हृदया – एक स्वप्नं सखी..

हृदया – एक स्वप्नं सखी..
(एक छोटासा प्रयत्न पुन्हा एकदा ….) 
मावळत्या पिवळ्या धमक अन केशरीवर्णीय रंगछटांनी क्षितीज सजले होते.
सूर्य नारायण नित्य नेहमीच्या आपल्या रिवाजा प्रमाणे ह्या अथांग बाहू पसरल्या सागरात आस्ते आस्ते विलीन होत साऱ्या जीव सृष्टीला निरोप देत होते .
आजचा दिवस म्हणवा तर तसा कलंडला होता . कालोख्याचा साम्राज्य हळूहळू विस्तार घेऊ लागलं होतं.
तो मात्र अजूनही एकटक नजरेने त्या उसळत्या फेसाळ लाटाकडे पाहत , भान हरपून गेला होता.
मनात असंख्य विचारांचं तसं काहूरच माजलं होतं.
गेले कित्येक दिवस तो तिच्याच विचारात तासनतास बसून राही.
वेळेच भान उरत न्हवतं . कि कुठेशी लक्ष लागतं न्हवतं . वेडावला होता तो..

त्या आठवणी ते क्षण त्याचा पिच्छा सोडत न्हवते . जिथे जाऊ जिथे विसावू तिथे तिथे ते क्षण त्याच्या नजरेसमोरुन चालायचे , बोलायचे , हसायचे , हसवायचे , अन पुन्हा शेवटी उदासीत ढकलून द्यायचे .
चेहऱ्याशी अस एकाकी हास्य फुलून मन पुन्हा एकाकीपणात वेढायचं.
आपली एक चूक …आपल्या नात्यात अशी फुट पाडेल, किंव्हा त्यानं विपरीत अस काही घडेल हे त्याच्या ध्यानी मनी न्हवतं .
पण ते घडलं होतं , नियतीने घडवलं होतं . .
जे होणार आहे ते होणार आहे त्याला कुणी टाळू शकत नाही ? का ?
ते त्या नियतीलाच ठाऊक ?
आपल्या प्रवास वाटे काय काय येणार आहे हे नियतीने आधीच आखून ठेवलेलं असतं अस म्हणतात. पण त्याचा आपल्याला काही मागमूस नसतो. जे वाटयला येईल ते आपण जगायचं . त्यातून काय ते घेत जायचं . अनुभवाने शिकायचं ..अन शिकत शिकता चालायचं . हेच त्या नियतीच नियम असावं . 

काही दिवसापूर्वी घडलेल्या प्रसंगातुनी त्याने असाच काहीसा धडा घेतला होता .
त्या प्रसंगात मात्र दोन मनं तुटली होती . हृदय प्रेम संगीत कुठेसं हरपलं होतं. पण त्याचा स्वर अजूनही आलाप देत होता.
मनातली आशा अजूनही कुठेशी पल्लवित होत होती. . . त्याने तो काहीसा सुखावला होता.
अन म्हणूनच गोड आठवणीच्या त्या सुरांमध्ये आज त्याचं भान हरपलं होतं. रात्र पांघुरली होती . तरी त्याचं काही गम्य नव्हतं.
अर्धवलयाकार मरीन ड्राईव्ह च्या त्या कठड्यावर कित्येक जोड्या एकमेकांना खेटून गप्पांत दंगले होते .त्यांच्याकडे पाहून तो स्वतः हसे अन पुन्हा आठवणीत गुडूप होई.

प्रेम , हे कधी कुणावर जडेल ते सांगता येत नाही. व्यक्ती व्यक्तीनुरूपे त्याची रूप रेखा बदलत जाते. पण ते जात पात बघत नाही . रंग रूप पाहत नाही.
ते फक्त आपलेपणाच ओलावापण जाणतं . अन तिथेच ते रमतं. अन बहरतं.

माणसाला निसटून गेलेले ते क्षण पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटतात. त्यातला जगलेला आनंद त्याला पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो.  म्हणून झाल्या गेल्या गोष्टींची तो पुन्हा उजळणी करत राहतो. ,
कधी जुन्या एखाद अल्बम मधून फोटो काढून , त्यावरून हात फिरवून , कधी नजरेसमोर त्या क्षणांना उजाळा देऊन ..कधी आठवणीचा लेप चढवलेल्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन,
कधी त्या व्यक्तीशी व्यक्तीशा भेट घेऊन त्यातला आनंद तो उपभोगत असतो.

काही दिवसापूर्वी तिच्यासोबत झालेलं मोबाईलवरील संभाषण आज तो असाच पुन्हा ऐकत बसला होता. ते लाडिक बोल पुन्हा पुन्हा ऐकताना , त्याचा चेहरा एकाकी खुलून जाई. .एकाकी हसू हि अनावर होई. अन हसता हसता स्वप्नील दुनियेत तो आपल्या भावी क्षणाचे रंग उधळून देई. असे कितीतरी रंग त्याने आनंद वलयात मुक्तपणे उधळून दिले होते .
हवी तशी ‘नटखट’ अन ‘खट्याळ’ स्वभावाची सखी जी त्याच्या आयुष्यात चालून आली होती.
उशिरा का होईना , प्रेमाचे दार खुले झाले होते. त्यात त्याने निर्धास्त प्रवेश केला होता.
पण अजूनही सप्तपदी साठी किंव्हा लग्नाच्या बेडीत साठी म्हणा निर्णयाची गाठ बांधणे तिच्याकडून बाकी होते. पण त्याधीच दोघांमध्ये एक खटका उडाला. ज्याचा घाव त्याच्या जिव्हारी बसला होता.
माणूस चुकतो , नाही अस नाही . माणूस आहे तो चुकणारच ., 
त्याच्याकडूनही अशीच एक चूक घडली. मुळात एखादी भावना अनावर झाली कि चूक हि घडतेच.
किंव्हा एखाद कुठला प्रसंग घडतोच जो समोरच्याला अनपेक्षित असतो.
पण त्या घडण्यामागे हि त्या आधीचे काही क्षण जबाबदार असतात. ते समोरचा गृहीत धरून चालत नाही . अन म्हणून , एकाकी हा असा का वागला ? असे प्रश्न त्यांच्या मनात वारेमाप उधळू लागतात.
 
अन त्याने त्याचं मन ढासळतं. कळवळतं . तिच्या बाबतीत हि असंच काहीस झालं.
अन त्यानंतर….
क्रमश :-
हृदया – एक स्वप्नं सखी..
– संकेत य पाटेकर
१६.१०.२०१५

Leave a Comment

Your email address will not be published.