हो कदाचित | Marathi Quotes | Marathi Quotes on Life

हो..कदाचित

हो कदाचित | Marathi Quotes | Marathi Quotes on Life

 

माहित नाही.. का, कसं ?  एकाकी मन दाटून येतं.

अवचित अश्या कुठल्या क्षणी, कुठल्याश्या गडद  असह्य भावनेनं ..कसल्याश्या अनामिक ओढीनं..कुठल्याश्या जाणिवेनं वा तीव्र आठवणीने..भाव व्याकुळ होतं ते..

गर्द अंधारल्या डोहात स्वतःला झोकावून देत काही कळत नाही का ? का ते ?

कुठे लक्ष लागत नाही. कुणाशी बोलवत नाही.

कुणी बोललं तरी त्यात आपलेपणा वाटत नाही. एकटेपणातच ते स्वतःला गुंतवून घेतं. स्वतःलाच त्रास देत राहतं ..

असह्य होतं हे सगळं,  का असं होतं ?

कुणी हवं असतं का त्याला ?

आपल्या मनातलं गुंज ऐकून घेणारं, कुणी ? आपल्या मनाला थोपवून क्षणांशी संगत करणारं कुणी ?

आपल्यात रमणारं, आपल्यात विसावणारं,

सर्वस्वी आपलं होंऊन आपलं होऊन जगणारं कुणी ?

कुणी हवं असतं का ? 

होssss हो..कदाचित 

– सहजच

– संकेत

Translate »