हृदया – एक स्वप्नं सखी

हृदया – एक स्वप्नं सखी

पत्र संवाद…

प्रिय सखे ,
सगळ असं Unexpected असेल न तुला ..
मला वाटलंच , माझं असं जगावेगळं वागणं ( तुझ्यासाठीच हा ) तुला कदापि 
रुचणार नाही, ना पटणार नाही. हे ना ? 
मुळात अगं … अपेक्षानुसार वागणं हि अवघड अशी गोष्ट आहे. दरवेळी ते शक्य नाही . 
कधी – कुठेतरी.. .. घाव हा बसतोच , ह्या बदलत्या परिस्थितीचा…
अन मग भली मोठी जखम होते. तीच सहन होत नाही . अन आपल्या मनाचा विस्फोट होतो . 
अन एकमेकांपासून तुटले जातो.
पण तेंव्हा , हा एकाकी असा का वागला ? ह्याचा शोध घ्यावासा वाटत नाही 
आपल्याला …
इथेच तर फसगत होते.. नात्याची, नात्यातल्या विश्वासाची …. 
आपलं हि असच काहीस झालंय रे., हे ना ?

मुळात आपल्या भेटी गाठी , फारश्या अश्या झाल्याच कुठे आहे म्हणा ? 
एक भेट ती काय घडली. ती हि योगायोगानेच , बाकी हा सगळा मोकळा असा सुसंवादच.
त्यावरूनच नाही का , मी तुझ्या जवळ इतका ओढला गेलो. 
स्वप्नील दुनयेत निखळ प्रवाह सारखा एकाकी असा वाहत राहिलो. हे ना ? 

आता त्यानेच सगळ अवघड होवून बसलंय , स्वतःलाच सावरता येत नाही आहे कि तुला 
नजरेतून दुर सारता येत नाही . पूर्णतः उधळून गेलोय रे मी ….फांदीवरच्या तुटल्या पानासारखा … .
एकाकी असा … तुझ्या प्रेमात….!

ऐकतेस ना , ? बघ जरा नजरेला नजरे देऊन , अन सांग मला ..
काय असते रे हे प्रेम ? चालते बोलते , दोन जिवंत मन ? भावनांचे उथळ झरे ?
संवेदना जागण्या इतपत सुज्ञ अन संवेदनशील असलेले हे मन ?एवढंच… कि अजून 
काही.. 
खर सांगू हि तर माणसाची अंतरंग …स्वभाव गुण , वा स्वभाव शैली.
प्रेमाची व्याख्या तशी करताच येत नाही. 

ह्या अथांग पसरलेल्या निळाईची व्याप्ती कुणाला मोजता येईल का ? सागराच्या 
खोलीची मोजदाद करता येईल का ? तसंच ह्या प्रेमाचं… जो तो आपल्या अनुभवानुसार 
अन त्या योग्यतेनुसार प्रेमाची व्याख्या रचतो. मी हि आजवरच्या अनुभवावरून शिकलोय . 

प्रेम म्हणजे दोन श्वासातलं अंतर एक होणं. समरस होतं जाणं. दुधात साखर मिसळून 
जावी तशी…पूर्णतः समर्पण …

ते समर्पण कुठेश कमी पडलेलं दिसतंय. 
तसं तुझं हि माझ्यावर प्रेम होतंच ना (आत्ताही असेल) ? नाही असं नाही . फक्त 
तुला स्वतःलाच ते उमगलं नाही . 

तूच नाही का म्हणाली होतीस , मला माझंच कळत नाही आहे , मी प्रेमात आहे कि 
नाही ते ? हे ना ? 
खर तर तेंव्हाच मला सावरायला हवं होतं. पण नाही मी वाहत राहिलो . 
स्वप्नांना कवेत घेऊन …प्रेमाच्या ह्या स्वच्छंदी प्रवाहात … एकटाच..एकाकी ! 
तीच ठेच लागलेय ह्या जिव्हारी .. 
ह्या प्रवाहात वाहलो म्हणून नाही. तर ह्या प्रवाहात वाहत असताना ..तू एकाकी 
माघार घेतलीस …ह्याची ठेच.

पण तू वाईट वाटून घेऊ नकोस… हा..
आपल्या नकळत अन नियतीच्या संकेतानुसार घडणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी 
आहेत . पण गम्मत अशी आहे बघ , कि हे सर्व माझ्या बाबतीत घडून आलं आहे. 
तुझाच, 
क्रमश :
संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.