हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

कधी कधी आपल्याच नातेवाईकांपैकी अथवा मित्र परीवारांपैकी कुणीतरी बोलून जातं..ज्याचा ट्रेक विषयी काहीही एक संबंध नसतो.
”काय रे नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?” काय मिळतं त्यातून तुम्हाला ?
उगाच वेळ वाया, पैसे वाया ? नीट घरी बसा ना.
एखाद दिवस कुठे मिळतो आठवड्यातून सुट्टीचा ..तो देखील असा उंडारायला घालवता ?
शनिवार रविवार बघावं तर हा बाहेर ? कुठे तर म्हणे ट्रेकला ? काय मिळतं त्यातून ..देव जाणे ?
असे वाक्य आपल्या आप्त स्वकीयांकडून हमखास ऐकायला मिळतात. अन आपण ते वाक्य ह्या कानाकडून त्या कानाकडे अगदी सहजतेने भिरकावून मोकळे हि होतो.
कारण त्यांना सांगून समजावूनहि काहीहि उपयोग नसतो. पण समजणारे समजतात आपलं बोलणं.
आपला मुलगा /मुलगी इतर मुलांसारखा वाईट मार्गाला तर नाही ना हे त्यांना पटलेले असतं. शिवरायांबद्दल प्रेम आणि आदर हा असतोच त्यांच्या हृदयी आणि तो असलाच पाहिजे.असायलाच हवा.
महाराष्ट्रात, ह्या तपोभूमीत जो जन्म झाला आहे आपला.. हेच मोठं भाग्य आपलं न्हाई का ?

तर ट्रेक म्हणजे नक्की काय?

हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?

ट्रेक म्हणजे नुसतंच डोंगर चढणं – उतरणं नाही..
ट्रेक म्हणजेच नुसतीच काही मौज मजा हि नाही..
ट्रेक म्हणजे मनाने मनाला दिलेली हाक..
ट्रेक म्हणजे शिवतेजाची प्रेरणादायी आग..

ट्रेक म्हणजे आडवाटेची नुसतीच पायपीट न्हवे..
ट्रेक म्हणजे निथल्या घामाचे थकवे थेंब हि न्हवे..
ट्रेक म्हणजे चैतन्याची नवी उमेदी लाट..
टेक म्हणजे अभिमानाची सह्याद्रीची साद..

ट्रेक म्हणजे नुसतंच सैरवैर भटकणं – पाहणं न्हवे..
ट्रेक म्हणजेच नुसतंच आभाळाची व्याप्ती मोजणं हि न्हवे..
ट्रेक म्हणजे गड-किल्ले अन निधड्या छातीचा इतिहास..
ट्रेक म्हणजे दऱ्या खोऱ्यातुनी घूमघुमलेला नाद – ‘ जय भवानी जय शिवराय ‘

इतकंच नाही.
ट्रेक म्हणजे निसर्गाशी साधलेला कौतूक सोहळा..
ट्रेक म्हणजे स्वतःसोबतच साऱ्यांशी जुळवून घेतलेला श्वास मोकळा..
ट्रेक म्हणजे शिस्त..
ट्रेक म्हणजे गती..
ट्रेक म्हणजे दिशा मोकळी अन पुसटलेली भीती..
ट्रेक म्हणजे बरंच काही..
खेड्या खेड्यातुनी पाहिलेली, अनुभवलेली जीवनरूपी रहाट गाडी..!
असा हा ट्रेक करताना सृष्टी सौंदर्याची विविध मनवेडी रूपं पाहता येतात.
सह्याद्री हा असा भुरळ घालतो, वेड लावतो मनाला..ते वेगळंच ..!
– संकेत य पाटेकर

ट्रेक म्हणजे निसर्गाशी साधलेला कौतूक सोहळा.. ट्रेक म्हणजे स्वतःसोबतच साऱ्यांशी जुळवून घेतलेला श्वास मोकळा.. ट्रेक म्हणजे शिस्त.. ट्रेक म्हणजे गती.. ट्रेक म्हणजे दिशा मोकळी अन पुसटलेली भीती.. ट्रेक म्हणजे बरंच काही.. खेड्या खेड्यातुनी पाहिलेली, अनुभवलेली जीवनरूपी रहाट गाडी..!

ट्रेक म्हणजे नुसतंच सैरवैर भटकणं – पाहणं न्हवे.. ट्रेक म्हणजेच नुसतंच आभाळाची व्याप्ती मोजणं हि न्हवे.. ट्रेक म्हणजे गड-किल्ले अन निधड्या छातीचा इतिहास.. ट्रेक म्हणजे दऱ्या खोऱ्यातुनी घूमघुमलेला नाद – ‘ जय भवानी जय शिवराय ‘

Trekking & Hiking- Kharedibazar

Kharedibazar | Online Store |

  • Trekking & Hikking 
  • Camera’s & Accessories
  • Antique Home Decor Products 
  • Book store

3 thoughts on “हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?”

Leave a Reply

Your email address will not be published.