हा अमर्याद असा विस्तारलेला निळाभोर आकाश अन त्यावर ना- ना विविध चित्रमय आकाराने नटाटलेली हि शुभ्रधवल गालिचं (पांढुरके ढग ) पाहून मनोमनं वाटतं, कधी टुणूक टुणूक आपणही इकडून तिकडून उड्या घेत सर्वत्र हिंदडावं तर कधी  ती शाल पांढीरकी हळूच अंगा खांद्याशी लपेटून घेत निवांत पहुडावं.  

कधी कल्पनेचे गरुडपंख लावून ह्या भूतलाचे विहिन्ग्मय दृश्य डोळ्यात साठवून घेत मनास तृप्त करावं तर कधी बरसणाऱ्या त्या पावसाच्या सरींमध्ये..त्या उनाड वेड्या वाऱ्यासंगे मुक्तपणे विहार करावं.
कधी अवचित फुलणाऱ्या त्या इंद्रधनु सोबत आपणाहून रंगाची मुक्तहस्ते उधळण करावी तर कुठे स्वर गायनाचे सुरेल गीत गात पक्षी पाखरांसंगे आपणही लयबद्ध सोबत करावी.
ह्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातुनी धो धो कोसळणारा जल प्रपातांचा तो अविष्कार अगदी जवळून न्याहाळावा तर त्या टपोऱ्या थेंबे थेंबाचा शिडकावा अंगा खांद्याशी शीरशिरून घ्यावा. 
असंच काहीस मनातलं…
 – संकेत पाटेकर

Life Quotes In Marathi by Sanket Patekar

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

‘ प्रेम अवघा एकच शब्द ‘

प्रेम पाहायला गेलं तर  अवघा एकच शब्द पण त्या शब्दात हि  किती भव्यता आणि विशालता दडलेय.

प्रत्येकजण आपआपल्या आयुष्यात प्रेम मिळावं म्हणून किती धडपडत असतो. तळमळत असतो. रडकुंडीस देखील येतो. कारण प्रेम हे जीवन आहे. जगण्याची एक कला आहे. शक्ती आहे. प्रेरणा आहे.

जीवनात सर्वांनाच प्रेम मिळत नाही. सर्वांच्या भाग्यात ते नसतं. कुणी वंचित राहतो आईच्या प्रेमापासून, कुणी वंचित असतो बहिणीच्या मायेपासून, तिच्या प्रेमळ सहवासापासून, कुणी वंचित राहतो वडिलांच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ छायेपासून, कुणी वंचित राहतो भावाच्या खेळकरखोडकर आणि प्रेमळ सहवासापासून..

प्रेम प्रेम असतं. सर्वांनाच ते हवं असतं. नशिबात मात्र कुणाच्या ते असतं तर कधी नसतं. दु: त्याचच तर फार असतं.

संकेत पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

”साद – प्रतिसाद”

नाते संबंधात अधिक जवळीकता आणणारे हे दोन शब्द.
नात्यातला गोडवा जशाचा तसा ठेवणारे हे दोन शब्द. खूप मोल आहे ह्या दोन शब्दांना. आपल्या सादेला जोपर्यंत समोरच्याचा प्रतिसाद मिळत राहतो तोपर्यंत सर्व काही ठीक असतं पण समोरून प्रतिसाद मिळनच बंद झालं तर साद देण्याचा उपयोग तरी काय ?
मन निराशेच्या छायेखाली अशा वेळी वाहतं, वाहत राहतं अन मग नात्यातली ती अतूट गाठ हळू हळू सैल होऊ लागते. एखाद्या इको पोईन्ट असेल तर तिथे आपण गळा काढून एखादी हाक मारतो. जोरात ओरडतो कुणाच्या तरी नावाने किंवा कसेही पण ओरडतो, का ? तर आपलाच ध्वनी ..प्रतीध्वनिच्या स्वरूपात ..आपल्यास पुन्हा येऊन मिळतो.  तेंव्हा आनंदाला सीमा उरत नाही आपण अधिक उत्साहाने,  आनंदाने पुन्हा पुन्हा साद घालतो.
नात्यात सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्ही नात्यातील कोणत्याही व्यक्तीला ..तिला, तिच्या सादेला प्रतिसाद दिला नाही तर त्या व्यक्तीचा तुम्हावरील विश्वास हळू हळू कमी होत जाईल आणि नात्यात एक दूरत्व निर्माण होईल. 

