Made For Each Other |लग्नाचे दोन महिने पूर्ण

म्हणता म्हणता आमच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाली. Made for each other म्हणत
सहज- सुंदर आणि मनमोकळ्या हास्य आनंदात दिवस सर्रssकन कसे निघून गेले ते कळलेच नाही.
( येणारे दिवस, वर्ष असेच आनंदाच्या अत्तरीय सुगंधात दरवळतील ..ह्यात शंका नाही. )

काळजी घेणारे..
काळजी करणारे आपले हक्काचे – मायेचे होतेच.
पण अजून एक हक्काचं अगदीच जवळचं, मनाला सांभाळणारं, आवाज देणारं, जवळ करणारं, जपणारं आपलं कुणी तरी आलं. ह्याने आनंद आणिक द्विगुणित झाला.

जोडीदार हवा तसा लाभला की संसार ही सुखाचा होतो असं म्हणतात.
त्यात आम्ही एकमेकांसाठी भाग्यवान म्हणतो..

‘मनभर प्रेम आणि क्षणभर राग रुसवा’ धरून चाललं
की संसाराची गाडी ही सुरळीत चालू राहते. हे नव्याने नव्या संसाराचा हा रथ ओढताना कळून आलं.
अजून बऱ्याच गोष्टी कळायच्या आहेत…ते कळतीलच.. 😉
तर असो,
सहयाद्रीच्या कुशीत…त्याच्याच आशिर्वादात..
मैत्रीच्या धाग्यातून, मनातून मनाशी जुळलेली ही रेशीम गाठ… हास्य आनंदाच्या मैफिलीत अशीच स्वैर करत राहो.
लग्नाचे दोन महिने पूर्ण
२७ नोव्हेंबर २०२० ◆ २७ जानेवारी २०२१

 – संकेत पाटेकर

Made for each other | लग्नाचे दोन महिने पूर्ण

Made for each other

धन्यवाद

⇐  माझे इतर लेख  ⇒

On the Way of Life

जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar

जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar शालेय जीवनात,  वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं हाती बॅग वगैरे घेऊन  टापटीप होत ऑफिसला निघायचं आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं. ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?कसलंच कुठे बंधन […]Read More

प्रिय आई..

प्रिय आई..

‘प्रिय आई’ साष्टांग दंडवत, आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने तुला पत्र लिहावयास घेतोय. रागावू नको हं .. तशी तू रागावणार नाहीस हे मला माहित आहे. कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां ?मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने […]Read More

Unboxed & Refurbished Mobiles

Shop for unboxed &  refurbished mobiles from top brands such as OneplusSamsungMiNokia & more.

Leave a Reply

Your email address will not be published.