हरिश्चंद्रगड -Harishchandragad

हरिश्चंद्रगड -Harishchandragad

हरिश्चंद्र गडावरच तो तुफान वारा, रिमझिमनारा ..खेळकर असा पाऊस. वाऱ्याच्या लहरी स्वभावामुळे ..सतत मागे पुढे जाणारे ..अंगाला झोंबणारे…दाट असे धुके. मन मोहून, हर्षून टाकणारे सुंदर असे ..शुभ्र धवल धबधबे. पावसामुळे झालेला चिखल. वाहत्या झऱ्यामुळे ..होणारा तो पाण्याचा नाद. खळखळाट हिरवीगार झाडे-वेली..तेथील पुरातन मंदिरं. त्यातील शिल्प. केदारेश्वर मंदिरातील भलीमोठी सुंदर सुबक अशी शिवलिंग. शिवलिंग भोवती बाराही महिने असलेलं थंडगार कमरे इतकंच ते पाणी आणि त्यातून घातलेली ती प्रदक्षिणा..

 
दाट धुके असताना पुढची वाट दिसत नसताना, वाट हरवलेली असताना, अचानक दृष्टीपथास दिसणारे ..जणू काही पुढची वाट- मार्ग दाखवणारे ..ते छोटंसं पण सुरेख सुंदर मंदिर, सायंकाळी कोकण कड्यावर जाताना दाट धुक्यामुळे.. तेथील जाण्याची वाट दृष्टीपथास न दिसल्यामुळे लीडर्स ने घेतलेला तो परतीच निर्णय.
 
गुहेत परतत असताना ..काळोख दाटत असताना अन वाट हरवलेली असताना…अचानक एका व्यक्तीचं आम्हापासून दूरवर कुठेतरी जाणं. त्याला शोधण्यासाठी लीडर्स ने घेतलेला तो अचूक..त्वरित निर्णय, तो थ्रिल. सर्व काही अनोखं.
रात्रीचं ते सुग्रास, चवदार जेवण. गमती जमती. दुसर्या दिवसाच..सकाळी त्या पुरातन मंदिराविषयी, तेथील शिल्पाविषयी दीप्ती..संपदा ने दिलेली सुंदर पुरेपूर माहिती.
अनेकां सोबत काढलेले ते गमतीदार पण छान सुंदर फोटो. वाईल्ड लाईफ बद्दलची सौरभ ने दिलेली ती सुंदर माहिती . विरगळ, सतीशीला ह्या बद्दल निलेश अन सौरभ ने दिलेली सखोल तितकीच उपयोगी माहिती अन घरी परतत असताना गाडीमध्ये केलेली ती संगीतमय धमाल.
 
सारं सारं काही अनोखं, नवीन, शिकण्यासारखं, हर्षून जाणारं, मनाला ताजतवानं..फ्रेश करणारं.
असा हा पावसाळी ट्रेक …हरिश्चंद्रगड
संकेत य पाटेकर
 

0 thoughts on “हरिश्चंद्रगड -Harishchandragad

Leave a Reply

Your email address will not be published.