क्षणाचे सांगाती..

कुठलेही भाव न दर्शवता, सतत दृष्टी समोर येणारी वा घडणारी एखाद गोष्ट, सातत्याने टाळत राहणं वा इग्नोर करत राहणं, ह्या…

Continue Reading →

कॅमेराच्या नजरेतून, हृदयातले भावबंध

कॅमेराच्या नजरेतून, हृदयातले भावबंध..     प्रति – १  अबोली असूनही किती बोलकी आहे हि … प्रति – २  ह्या…

Continue Reading →

विरह ओळी

मनातील विविध अश्या  भावरंगाचे दर्शन आपल्याला प्रेमातून अनुभवायला  मिळत असतं. त्यातलंच हे एक….  विरह – ओळी . एखाद्या  व्यक्तीच्या प्रेमात पडल्यापासून ते दूर…

Continue Reading →

क्षण क्षण वेचूनि जगलो मी …

घाव कुठूनही कसाही पडला तरी  तो अलगद झेलायचा  अन हळूच थोपवायचा , हे  कसब आपल्यात असलं ना  कि  नात्याला हि कसा गोडवा प्राप्त होतो…. ‘हा माझा बेस्ट फ्रेंड संकेत ..’ नुकतेच लग्नाच्या  बेडीत  विराजमान झालेल्या आपल्या नवऱ्याशी तिने माझी ओळख करून दिली. एकमेकांचा तसा वरवरचा  आमचा  परिचय झाला.  वरवर  का , कारण  इतक्या घोळक्यात , माणसांच्या  त्या राशींमध्ये , तिच्याकडचे अन त्याच्याकडचे आप्तमंडळी , कधी न भेटलेले , ना पाहिलेले , ना  कधी कुठे बोललेले,  पहिल्यांदा  भेटतात  तेंव्हा असंच काहीस होतं असावं नाही  का ? इतका वेळ असतोस कुठे म्हणा तेंव्हा , त्याच हि तेच  झालं. त्याने  हळूच माझ्याकडे पाहिलं. ‘अच्छा’ असं काहीस म्हणत  हलकंसं स्मित केलं . तुम्हा दोघांनाही लग्नाच्या भरभरून शुभेच्छा असं म्हणत , मी हि पुढे होऊ  लागलो. तोच वधूच्या बोहल्यात नटलेल्या माझ्या मैत्रणीने अडवलं. थांब ना , फोटो… तिने माझ्याकडे एकवार पाहत नवऱ्याकडे कटाक्ष टाकला. तिच्या मनातील फोटोसाठीची तळमळ चेहऱयावर स्पष्टपणे दिसू लागली . तसं लग्नाला तिच्याशिवाय मला कुणी परिचयाचंच  न्हवतं.  आलो सुद्धा एकटाच होतो . कारण दोघात घट्ट मैत्रीचे संबंध, येणे अगतिकाचे होतेच.  त्याकरीताच आज रजा घेतली होती . दादरच्या , छबिलदास शाळे जवळील, एका लग्न सभामंडपात ,  विवाह सोहळा यथोच्छित पार पडत होता मी आपला आलो, बसलो , जेवलो अन  आणि निमूटपणे  प्रेजेंट देण्याकरिता वाट पाहत बसून होतो . प्रशस्त असा तो एसी हॉल, अलवार ताल देत  सुरु असलेले श्रवणीय Instrumental Song ,  नाकी गंधळत असलेला अत्तराचा सुगंधी शिडकावा , शुभेच्छांचा मोकळ्या वर्षावा  करिता, नटून थटून आलेल्या सगे सोयरे , त्यांची  उडालेली धांदल , लगभग…..नजर एकटक टेहाळत होती. घोळक्या घोळक्याने , कुटुंब  कबिलासह  वधू वरांच्या   भेटीकरिता , सगळ्यांचीच  घाई गर्दी  उसळली  होती. रांगेत हळूहळू  जो तो पुढे सरत होता . नव्या जोडप्याला भेटून , ग्रुप  ग्रुपने  फोटो काढणाऱ्यांचीतर  संख्याच  जास्त दिसून येत  होती. अपवाद काय तो माझ्या एकट्याचा असावा बहुदा ,  कारण मी एकटाच असा  होतो .…

Continue Reading →