Browsed by
Category: नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं प्रेम हे… प्रेम फक्त ‘आपलेपणाचं’ जाणतं अन म्ह्णूनच हृदयाशी पडणारे घाव कितीही गहिरे असले ना, तरी ते आपलेपणानेच प्रत्येक गोष्ट स्वीकरतं जातं. हे ‘स्वीकारणं’ म्हणजे काही हतबलता नाही हा..ती प्रेमातली अन नात्यातली सर्वात मोठी जबाबदारी आहे. जी तुझ्या माझ्या नात्यातला सुसंवादीपणा आणि आपलेपणा टिकवून ठेवते. मी म्हणूनच तर म्हणतोय ना, तू फक्त आपलेपणा ओत .’स्वीकरण्याची’ हि क्रिया अगदी सहजच येत जाईल अन नातं उमलत्या फुलासारखं गंधित होंऊन आयुष्याची घडीहि , हसऱ्या वाणीनं अन खेळत्या मनानं मोकळी होत… Read More Read More

‘संवाद’ हरवलेलं नातं

‘संवाद’ हरवलेलं नातं

खूप काही लिहावसं वाटतंय आज ? कारण हे मनं  फारच अस्वस्थ झालंय .हळवं झालंय ते   ‘कारण ‘संवाद’  हरवला आहे.बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला  ‘संवाद’कुठे दिसला का हो तुम्हाला तो ?नाही ? नाही ना…?कुठेसा  निघून गेला आहे बघा, दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर, कसं शोधावं  आणि कसं परत आणावं बरं त्याला  ? काही काही कळेना.तुम्ही सांगू शकाल का ?नाही ? असो,आयुष्याची सगळी बहारच निघून गेली आहे आता,सगळे रंगच जणू  धुसर झालेत,   रखरखत्या  उन्हासारखं अगदी, कालपटलेलं जगणं  झालंय हे. नाही राहवत आता..तू… Read More Read More

दुरावा .. प्रेम आणि नातं

दुरावा .. प्रेम आणि नातं

प्रेम हे … दिवस मावळतीला लागलेला. अंधारून येण्याआधीचे पडसाद सर्वत्र उमटलेले. गडद्द अश्या भावगंध रंगानं क्षितिज हि कसं झाकोळून निघालेलं . आणि न्हाहत्या विचारधारेत.. भावधूंद होत..अथांगतेच्या मोकळीकतेनं, मरीन ड्राईव्हच्या सागरी किनाऱ्यालगत..ती दोघे..आपल्या स्वप्नील दुनियेत रममाण झाली होती. ‘ आज मी खूप खुश आहे अगं…! त्याने आता बोलायला सुरवात केली. मन बघ कसं.. आनंदी वर्षावाने बहरून आल्यासारखं वाटतंय. आनंदाने खुललयं ते, जणू..मनाशी अडखळलेला, साठलेला, खळखळता प्रवाह.. ..आज पुन्हा प्रवाहित झाल्यासारखं वाटतंय, त्याच लयीत- त्याच ताल सुरात….प्रदीर्घ अश्या प्रतीक्षेनंतर. खरंच….ग ! विश्वासच… Read More Read More

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस

पावसाचं आता आगमन होईल . तशी चिन्ह हि दिसू लागलीत. जीव सृष्टी त्याचा आगममाने आनंदाने मोहरून जाईल . प्रेम कविता उदयास येतील. अनामिक ओढीनं आणि हुरहुरीने एखाद नातं हि पावसाच्या सरीत चिंब होत …जवळ येईल. नव्या आयुष्याला इथूनच सुरवात होईल. अश्याच …आशयाची हि एक गोष्ट . एक प्रयत्न … 🙂 😀 ती…मी आणि हा बेधुंद पाऊस : ग्रीष्म ऋतू ने इंद्रलोकी निरोप धाडला आणि वर्षा ऋतू चाल धरून भू धर्तीवर आवेगाने बरसू लागली. उन्हाच्या काहिलीने आधीच कालवटलेलं अंग वर्षा ऋतूच्या… Read More Read More

प्रेम हे..

प्रेम हे..

”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात”.  दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ?तिने एकाकी सवाल केला.तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावंम्हणून त्याने तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हाआपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं .‘’ बऱ्याचदा…. तसा बऱ्याचदा…मनात येईल तेंव्हा तिचा चेहरा स्तंभित झाल्यासारखा एकसारखानिरखत असतो. वेळेचं भान उरत नाही कि माझं मला कळत नाही . पण तो चेहरा ,… Read More Read More