‘संवाद’ हरवलेलं नातं …

खूप काही लिहावसं वाटतंय आज ? कारण हे मनं  फारच अस्वस्थ झालंय .
हळवं झालंय ते   ‘कारण ‘संवाद’  हरवला आहे.
बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला  ‘संवाद’
कुठे दिसला का हो तुम्हाला तो ?
नाही ? नाही ना…?
कुठेसा  निघून गेला आहे बघा, दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर,

कसं शोधावं  आणि कसं परत आणावं बरं त्याला  ? काही काही कळेना.
तुम्ही सांगू शकाल का ?
नाही ? असो,
आयुष्याची सगळी बहारच निघून गेली आहे आता,
सगळे रंगच जणू  धुसर झालेत,   रखरखत्या  उन्हासारखं अगदी,

कालपटलेलं जगणं  झालंय हे.

नाही राहवत आता..
तू हवा आहेस रे , खरचं  तू  हवा आहेस.
तुझ्याविना  ह्या नात्याला गंध नाही. आपलेपणाचा स्वर  नाही कि सूर  नाही. चैतन्याचा बहार  नाही .

मनमुराद मनमोकळ्या हास्य रंगाची  ती मुक्त उधळण  हरवलेय रे..तुझ्याविना..
कुठे आहेस तू , कुठे आहेस ?
सांगशील का ? बोल ना काहीतरी..
येशील  माघारी, येशील परत,  ? बघ नाराज  नको होऊ असा ..

मला हवा आहेस  रे….हवा आहेस तू…
मनाचं असं पुटपुटणं सुरु होतं . शब्द सख्यांची कागदावर रीघ लागली होती.
भाऊक होवून ते हि आज स्वतःला त्यावर झोकु देत होते.इतकं वर्ष जीवापाड जपलेल्या नात्यातील रसिकता,  नांत्यातला तो मधाळ गोडवा  , एकाकी कुठे  आणि कसा हरपला कुणास ठाऊक?  मनं अगदी त्यानं सैरभैर झालंय. अस्वस्थ होवून बसलंय आणि होणारच ना ओ ,

जीवापाड जपलेल्या नात्यातला, आपलेपणानं  मिश्र असलेला गोड संवादच कुठेसा हरपला ,  म्हणजे मन असंच सैरभैर होणार , नाही का ? .घुटमळणारचं ते , मनातल्या मनात…

किती विश्वासाने नाती जोडतो आपण ? कितीशी स्वप्नं बघतो . त्यात  हरखून जातो अगदी..

पण एकाकी…

विश्वासाची हि घट्ट  नाती , आपलेपणाची  साथ अशी कशी काय सोडतात, कळत नाही ?

त्याचा घाव मात्र झेलावा लागतो . ह्या इथे…. हृदयी…

असो,
खूप काही विचार केला ह्या गोष्टीचा,  रात्रंदिवस अगदी..

मी चुकलो का कुठे ? ते हि शोधून पाहिलं. कित्येक प्रश्नाचा संच पुढे मांडला .
तेंव्हा कुठे उत्तर  आलं समोरून …

तू कुठेच चुकत नाहीस रे , परिस्थितीनेच  मला बदललय. 

मी अगदीच सुन्न …
परिस्थिती…?

हि परिस्थिती सुद्धा अजब असते.  खरंच  बदल घडवते माणसा- माणसात,  त्याच्या विचारांना , वेग वेगळ्या वळणावर स्वार करत स्वतःच्या निर्णयावर ठाम राहते ती…
पण हि नाती ? त्याच काय …?
आपलेपणानं  जुळलेल्या नात्यात ‘दूरत्व’ का बरं  यावं  ? ते हि ह्या अश्या क्षणभंगुर परिस्थितीमुळे  ?

आणि ह्या अश्या परिस्थितीमुळे एखाद नात्यात बदल घडू शकतो ? एवढा ?

छे …पुन्हा प्रश्न ..
 ह्याचं उत्तर अजूनही काही सापडलं नाही . कित्येक दिवस ओलांडली . वर्ष निघून गेली .

नात्यातला  ‘संवाद’च हरवला आहे. 
आता ते फक्त आणि केवळ  नातं उरलं आहे. संवाद हरवलेलं नातं .

ज्यात जाणीवाच नाही.  त्या  उरल्याच  नाहीत .
एखाद्या कोमात गेलेल्या आणि संवेदना हरवलेल्या व्यक्ती सारखंच  जणू  ..

