GAD KILLE

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजेच आपला सर्वांचाच लाडका बाप्पा श्री गणपती …श्री गजानन … त्याच नेमकं हे शाळेजवळ असलेलं वास्तव्य , हे स्थान… निश्चितच वेगळंपण आणणारं.. इगतपुरी तालुक्यातील …घोटीपासून अगदीच हाकेच्या अंतरावर ( जेमतेम ५-६ किमीवर ) मोरधन नावाचा किल्ला आपल्याला परिचयाचा आहे. हाच किल्ला येथील गावकऱ्यांत मात्र मोराचा डोंगर म्हणूनच मुखोद्गत आहे. ह्याच मोरा डोंगराच्या वा मोरधन किल्ल्याच्या पायथ्याशी खैरगाव हि लहानशी वस्ती आहे. ह्याच वस्तीतल्या शाळेजवळ, वृक्षछायेत , एका चौथऱ्यवार गणेशाची हि सुंदर मूर्ती पाहावयास मिळते. इथं काही क्षण थांबत .. ह्या शेंदूरचर्चित गणेशाचं आपण मनोमन दर्शन घ्यायचं आणि पुढे निघायचं. येथूनच एक वाट आपल्याला थेट किल्ल्याकडे घेऊन जाते. नाशिक हे तसं पुरातन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेलं, येथील होणाऱ्या व्यपारीमार्गावर ..घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असावा. टेहळणीसाठी म्हणून वापरात असलेला हा उंच पहाडी किल्ला.. आपल्या अंगा खांदयावर ..फार काही असे वास्तू -अवशेष बाळगून नसला तरीही…, आसपासच्या नितांत आणि रम्य देखण्या सृष्टी सौदंर्याने… काळेकभिन्न कातळ कड्यांच्या रंग- मोहित स्पर्शांनी , दूरवर उंचावलेल्या उत्तुंग सह्य माळांनी, अंगभर सुखावणाऱ्या वाऱ्याच्या…गीत स्वरांनी , मनात भरून उरतो.

Leave a Reply

Your email address will not be published.