जीवन कोणावाचूनहि थांबत नाही …

मनमोकळं हास्य घेऊन, किती सहजतेने आयुष्यात आलीस तू .. हो ना ?जितक्या सहजतेने आलीस तितक्याच सहजतेने…एक दिवस निघून हि गेलीस..  मागे हि वळून पहिले नाहीस तू ? एकदाही … भिरभिरणारं एखाद सुंदर फुलपाखरू…आपल्या कळत नकळतं जसं हाती विसावंतं , मनमोकळं हसू उजळवतं , आनंद देतं आणि भावनिकतेची कड ओलावतं हळुवार निघून जातं. तसं झालंय… माझं अगदी.. कळलचं नाही …कधी आलीस ,निघून गेलीस तू…कळले इतकेचं…ते श्वास रोखुनी गेलीस तू… एकमेकां सहवासातले ते सोनेरी क्षण …तेच आयुष्यं झालंय …माझं… किती जवळ होतो रे आपण…बघ ..किती दूर निघूनि गेलो …. हाती उरलेत ते केवळ आठवणीतले उबदार क्षण … अन भावनेने व्याकुळलेल्या अन ओथंबलेल्या ह्या प्रेमसरी …त्यातच ओलचिंब झालोयं मी… बघ, ऐकू येतेयं का ……. हृदयी साद …… ? बघ जरा माझ्याकडे .. बघ ना … हसतोय मी …पाहिलंस माझं हास्य….? कुणी हि सहज वेडा म्हणेल………… कसा वेडासारखा हसतोय ..स्वतःशीच …हाहाहा… पण त्यांना कुठे कळणार …. का हसतोयं ते ….?  गर्द आठवणीच्या धुंद नशेत झुळतोय मी ..आणि नजरेसमोर… तू आहेस ….केवळ तू …. जीवन कोणावाचूनहि थांबत नाही बघ …  पण सहजीवनातल्या त्या क्षणीक ( क्षणासोबत विसावलेल्या..बेधुंद ) आठवणी… साथ सोबत सोडत नाही ..हे हि खरं, नाही का ? बघ , जरा मागे वळून ….अजूनही झुळतोय मी …………तुझ्या प्रेमरंगात … असंच काही सुचलेलं..मनातलं काही ..- संकेत पाटेकर  20.09.2016 

Continue Reading →

हा खळखळता ‘प्रवाह’ हि कुठेशी शांत होतोच ना …

हा खळखळता ‘प्रवाह’ हि कुठेशी शांत होतोच ना ! त्याला हि त्याचं ते खळखळून बागडणं, खळखळून हसणं , खळखळून वाहणं ,…

Continue Reading →

आपलं म्हणणारं आपलं असं कुणी आहे. ह्यातच किती सौख्य आहे..

आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे. ह्यातच किती सौख्य आहे. बळजबरीने कुणाला हि आपलंस करता येत नाही वा कुणाचं मन जिंकता…

Continue Reading →

असंच लिहिता लिहिता …

वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे ‘क्षण’ असतात आपल्या आयुष्यातले…हळुवार  कधी  कुठून,  गुपचूप…

Continue Reading →

भावनिक खेळ ..

खरंच किती गंमत आहे …ह्या भावनिक खेळामध्ये … कुणी भरभरूनं कौतुक करतं. आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल किंव्हा करत असलेल्या…

Continue Reading →