.नात्यात ..साद – प्रतिसाद,  विश्वासाला खूप मोठी किंमत आहे. 
त्यानेच नातं बहरतं ..नव्या उमेदीत,  नव्या उत्साहात, सुख दुखाच्या खळखळत्या प्रवाहात..एकरूपाने, एकजुटीने ! 

संकेत पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

आयुष्यं हे असंच असतं..

एका ठराविक अंतरापर्यंत एका क्षणापर्यंत.. एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण न बोलता…न भेटता एखादयापासून दूर राहू शकतो.  पण ती ठराविक रूपरेखा ओलांडली कि मनाचा विस्फोट झालाच समजा, 
मन मग मागे पुढे पाहत नाही. आपण स्वतहून पुढे सरसावतो अन बोलू लागतो समोरील व्यक्तीशी..

काही वेळा प्रश्न सुटतो पण काही वेळा प्रश्न इथूनच पुढे सुरु होतो.
आपलं ‘मन’ पुन्हा शोध घेऊ पाहतो हव्या त्या प्रश्नाच्या त्या उत्तराचं..

उत्तर तर मिळत नाही. पण स्वतःशीच पाठ थोपावतं स्वतःलाच दोष देत मन शांत राहतं. शांत राहण्याचा तसा पुन्हा प्रयत्न करतं .कारण ..आयुष्यं हे असंच असत. 

जगायचं असतं जगू द्यायचं असतं..संयमानंक्षणाशीझुंजायचं असतं. 

संकेत पाटेकर

Life Quotes In Marathi By Sanket Patekar

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

असंच लिहिता लिहिता..

वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना तसेच काहीसे हेक्षणअसतात आपल्या आयुष्यातले..
हळुवार  कधी  कुठून  गुपचूप  संधी साधून येतात अन तना  मनात रोमांच फुलवून जातातमनी आसुसलेल्या अपेक्षांची हि  पूर्तता  होवूनी जाते मग, सुखावून जातो अगदी त्या क्षणात आपण, सुखाची एक व्याख्या तयार होते हळूहळू ..
आनंदाच्या  परमोच्च शिखरावर ताठ मानेने.. अभिमामाने आपण विराजमान होतो.
बेन्धुंद होतो बेभान होतो अगदी…पण हे सगळं क्षणभर  ..क्षणभरच सगळं..
वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच  असते नाही का
पुन्हा ती कधी कुठून कशी येईल त्याचा  नेम नाही …पण तोर्पयंत असंच, असंच  चालत राहायचं. असंच  चालत राहायचं. पण आपलं हे  मनं  ऐकेल  तेंव्हा..ते एकच हेका घेऊन बसतं. 
जे हवं आहे ते कायम स्वरूपी …क्षणभरासाठी नको..

इथूनच  मग सुरु होते.. मनाच्या वेदनेची कथा..

असंच लिहिता लिहिता
संकेत पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत..

कल्पना नाही करता येत रेssss  कोण किती आपल्यावर प्रेम करतं ते..पण तू स्वतःवर विश्वास ठेव.
कुणीचं आपलं नाही आपलेपणानं प्रेम करणार नाही. आपलं मन जपणार नाही अश्या गैरसमजात तू वाहू नकोस आणि उगाच असा भावाकुल हि होऊ नकोस. जगत जा तू आपल्या परीने मुक्त बेभान वाऱ्यासारखा, उधाणलेल्या शुभ्र फेसाळ लाटांसारखा, रिमझिम टपटपनाऱ्या हळुवार सरींसारखा,  तेजोमय दीप वलयासारखा आणि कधी स्थिर काठिण्य स्तंभासारखा हि..

मनाचं आभाळ मात्र उघड करतं, सारं काही सामाऊन घेतं,  श्वासाचं गणित मांडत आणि प्रेम विषयाची जुळवणी आणि हात मिळवणी करत..
जीवनाचे विविध रंग भर तू ..कलाकुसरीने..
बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत त्याने …
कळतंय ??
संकेत पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

हो..कदाचित 

माहित नाही.. का, कसं ?  एकाकी मन दाटून येतं. अवचित अश्या कुठल्या क्षणी  कुठल्याश्या गडद  असह्य भावनेनं ..कसल्याश्या अनामिक ओढीनं..कुठल्याश्या जाणिवेनं वा तीव्र आठवणीने..भाव व्याकुळ होतं ते..

गर्द अंधारल्या डोहात स्वतःला झोकावून देत काही कळत नाही का ? का ते ? कुठे लक्ष लागत नाही. कुणाशी बोलवत नाही.

