नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं प्रेम हे… प्रेम फक्त ‘आपलेपणाचं’ जाणतं अन म्ह्णूनच हृदयाशी पडणारे घाव कितीही गहिरे असले ना, तरी ते आपलेपणानेच प्रत्येक गोष्ट स्वीकरतं जातं. हे ‘स्वीकारणं’ म्हणजे काही हतबलता नाही हा..ती प्रेमातली अन नात्यातली सर्वात मोठी जबाबदारी आहे. जी तुझ्या माझ्या नात्यातला सुसंवादीपणा आणि आपलेपणा टिकवून ठेवते. मी म्हणूनच तर म्हणतोय ना, तू फक्त […]

‘संवाद’ हरवलेलं नातं

खूप काही लिहावसं वाटतंय आज ? कारण हे मनं  फारच अस्वस्थ झालंय .हळवं झालंय ते   ‘कारण ‘संवाद’  हरवला आहे.बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला  ‘संवाद’कुठे दिसला का हो तुम्हाला तो ?नाही ? नाही ना…?कुठेसा  निघून गेला आहे बघा, दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर, कसं शोधावं  आणि कसं परत आणावं बरं त्याला  ? काही काही कळेना.तुम्ही सांगू […]

प्रवाह..

पहिल्या भेटीत किंव्हा त्या आधी सुरु असलेला ‘दोघातला ‘ तो ‘मुक्त नि हसरा संवाद’  पुन्हा तसाच अगदी पहिल्यासारखा उत्साहित आणि  प्रभावित  राहील का  ? राहू शकतो का ?  हे निश्चित कधीच सांगता येत नाही. कारण व्यक्ती स्वभावानुसार  किंव्हा क्षणा प्रसांगानुसार,  होणारा भावनांचा चढ उतार, मनाच्या पुढच्या वळणाला सर्वस्वी कारणीभूत ठरतो. आणि जे घडणार  आहे ते […]

दुरावा .. प्रेम आणि नातं

प्रेम हे … दिवस मावळतीला लागलेला. अंधारून येण्याआधीचे पडसाद सर्वत्र उमटलेले. गडद्द अश्या भावगंध रंगानं क्षितिज हि कसं झाकोळून निघालेलं . आणि न्हाहत्या विचारधारेत.. भावधूंद होत..अथांगतेच्या मोकळीकतेनं, मरीन ड्राईव्हच्या सागरी किनाऱ्यालगत..ती दोघे..आपल्या स्वप्नील दुनियेत रममाण झाली होती. ‘ आज मी खूप खुश आहे अगं…! त्याने आता बोलायला सुरवात केली. मन बघ कसं.. आनंदी वर्षावाने बहरून […]

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar

BharatMatrimony® – Trusted Matrimony, Shaadi App Install now ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar पावसाचं आता आगमन होईल . तशी चिन्ह हि दिसू लागलीत. जीव सृष्टी त्याचा आगममाने आनंदाने मोहरून जाईल. प्रेम कविता उदयास येतील. अनामिक ओढीनं आणि हुरहुरीने एखाद नातं हि पावसाच्या सरीत चिंब होत …जवळ येईल. नव्या आयुष्याला […]

प्रेम हे..

”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात”.  दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ?तिने एकाकी सवाल केला.तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावंम्हणून त्याने तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हाआपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं .‘’ […]

प्रतिबिंब..

ऐकssss  ना…..त्या नदीच्या प्रवाहाकडे बघ  ? किती संथपणे अलगद वाहत आहे ती, वळणा -वळणाचा एक एक घाट अगदी सहजतेने ओलांडत ? बघतो आहेस ? हो  ? असं वाटतंय…मी जगावेगळ्या  स्वप्नं नगरीतच वावरतेयं  रेsssss… किती  भन्नाट जग आहे हे ! मी असं कधी अनुभवलं  नाही ह्यापूर्वी… हि अशी ध्यानस्त मनाला गुंगवणारी रात्र,  हा  नदीचा संथ नितळ […]

” सहवास.. तुझा माझा “

थोडं थांबशील ? बिलगू दे असंच काहीवेळ अजून… हट्टाने मला कवटाळून घेऊ दे.. असंच, नाहीतरी तू पुन्हा कुठं भेटणार आहेस ? एकदा वेळ निसटली कि निसटलीच …पुन्हा ती माघार घेत नाही आणि सांगूनही परतणार नाही . मला माझा वेळ घेऊ दे रे.. निदान आज तरी… ह्या घटकेला.. क्षणभर त्याने तिच्याकडे एकटक रोखून पाहिलं. तिच्या नजरेतला […]

माणूस आहे …तो चुकणारच …

माणूस आहे …तो चुकणारच … प्रेमात सगळ ‘क्षेम’ असतं अस म्हणतात . पण त्यासाठी क्षमाशील वृत्ती मुळात असवी लागते. अन प्रेम आतून असावं लागतं. खरं खुर.. हृदयाच्या सुप्त वाणीतून प्रकट झालेलं. तेंव्हा कुठे झाल्या गेल्या क्षणांना किंव्हा दुखावलेल्या आपल्या मनाला पुन्हा शांत करून , पुन्हा सार आपलसं करून . सारं विसरून, नव्याने नातं झुलवता येतं. […]

मन हि मन में

  मन हि मन में… ‘” Sometimes your heart needs more time to accept what your mind already knows.” बरंच काही लिहायचं आहे आज …पण कसं लिहू ? कुठून सुरवात करू? काही कळत नाही. मन नावाचा हा प्रकारच खूप अजब आहे. विचार विचार आणि फक्त विचार ..अगदी भेडसावून सोडतात. एखाद्या भुताटकीसारखं …पिच्छा सोडत नाही.  जगात […]