Let’s Enjoy..

Let's Enjoy..

जगताना कधी कधी नित्य नेहमीतलं काहीतरी हरवल्यासारखं जाणवत राहतं.
मनाची स्थिर घडी कुठेतरी अस्थिर झाल्यासारखी होत राहते.

कळत असतं नेमकं काय खुपतय, काय असह्य होतंय..आपल्याला,
पण उघडपणे बोलता येत नाही आणि टाळू म्हटलं तरी टाळता येत नाही.

कारण प्रश्न नात्याचा असतो.
नात्यातल्या त्या हळव्या हसऱ्या आणि आनंदी मनाचा असतो.
बांधलेल्या कित्येक स्वप्नांचा असतो. अगणित पुढच्या क्षणांचा असतो.

त्यामुळे नात्याला कुठेही तडा जाऊ नये, ते दुखावलं जाऊ नये.
ह्याची मन काळजी घेत राहतं. तसं प्रयत्न करतं ..

स्वतःलाच बजावत ...

'संयम ठेव रे बाबा, उगाच अस्थिर होऊ नकोस.
प्रश्नाच्या जाळ्यात अजिबात फसू नकोस ?
हे अविचारांचं जाळं आधी क्षणात मिटवून टाक.
निश्चिंत राहा. मन आभाळी ठेव.

येणारी योग्य वेळच तुला सारं काही मिळवून देईल.

Lets Enjoy this Moment...
क्षणांचा महोत्सव करता आला पाहिजे.
कळतंय ना ?

- संकेत पाटेकर
Leave a Comment

Your email address will not be published.