आजपर्यंत कायम आपलं नुसतं हसच केलेय .  
– संकेत पाटेकर  
आज पर्यंत एक गोष्ट अनुभवलेय ..
एखादी चांगली गोष्ट अथवा कृती जी आपल्या हातून घडते .,, घडली जाते . 
तेंव्हा त्याकडे सहसा कुणाच लक्ष जात नाही . अन गेलेच तर ते थोड उशिराच…
पण एखादी वेगळ्या वळणाची गोष्ट किन्ह्वा कृती हातून घडली… .कि कुणास ठाऊक लोकांच्या नजरा अन वेचक शब्द एकाच वेळी आपल्यावर उधळले जातात .
– संकेत पाटेकर  

Marathi Quotes on Life & Love – Part 2

काही गोष्टी हळूच सोडून द्याव्या लागतात.  
आपण कितीही प्रयत्नांची पराकाष्टा केली तरी निदान त्या वेळेत तरी त्या आपल्याश्या करता येत नाही .
 एखाद वस्तू जशी कितीही धुंन्डाळता वेळेत मिळेनाशी होते तसंच काहीसं .  
पण गंमत म्हणजे ती वस्तू आपल्या नकळत .कधी, कुठे, तरी मिळून जातेच. 
तेंव्हा ते मिळाल्याच समाधान मात्र आपल्या चेहऱ्यावर काहीस असतच . 
शिरा का होईना मिळाली ना , हे समाधान ..
काही गोष्टी अश्याच वेळेत मिळत नाही.  कितीही धडपड करून, निदान तरी त्या सोडाव्या लागतात. 
पण वेळेनंतर हि कधी नकळत त्या स्वताहून आपल्या स्वाधीन होतील अन होतीलच. 
ह्यातच मनाला गुंतवत ठेवावं लागतं. बस्स…  
– संकेत य पाटेकर
ह्या आयुष्याच्या प्रवास वाटेवर , आपल्या लोकांच प्रेमं अन आशीर्वाद मिळनं अन ते कायम तसंच राहणं (आपल्या शेवटपर्यंत ) ह्यासारखी मौल्यवान गोष्ट जगात इतर कुठलीच नाही.
ज्याला ते मिळालं तो खरंच सर्वात श्रीमंत माणूस ……
– संकेत पाटेकर  
ळ निघून गेल्यावरही, न मिळणाऱ्या काही गोष्टींच, समाधान ‘ते मिळाल्यावरही ‘ असतच . फक्त त्याची मात्रा थोडी अधिक प्रमाणात कुठे कमी होते तितकंच ..
प्रेमाचं हि अगदी तसंच आहे…
– संकेत पाटेकर  
Marathi Quotes on Life & Love - Part 2
5/5

मनातले काही →  वाचा 

Quotes, Marathi Quotes, Life Quotes, Quotes आणि बरंच काही

‘येवा कोकण आपलोच असा”

‘येवा कोकण आपलोच असा’

Malhargad
गड  - किल्ले , तटबंदी- बुरुज ...चेहरे - मोहरे , सृष्टी सौन्दर्य आदी,  इत्यादी . क्षणांचा खजिना 

Trekking & Hiking- Kharedibazar

Kharedibazar | Online Store |

  • Trekking & Hikking 
  • Camera’s & Accessories
  • Antique Home Decor Products 
  • Book store

Leave a Comment

Your email address will not be published.