
Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 20MP Photos 1080p Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 3.0 and Time Warp 3.0
सिद्धगड भीमाशंकर – एक विलक्षण ट्रेक अनुभव | Siddhagad Bhimashankar
इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आमच्या ह्या ट्रेकनी झाली.
१-२ जानेवारी २०१२ हे ते दोन दिवस. कधीही न विसरू शकणार असे.
ट्रेकला आम्ही फक्त चौघे जण. यतीन, रश्मी, संपदा आणि मी. म्हणजे दोन मुले आणि दोघी मुली. दोन दिवसाचा आणि एका रात्रीचा हा ट्रेक.
फक्त चौघेजण पण तरीहि हा ट्रेक खूप विलक्षण ठरला. अनेक आठवणी दडल्यात ह्या ट्रेक मध्ये. खूप काही अनोखं घडलं. खूप काही पाहिलं.
खूप काही अनोखं अन रंजक असं ऐकलं. प्रत्यक्ष अनुभवलं. त्यातील काही आठवणी तुमच्या समोर सादर करत आहे.
सिद्धगड भीमाशंकर – एक विलक्षण ट्रेक अनुभव | Siddhagad Bhimashankar
१) हरवलेली ती वाट..
सिद्धगड …पुस्तकात वाचलं होतं. घनदाट झाडी मुले इथे वाट चुकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कुणी तरी वाटाड्या सोबत असणं चांगलच.
आमच्या पैकी यतीन …३ वर्षा पूर्वी सिद्धगडला येऊन गेला होता. त्यामुळे त्याला वाट साधारण ठाऊक होती.
सकाळच्या पारी एसटीने आम्ही नारिवली गावात उतरलो नि एका मावशीकडे गडाकडे जाणारी वाट विचारून त्या दिशेने, त्या मार्गी पुढे सरू लागलो.
वळणदार वाटेने लाल मातीत पाउलांचा ठसा उमटवत, कोवळी सूर्य किरणे अंगावर घेत आम्ही निघालो. असा बराच वेळ निघून गेला. आम्ही चालत राहिलो ..चालत राहिलो अन एकाकी पुढे वाट गडप.
एकाच फांदीला जसे अनेक छोट्या छोट्या फांद्या फुटाव्यात तसेच एका वाटेला १-२ वाटा दिसू लागल्या. मागेपुढे मागेपुढे करत आम्ही पुन्हा त्याच वाटेवर येऊ लागलो. बराच वेळ गेला वाट सापडेना.
वेळेला खूप महत्व होतं. दुपारपर्यंत काहीही करून आम्हाला सिद्धगड करून ..३ ते ४ तासाच्या ..सुमसाम, आसपास कुठेही वस्ती नसलेल्या, निर्जन अन घनदाट जंगलातून पुढे पायपीट करायची होती. त्यामुळे सिद्धगडावर वेळेत पोहोचणं आम्हास काहीही करून बंधनकारक होतं.
त्यामुळे पुढचा वेळ न दवडता आम्ही ‘एक वाट’ पडकून त्या दिशेने जावू लागलो.
उंचच उंच झाडी झुडपातून मार्ग काढत बराच पुढे आल्यानंतर एका धबधब्याच्या दगड धोंडांच्या दिशेने, पुढे एका विस्तीर्ण कातळापाशी येऊन पोहोचलो.
थोडा विसावलो नि आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो. आता वाटेने पुन्हा लपा-छुपिचा डाव सुरु केला होता. वाट पुढे न्हवतीच., तिन्ही दिशेला वाट बंद .
उजव्या हाताला मात्र ..भुसभुशीत माती आणि काटेरी झुडप असलेला एक उभा डोंगर. आम्हाला जणू चॅलेंज करू पाहत होता.
दुसरा पर्याय हि न्हवता. मागे फिरणे शक्य न्हवतं.