कुणी बोललं तरी त्यात आपलेपणा वाटत नाही. एकटेपणातच ते स्वतःला गुंतवून घेतं. स्वतःलाच त्रास देत राहतं.  असह्य होतं हे सगळं,  का असं होतं ? कुणी हवं असतं का त्याला ?

आपल्या मनातलं गुंज ऐकून घेणारं कुणी ? आपल्या मनाला थोपवून क्षणांशी संगत करणारं कुणी ?

आपल्यात रमणारं, आपल्यात विसावणारं,

सर्वस्वी आपलं होंऊन आपलं होऊन जगणारं कुणी ?

कुणी हवं असतं का ? 

होssss हो..कदाचित 

– संकेत पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

अपेक्षांचं लहान मोठं भार..

कुणी रागावतं कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं. नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली समोरच्याकडनं  काही ना काही अपेक्षा हि असतेच. अन म्हणून रागावणं, रुसणं  ह्या सारख्या गोष्टी घडतच असतात. 

कुणाला आपलं वागणं पटत नसतं.  कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो. कुणीकडे आपला स्वभाव नडत असतो तर कुणाला प्रेमभरल्या मायेची अपेक्षा असते. पण त्याची पूर्तता होत नसते, कुणाची काही औरच मागणी असते ती पुरी होत नसते.  ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचं लहान मोठं भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतच असतं आणि ते आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा कशोशीने  प्रयत्न करत असतो व्यक्तीव्यक्ती नुसार ..

 – संकेत य पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

म्हणून बोलावं मनमोकळेपणाने..

मनात जे असेल ते बोलून टाकावं एकदाचं …मनात काही ठेवू नये.  व्हायचा त्रास तो होऊ देss एकमेकांना, 
जो काही व्हायचा तो एकदाच पण त्याची पुन्हा पुन्हा उजळणी नको.  तेच.. तेच अन  तेच तेच…मनाला तोच तोच विचार करण्यास भाग पाडून अस खिचपत पडण्यापेक्षा ..बोलावं..मन मोकळेपणानं..

त्यातून काहीतरी मार्ग निघेल. हव्या असलेल्या प्रश्नाच उत्तर तरी मिळेल.पण असं एकटक शांत राहून .. एकमेकांशी न बोलताच …मनातल्या मनात प्रश्नांची जर उजळणी करत राहिलो.

तर एक एक दिवस …हे जगणं फार अवघड होउन जाईल. 
अश्याने त्रासा शिवाय इतर काही गवसणार नाही. इतर कुठल्याच गोष्टीत मन रमणार नाही.  आहे ते प्रश्न सुटणार नाही. त्याचं उत्तर मिळणार नाही.  म्हणूनच तो येऊ देsss एकदाचं …व्हायचा तो त्रास होऊ ते एकदाच.  

तो काही क्षणासाठीच असेल. 
पण कदाचित प्रश्नाचं उत्तर मिळेल. पुढचं जीवन सुखरूप होईल. 
आपलं मन हलक होईल. म्हणून बोलावं मनमोकळेपणाने..

– संकेत य पाटेकर

Life Quotes in Marathi | Sanket Patekar

‘आठवणी’ फोटोतल्या

ह्या फोटोंच बर असतं. ते कधी पहा..कुठे हि पहात्यातले चेहरे बदलत नाही. चेहऱ्यावरचे हाव भाव बदलत नाही. त्या व्यक्ती बदलत नाही
जे आहे ते आहे वर्षानुवर्ष तसंच ..बदल अजिबात नाही.

म्हणून ते पाहताना गेलेले क्षण पुन्हा तसेच्या तशे नजरे समोर येतात.
अन आपण त्या हसऱ्या आठवणीत आपलं भान हरपून घेतो. मन स्वतःशीच प्रश्नोत्तराच खेळ खेळू लागतो.

किती हसरे क्षण होते ना ते ? किती सोनेरी दिवस होते ? काश ते दिवस ते क्षण पुन्हा बहरून आले तरपण ह्या जर अन तर च्या गोष्टी कारण आपण वेळेसोबत पुढे आलेलो असतो.
काल बदलला असतो. परिस्थिती बदलेली असते. व्यक्ती व्यक्ती बदलेल्या असतात. पण आठवणी ह्या अश्याच अजूनही ताज्या टवटवीत.
मनाला प्रसन्न्तेचा लेप देत असतात.
संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.