कवितेचं पान

वेड आपुले सह्याद्री !  नभा नभातुनी,दऱ्या खोऱ्यांतुनीगर्जितो माझा सह्याद्री ! दिशा दिशांनासाद घालूनीपुलकित होतो सह्याद्री !गड किल्ल्यांचारत्नमनी तोअभिमान आपुला सह्याद्री !शिवरायांचे, पराक्रमांचेगुणगान गातो हा सह्याद्री !मनी उभरतो,उरी फडकतो ,शक्तिस्थळ अपुलासह्याद्री !मना मनातुनीनाद घुमतेशान आपुला सह्याद्री !कणखर,रौद्र रुप त्याचेगौरवशाली सह्याद्री !महाराष्ट्राचा मुकुटमनी तो,वेड आपुले सह्याद्री !– संकेत पाटेकर वेड आपुले सह्याद्री !

प्रेम म्हणजे अजून तरी काय ..  आपल्या माणसाने दिलेली प्रेमाची हलकीशी साद सुद्धा जेंव्हा मनातले अनेक वादळी तवंग क्षणात शांत करते ना ….ते म्हणजे ‘प्रेम’  आपलेपणाची , पाठीवरली हलकीशी थाप सुद्धा मनाला जेंव्हा एक दिलासा देऊन जाते ना..ते म्हणजे ‘प्रेम’  मनातल्या भावनांना जिथे दुरूनच ओळखले जाते , वाचले जाते अन त्या तरल भावनेसाठी जिथे जीव ओतला जातो …

प्रेम म्हणजे अजून तरी काय .. Read More »

तुझ्या अश्या वागण्याचंकारणच कळत नाही मी बोलत राहतो तू काहीच बोलत नाही..! संवाद होतो, तेवढ्यापुरतं तेही माझ्याकडून , अगदीच फोनवरून मीच एकटा बडबडतो तू प्रतीसादच देत नाही… तुझ्या अश्या वागण्याचंकारणच कळत नाही…! भेटावयाचं म्हणावं कधी तर तू हो-नाही’म्हणत नाही . वाट पाहतो वेड्यावाणीतो ‘ क्षण’ काही येत नाही.. तुझ्या अश्या वागण्याचंकारणच कळत नाही… ! मनातली हि वेडी आशा अजूनही हार घेत नाही.मी …

तू काहीच बोलत नाही.. Read More »

घराच्या चौकटी मधून म्हणा किंव्हा रस्त्याने जाता येता म्हणा ..उंच निळ्या आकाशी ‘घारी’ घरट्या घालताना दिसत असतात … तेंव्हा आपलं ‘मन’ हि कल्पकतेचे कल्पितपंख लावून उंच आकाशी झेपावते …… त्या अर्थी हि माझी कविता … त्या उंचउडल्या घारीसारखे स्वच्छंदी होवुनी विहरावे ह्या निळ्याभोर नभांगातुनीअवघे हे विश्व पहावे ! ते राकट-कणखर सह्यकडे , ते वेडे वाकडे घाट दरे, ते रुप …

अवघे हे विश्व पहावे.. Read More »

काही सांगायचे होते..काही ऐकायचे होते..काही जुन्या क्षणांना..जरा गोंजरायचे होते.. क्षण हसवायचे होते..जरा रुसवायचे होते..मनं, नव्या क्षणांशी ..जरा मिसळायचे होते.. भाव निरखायचे होते..हृदयी जमवायचे होते..मन तुझे आणि माझे..जरा उसवायचे होते.. नाते झुलवायचे होते..जरा फुलवायचे होते..गंध मोकळ्या मनाचे..तळ शोधायचे होते… काही सांगायचे होते..काही ऐकायचे होते..ऐक सखे…..जरा भेटायचे होते.. ~ संकेत पाटेकर

प्रार्थना शब्दांसाठी..  हे भगवंता ! मनातून उमळणाऱ्या ह्या शब्दांना इतकी माया, प्रेम दे, कि त्याने कधी कुणाचं मन दुखावलं जाऊ नये. आपलेपणाचा त्यांस इतका सुंगंधित सुवास दे, कि त्याने दुरावलेली नाती गॊती पुन्हा एकत्रित जुळू देतं. शौर्याइतकचं प्रेरणादायी आग हि त्यात तळपू देत. जेणेकरून, ढासळलेल्या बुरज मनाला पुन्हा आभाळाकडं निर्भीड पण पाहता येईल. आयुष्याची लढाई सहज …

प्रार्थना शब्दांसाठी.. Read More »

मला नाही मांडता येत रे , तुझ्या सारखं असं काही, पण सांगू… कुणी तरी हवं असतं आपल्याला , आपल्या जवळ बसून ,आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी… आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी..  आपल्या मनाला जाणंणारं, हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी , हवं त्या वेळी, कुठूनही , कसंही हळूच येऊन ,आपल्याला थोपवणारं, घट्ट …

कुणी तरी हवं असतं…! Read More »

सहजह ‘आठवण’ यावी असं काही नसतं रे ‘आपलेपणचा हुंदका’ तेवढा सहज निघतो रे …! विसरत नाही बघ तसं कुणी कुणालाच असे ‘हृदयाशी नातं ” जो तो जपून असतो रे… ! ‘आपलेपणचा हुंदका’ तेवढा सहज निघतो रे … भावनांची हि रंगते मैफिल, कल्लोळ जिव्हारी रे ‘आसवांचाही’  ‘जीव’ तेंव्हा हळूच तुटतो रे… ! ‘आपलेपणचा हुंदका’ तेवढा सहज …

‘आपलेपणचा हुंदका’ Read More »

Translate »