तेंव्हा त्याचा तो चॅलेंज स्वीकारून आम्ही त्या भुसभुशीत मातीतून,
एक एक पाउल सावधतेने टाकत त्या काटेरी झुडपातून… अंगाला खरचटले असता, मार्ग काढू लागलो नि अर्ध्या पाऊन तासाच्या उभ्या चढीनंतर, कसेबसे विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो नि श्वास मोकळा केला खरा…
पण इथेही पुन्हा …उंचच उंच घनदाट झाडी, त्यामुळे समोरचा परिसरच दिसेनासा झाला होता. त्यात गवतांच्या पात्यांनीही डोक वर काढल्यामुळे वाट नाहीसी झाली होती.
त्या सुमसाम निर्जन अन घनदाट झाडीत आम्ही फक्त चौघेच होतो अन सोबत म्हणून रातकिड्यांची किर्रकिर्रssssss ….अन झाडाची काळीकुट्ट सावली.
मागे वळता हि येत न्हवतं. पुढे जाता हि येतन्हवतं.
तशा त्या परिस्थितीत, पुन्हा मनाचा निश्चय करून स्वतःच्या संरक्षणासाठी आणलेली छोटी हत्यार काढून आम्ही वाट शोधत शोधत एकदाचा पुढे निघालो.
सिद्धगड भीमाशंकर – एक विलक्षण ट्रेक अनुभव | Siddhagad Bhimashankar
आणि थोडा अंतर कापताच सिद्धगडाच्या त्या दर्शनाने पुन्हा आनंदून गेलो.
तो आनंद ओसंडून वाहत असतानाच पुन्हा एका आनंदाची त्यात भर पडली. ती तिथे त्या निर्जन स्थळी भेटलेल्या त्या काकांची.
तिथून मग खरा प्रवास सुरु झाला आमचा.. सिद्धगडाच्या दिशेने, नेहमीच्या वाटेने..
दुसरी आठवण
२)मनाला भेदरून सोडणाऱ्या त्या किकांळ्या आणि ती घबराट..
सिद्धगडहून भिमाशंकरला जाणारी ती जंगलातली पायवाट आणि त्या मार्गी जात असता घडलेला तो प्रसंग अजून लक्षात आहे. ताजा आहे. आणि तेच आज मी तुम्हाला इथे कथन करणार आहे. सांगणार आहे .
तर मागील भागत आपण पाहिले कि कसे आम्ही वाट काढत काढत …सिद्धगड च्या नेहमीच्या वाटेलां येऊन मिळालो.
तिथे ज्या निर्जन स्थळी जे काका भेटले त्यांनी आम्हाला गडावर जाणारी वाट दाखविली आणि ते स्वतः काही अंतरापर्यंत आमच्या सोबत आले.
अन पुढे सरसावलो. दरवाज्यातून प्रवेश करत आम्ही मळलेल्या वाटेने वेडे वाकडे होत होत..मंदिरा जवळून सिद्धगड वाडीत पोहोचलो. (सिद्धगडावरच वसली आहे ती सिद्धगडवाडी )
नुकताच तो भीमाशंकर करून कोंढवळ गावा मार्गी सिद्धगडला आला होता आणि इथून मग गोरखगडाच्या दिशेने तो वाटचाल करणार होता.
एकटाच तो..सोबत कुणी नाही…तरीही ३-४ दिवसाचे ट्रेक करायचा. जंगलात रात्र काढायचा, मैलो- मैल चालायचा, त्याचं ते धाडस खरंच कौतुकास्पद होतं.
घनदाट जंगलात..त्या किर्र किर्र आवजात, निर्जन वस्तीत, एकट्याने रात्र काढणं, म्हणजे खूपच मोट्ठ धाडस आहे. ते चित्र डोळ्यासमोर आणताच अंगावर हि माझ्या काटा येतो.
नर्मदा परिक्रमा हि त्याने पूर्ण केली होती. त्याने मी तर भारावून गेलो होतो.
मागे मी मलंगगड ट्रेक केला होता ..”एकट्याने” तो त्याच्याकडून मिळालेल्या त्या प्रेरणेनेच.
आमचा त्याच्याशी परिचय झाल्यानंतर तो …त्याच्या मार्गी ..गोरख गडाच्या दिशेने निघाला.
नि आम्ही सिद्धगडवाडीत एका घराच्या मोकळ्या अंगणात ..त्या घरातील आजीला विचारून पाय मोकळे केले नि लगेचच पाठपिशवीतील आमचे जेवणाचे डबे काढून जेवणावर ताव मारण्यास सुरवात केली.माझ्या बहिणी बाईनी म्हणजेच संपदा ने मस्तपैकी इडली अन सोबत चटकदार चटणी आणली होती.
