१०० वर्ष आयुष्य आहे तुला..

१०० वर्ष आयुष्य आहे तुला ……….आत्ताच तुझी आठवण काढली .

सहज कधी , योगा योगाने म्हणा किंव्हा ठरवून म्हणा , एखाद दिवशी कधीतरी अचानकपणे भेट घडते. नेहमीच्याच कट्ट्यावर तर कधी रस्त्याने जाता येता …कधी कुठल्या एका कार्यक्रमाप्रसंगी , मग तो लग्न समारंभ असो वा इतर कुठला हि ….

एकमेकांना भेटून खुशालकि विचारली जाते .
मग विषयावर विषय निघत एक एक विषय चर्चिले जातात .
गप्पांना हास्याचा आनंदी रंग चढत जातो. मग सरतेशेवटी किव्हा अधे मध्ये एखाद दुसर्या मित्राची किंव्हा आपल्या लाडक्या व्यक्तीची आवर्जून आठवण येते.
तिचा उल्लेख हि होतो .
काय करतो रे तो हल्ली ? कुठे असतो तो ? दिसतो का , भेटतो का ? 
कशी आहे ती ? बरेच दिवस दिसली नाही . असे प्रश्ना वर प्रश्न विचारले जातात .

अन त्या प्रश्नाच उत्तर देण्यास जावे तोच ती व्यक्ती साक्षात देवासारखी तिथे अवतरलेली असते .
अन मग नकळत एक वाक्य निघत मुखातून …जे सर्व श्रुत आहे.
ते म्हणजे ..
१०० वर्ष आयुष्य आहे तुला ……….आत्ताच तुझी आठवण काढली .

असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. 
कधी आपण कुणाला १०० वर्ष बहाल करतो , तर कधी आपले जिवलग आपल्याला १०० वर्ष बहाल करतात अगदी प्रेमाने आपण मात्र एक हास्य छबी देऊन मोकळे होतो.

संकेत य . पाटेकर

१६.०२.२०१३

Leave a Comment

Your email address will not be published.