फोनवरच काय ते आमचं परस्पर बोलणं झालं आणि मी लगेचच होकार देऊन टाकला.
इतक्या झटपट मी होकार देईन असं वाटलं सुद्धा न्हवतं त्यावेळेस,
पण काय कुणास कसं ? म्हणून मी होकार दिला.
हे मलाच काही कळेना..
एव्हाना वडीलधाऱ्या माझ्या भावाने, पुढची बोलणी करण्याकरिता सुरवात देखील केली होती.
मी मात्र आपल्याच त्याच विचाराच्या गुंगीत गर्क होतो .
ना अजून मी तिला कधी प्रत्यक्ष भेटलो, ना कधी एक क्षण बोललो तिच्याशी,
फक्त तिचा फोटो काय तो पहिला आणि बस्स लगेच होकार देऊन टाकला. ते हि फोन वर ..
मलाच माझ्यावर विश्वास बसेना …मी हे असं केलं ?
कोण ती ? कुठे राहते ? काय करते ?
ना मनाची भेट, ना प्रत्यक्ष भेट, आयुष्य सोबत काढायचं आहे, तिच्यासोबत .
मग तिचा फक्त फोटो पाहून मी होकार कसा दिला ?
तिचं मन जाणलं नाही, तिचा स्वभाव जाणून घेतला नाही, तिचं ..तिच्या लग्ना बद्दलच आणि माझ्याबद्दलच मत जाणून घेतलं नाही. माझं तिच्याबद्दलच काय मत आहे, हे हि तिला सांगितल नाही .
काय केलं हे मी..
‘हो’ तर म्हटलं, पण आता माघार कशी काय घ्यायची ?
दिलेला तो शब्द पुन्हा मागे कसा घ्यायचा ? ह्या चिंतेने डोकं अगदी ठणठणायला लागलं.
दोन दिवसातच हळदीचा कार्यक्रम उरकणार होता.
इतक्या लवकर ..इतक्या झटपट हे सगळं उरकलं होतं कि कळण्यास काही मार्ग न्हवता.
त्यातच हळदीचा कार्यक्रमाचा दिवस हि उजाडला, पाहुणे मंडळी आप्तजण दारी येऊ लागली. घर आनंदाने ढवळून गेलं. लगभग. धावपळ वाढू लागली.
मी मात्र अजूनही त्याच चिंतेत गर्क होतो. कशासच भान न्हवतं. आयुष्याचा हा जो प्रश्न उभा राहिला होता. माझ्यासमोर…
जिच्याशी अजून गाठ भेट नाही, ना कधी (प्रत्यक्ष )बोललो नाही.
त्या व्यक्तीशी असं.. न भेटता थेट लग्न..
ते हि इतक्या झटपट
विचारांचं चक्र हे सुरूच होतं.
डोकं त्यामुळे पुन्हा ठणठणायला लागलं.
तेंव्हा एक हात अलगद डोक्यावर ठेवला अन हलक्या हाताने स्वतःचच डोकं चेपू लागलो.
नजर इकडे तिकडे फिरून पहिली. तर कुणीच दिसेना.
कुठे गेले हे सगळे..? डोकं जड होत होतं.
खिडकीतून अंधुक प्रकाश डोळ्यावर येत होता. नीटसं पुन्हा एकदा पाहिलं.
कुणीच नाही. हे असं कसं…? आत्ता तर सगळे इथेच होते ?
पुन्हा एकदा नजर फिरवली.
तेंव्हा कुठे कळलं..
यार… हे तर स्वप्नं होतं !
हाहाहाहा
मी स्वतः वरच हसू लागलो आणि मग निवांत झोपी गेलो. काही क्षणासाठी ….
काही स्वप्नं हि अशीच…
त्यांची एक छाप आपल्या मनावर ठेवून जातात .
ती विसरता येत नाही. त्या दिवसापुरतं किंव्हा काहीवेळा आयुष्यभर हि …..
पण त्यातून नक्की काय बोध घ्यायचा ? बोध घ्यावा कि घेऊ नये ? हे कळण्यास मार्ग नसतो.
त्यात एक काल्पनिकता असते . म्हणून तो विषय तिथेच संपवावा लागतो.
कारण खरी स्वप्नं हि उघड्या डोळ्यांनीच पाहायची असतात. ती पूर्ण होण्यासाठी..
असंच लिहिता लिहिता ..
– संकेत पाटेकर