आय लव्ह यु टू ..( I love you too..)
आय लव्ह यु टू ..( I love you too..)
दाटून आलेल्या कृष्णमेघासारखी त्याची अवस्था झाली होती.
बैचेनी लगभगिनं वाढली होती, क्षणभरातच….म्ह्णूनच बरसायचं होतं त्याला,
सगळं मनातलं वाहून देत..बोलायचं होतं तिच्याशी.. व्हायचं होतं मोकळं आणि मनानं हलकं हलकं.. पण धीर होतं नव्हतं .
म्हणायला तसं बोलणं सुरुच होतं. मगासपासुन दोघात हि , झाले असतील आता काही एक मिनिटं त्यालाही , पण हवं ते मनातलं ओठाशी येत न्हवतं.
घेर घेतलेल्या भावनांना योग्य तो न्याय मिळत न्हवता . हवे ते शब्द फुटत न्हवते.
‘ कसं बोलू रे , कसं बोलावं ? तेच उमगत न्हवतं .
”गप्पा बसा रे तुम्ही ” .नाही बोलता येणार मला आज..
सांगितलं ना एकदा , पुन्हा पुन्हा तेच ..तेच ?
मनाचं मनाशीच थोपटनं आणि दटावनं सुरु झालं.
तसा खूप जीव आहे तिच्यावर ,तिच्या हसऱ्या प्रेमळ स्वभावावर , तिच्या कलागुणांवर..
म्हणूनच वाटतं राहत, तिच्या सहवासातच राहावं कायम, पण नाही.
नाही तसं होऊ शकत . नियतीचे तसे संकेतच आहेत म्हणा,
आणि ह्या नियतीने आखलेल्या रेषेपुढे मला पुढे व्हायचं नाही आहे . मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत. त्या पुढे मी होणार नाही.
पण तरीही..
मनातलं सांगायला कुठं काय आड आलंय ?
बोलू शकतो ना आपण ?
मोकळं होऊ शकतो ना आपण?
आणि तसंही बोलतोच आहोत तिच्याशी.. नित्य नेहमीप्रमाणे आजही , बघ ना ?
हि मैत्रीचं तेवढी घट्ट आहे.
हे नातंच तेवढं अनमोल आहे. पण एवढं असूनही अधोरेखित केलेले भाव आज ओठाशी का येत नाही ? त्यानेच अस्वस्थता वाढलेय, हि हुरहूर वाढलेय .
शेवटी कसेबसे स्वतःला सांभाळून आणि उतू जणाऱ्या भावनांना आत दडवून , त्याने तिला व्हाट्सअप केलं .चल उशीर झालाय , झोपायची वेळ झाली. आपण उद्या बोलू .
ओके , ठीकाय…( तिचा रिप्लाय)
हं..
गुड नाईट ..
गुड नाईट …
(क्षणभराची शांतात पसरली गेली आणि ..आणि नंतर मग तिनेच व्हाट्सअप केलं )
”आय लव्ह यू….”
क्षण सेकंदा भरातच , नकळत त्याचे डोळे पाणावले गेले.
श्वास आनंदाने खुलला गेला .
अवघ्या काही क्षणातच …तिच्या आलेल्या ह्या शब्दसागराने , त्याच मन अगदी लाटांगात झालं .
नेमकं आपल्या मनातलं बोलून ती मोकळी झाली .
हेच तर हवं होतं ना , त्यानेच तर हुरहुरलो होतो , तेच तर बोलायचं होतं. पण तीच बोलून मोकळी झाली.
”आय लव्ह यु टू डिअर … आय लव्ह यु टू…”
तिने हसत हसत रिप्लाय दिला. आणि रात्र स्वप्नील रंगात न्हाहून गेली.
कधी कधी न बोलताच समोरच्याला आपल्या मनातलं कळून जातं. मनालाच मनाचे संकेत मिळून जातात. आणि मन आभाळ होऊन जातं .
तेंव्हा मिळणारा आनंद हा कैक पटीनं वेगळा असतो , भारलेला, उत्साहलेला असतो आणि त्यातून मिळणारा समाधान हि ….वेगळाच असा , है ना ?
– सहजच भाव पंक्तीतून उमटलेलं..
संकेत पाटेकर