जगण्यापुरता श्वावोश्वास  काय तो सुरु आहे. बाकी आयुष्यातील सारे रंग फिके..फिके…
ह्यास जबाबदार कोण ? मी ? समोरील व्यक्ती ? कि हि परिस्थिती  ? कि हा दोघातला स्वार्थ ?
नाही , नाही  सांगता येणार मला,  सध्यातरी…
आणि  दोष हि कुणाला द्यायचा नाही आहे.
पण हरवलेला  तो ‘संवाद’  मला पुन्हा आणायचा आहे.

नात्यातला खळखळाट कायम ठेवायचा आहे . 

हास्य विनोदाचा, भरल्या प्रेमाचा , आपलेपणाचा गोड  संवाद हवाय मला.
त्यासाठीच हि धडपड.
ऐकतेस का तू…?

मला ‘संवाद’ हवा आहे.  आपलेपणाचा, प्रेमानं साधलेला, बांधलेला ,
ऐकतेस …?
संवाद हरवलेल्या नात्याची.. एका मनाची अशी हि अवस्था…

आपलं प्रत्येकाचं आयुष्यं  असंच अनेकानेक नात्यांनी गुंफलंय.
मग ती रक्ताची नाती असतील,  आपुलकीनं जोडलेली ..मना मनाची,

त्यात आई मुलाचं नातं असेल,  बहिण भावाचं असेल,  प्रियकर प्रेयशीचं असेल  वा नवरा बायकोचं.

ह्या सर्वांना एकसंध ठेवणारा किंव्हा जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे हा  ‘संवाद’  .

नात्यातला मुख्य गाभा म्हणजे हा संवाद.
तोच  नसेल तर ह्या नात्याला हि काय अर्थ ?अर्थहीन नातं ते ?
एखाद्या पर्णगळीत वृक्षासारखं …भकासपण आलेलं..नातं .. है ना ?

नात्यातला  हिरवाशारपणा,  लक्ख उजळपणा कायम  टिकून ठेवायचं असेल तर संवाद हा हवाचं रे,

पण नुसता संवाद  काही  उपयोगाचा नाही.  सुसंवाद हवा.

हृदयातून दिलेली साद आणि  आपुलकीने म्हटलेलं  चार एक शब्द  मनाला खूप आधार देऊन जातात ओ, 
नवं काही करण्याची जिद्द अन जगण्याची  नवी उर्मी , उमेद त्या स्वरातूनच तर मिळते. अन हेच तर  हवं असतं  ना आपल्याला ?

मनमोकळेपणाचे , आपलेपणाचा गंध उमटलेले .चार एक शब्द .

त्यात मग कधी..एखाद वेळेस उफाळलेला नकटा रुसवा राग असेल , त्याने काही फरक पडत नाही. आपलेपणाचा  सूर  त्यात  असला म्हणजे काही वाटत नाही.  उलट  मनास समाधान मिळतं .

आपल्या पाठीशी कुणी उभं आहे.   आपल्यासोबत कुणी आहे.

जीवनात सर्व काही सहज सोपं आहे..(पाहिलं तर,  केलं तर )

फक्त जीवापाड जपलेली आपलेपणाची… हि अनमोल नाती आपल्यासोबत  असली म्हणजे झालं.

मग हे आयुष्यं  हि दिवाळीतल्या  रोषणाई सारखं आणि सप्तरंगी इंद्रधनू  सारखं उजळून निघेल .

पण त्यासाठी संवाद हवा आपलेपणाचा…बरोबर ना ?

तुमच्या नात्यात तो आहे ना ? असेल तर उत्तमच  , अन असू द्याच तो कायम..

गंधित दरवळता..
हि नाती खरंच अनमोल असतात ओ ..  अन हा  अनमोलपणा आणि त्यातला आपलेपणा  प्रत्येकाला जपायला हवा .
असो ,
शेवटी  मनापासून म्हणावेस वाटतं  , कि…
‘संवाद’ हरवलेलं नातं नको… ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं.

… आपलेपणानं मुरलेलं  ..!

असंच लिहता लिहिता  ,

आपलाच…
संकेत पाटेकर 

 Efinito 14 Inch Classique Wooden Wall Clock for Home/Kitchen/Living Room/Bedroom/Office – (Silent Movement, Black Frame)

Necklace Jewellery Sets with Earrings for Women Girls Latest Stylish-NL-267

Visit our site :

Leave a Reply

Your email address will not be published.