Big mistake in my life”

”I have done Big mistake in my life”

सकाळ्च मोबाईलची रिंग खणखणू लागली.

इतक्या सकाळच कुणाचं call म्हणून मोबाईलकडे सहज नजर फिरवली , नंबर ओळखीचाच होता. आलेला call रिसीव्ह केला . आणि बोलण्यास सुरवात केली .

नित्य नेहमीचाच आवाज सुरवातीला वाटला , पण हळू हळू शब्दातली गंभीर भावमुद्रा मनावर उमटू लागली .

पुढे शब्दांसोबत अश्रूंचाही बांध फुटू लागला . तसं तसं चेहर्यावर प्रश्नार्थी भाव उमटू लागले.

” संकेत मी आयुष्यात फार मोठी चूक केलेय.

‘I have done Big mistake in my life, feeling guilty n upset ”

तिच्या ह्या एकएक शब्दांसोबत अश्रुथेंब हि वाहत होते . तुटक तुटक शब्दात ती बोलत होती.

” संकेत, कुणासाठी खरचं compramise करू नकोस , sacrifice करू नकोस , त्यांना त्याची काहीच किंमत नसते .

तिच्या ह्या वाक्यात मात्र सत्यता होती . आयुष्यात कधी अशी एखादी व्यक्ती येते . जिच्यावर आपला जीव जडला जातो. एक घट्ट नातं जुळल जातं. ज्या साठी आपण बऱ्याच गोष्टी सर्वस्वी पणाला लावतो . पण शेवटी त्या व्यक्तीला आपल्या ह्या साऱ्याची काहीच किंमत नसते . अस जेंव्हा कळत तेंव्हा मनाचं संतुलन साहजिकच बिथरत .

अशा वेळेस झालं ते विसरून , काय तो त्यातून बोध घेऊन आपल्या पाउल वाटेने पुढे निघत जायचं. आयुष्याचा एक तो भाग होता अस समजून पुढे निघायचं. बस हेच हाती असत .

आयुष्य असंच अनेकानेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं आहे . त्यात अडकून न राहता हसत खेळत पुढे चालत राहण आणि इतरना हसवत राहण हेच जीवन आहे .

मनातले काही …

नातं तुझं माझं

संकेत पाटेकर

१२.०८.२०१३

Leave a Comment

Your email address will not be published.