आपले सर्वांचे आवडते लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार, वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच आपले प्रिय वपु त्यांची काही पुस्तकं आपल्यासमोर ठेवत आहेत. वपूंवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. कारण त्यांचं लिखाणचं सामान्य माणसाच्या थेट हृदयावर जाऊन भिडायचं. आजहि भिडतं. वपुंनी त्यांच्या पुस्तकातून माणसातला माणूस शोधायला लावलं. जीवनाविषयक नवी दृष्टी बहाल केली. जागोजागी भेटलेल्या असंख्य माणसांच्या वृत्तीतून, अनंत क्षणांच्या सोबतीतुन त्यांनी जीवनाविषयक तत्वज्ञान मांडलं आणि सामान्य माणसाच्या सुख दुःखाचे अनेक पैलू सहजतेणे उलगडून दिले. आपल्या कथाकथनामधून त्यांनी खळखळून हसवले. रसिकतेची ओढ लावली. असे हे आपले प्रिय वपु …
वसंत पुरुषोत्तम काळे | books of vapu kale
वपुर्झा
Vapu Mahotsav
Mayabajar
Vapu 85
Kahi Khara Kahi Khota
Goshta Hatatali Hoti
Bhul Bhulaiya
Ka Re Bhulalasee
Hunkar
Navra Mhanava Aapala
Vapu Yanchi Manas
Chaturbhuj
Cheers
Fantasy Ek Preyasi
Vapurza, Sakhi, Partner, Apan Sare Arjun, Dost (Set of 5 Books)
वपुंच्याच शब्दात सांगायचं तर … माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला. कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या , तर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो निसटला हि , ह्या माणसानं कधी मला रडवलं कधी हसवलं, कधी भुलवलं कधी थकवलं, कधी बैचेनं केलं. कधी अंतर्मुख .. तरीही माझा शोध चालूच आहे अन चालूच राहणार ..माझा पेशन्स दांडगा आहे. ह्याच श्रेय हि पुन्हा माणसांनाच आहे. वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.