यतीन महराज ने घावन्या सारखं काहीतरी पदार्थ आणले होतं. ( नाव आठवत नाही आता, पण खूपच चविष्ट होतं. ) आणि रश्मी ने मस्तपैकी खिचडीभात आणि अजून काहीतरी होतं (ते हि आता आठवत नाही ) पण सगळे कसे पोटभर जेवले.
संपदाने आणलेल्या बऱ्यासाच्या इडल्या मी एकट्यानेच फस्त केल्या नि त्याचबरोबर इतरही पदार्थ संपवले. इतकी भूख लागली होती मला (ह्यावरून पुढे बरेच असे गमतीचे क्षण घडले. ‘जे मी तुम्हाला सांगणार नाही. नाहीतर बरसचं माझ्या बद्दलच गुपित बाहेर पडायचं. )
तर जेवण उरकल्यानंतर काही वेळ विश्रांती करून आम्ही सिद्धगड वाडीतून बाहेर पडू लागलो.
खरं तर आम्हाला सिद्धगडचा बालेकिल्ला हि सर करायचा होता. पण वेळेच्या कमी मुळे आणि पुढे ३ ते ४ तासाची निर्जन वस्तीची जंगलातून पायपीट करायची असल्यामुळे आणि काळोख्याच्या साम्राज्याचा विस्तार होण्याआधी वेळेत आमच्या स्थळी, आमच्या मुक्कामी पोहोचण्यासाठी, वेळ न दवडता आम्ही निघू लागलो.
सिद्धगडवाडीत आम्ही पोहोचलो त्यावेळेस गावातला एकही कर्ता पुरुष गावात न्हवता. (आम्ही दोघे सोडून, तसे आम्ही गावातले न्हवतोच म्हणा ) तर गावात शांतता होती. सुन्न करणारी..
आमचे पाय गावातून सर सर करत बाहेर पडू लागले. थोड्या वेळेतच आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. तिथे एक दोन जण पुरुष मंडळी काम करत असताना दिसली. पुढे जात असता त्यांची नजर आम्हावर खिळली. आम्ही तसेच पुढे जावू लागलो आणि सिद्धगडाच्या त्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो.
इथून पुढे एक वाट जाते ती भीमाशंकरला. घनदाट अन निर्जन जंगलातून आणि एक वाट आलो त्या मार्गी म्हणजेच नारिवली गावात.
आम्ही भीमशंकर मार्गी निघू लागलो आणि काही वेळेतच एका पठारापाशी येऊन पोहोचलो. तिथे काही शिल्पे आणि एक छोटंसं मंदिर होतं. त्याच छायाचित्रण करून आणि दुरवरचं ते सिद्धगडाचं विलोभनीय दृश्य मनात साठवून आम्ही पावलो पाउली निघू लागलो.
सिद्धगड भीमाशंकर – एक विलक्षण ट्रेक अनुभव | Siddhagad Bhimashankar
असा आमचा क्रम ट्रेकच्या शेवट पर्यंत तसाच होता.
बराच वेळ निघून गेला. आता घनदाट झाडीस सुरवात झाली होती. सिद्धगड अजूनही डोकं वर काढत जणू आम्हावर पहारा ठेवत होता. त्या निरव शांततेत .. रात किड्यांच्या किर्रकिर्र अन पावलांचा चालण्याचा आवाज आणि आम्ही चौघे मनुष्य प्राणी.
चर्रचर्र असा आवाज येऊ लागला. मागे वळून पाहिल्यास कुणी दिसत न्हवतं. कुणीतरी आपला मागे लक्ष ठेवून आहे, असं सतत भासत होतं.
मनात एक प्रकारे घबराटीचे सावट पसरू लागलं होतं. मला भास होत होता कि कुणी होतं तिथे माहित नाही.
संरक्षणासाठी तसं प्रत्येकाकडे हत्यार होतंच. ते बाहेरच काढूनच ठेवलं होतं.
कुणास ठाऊक ह्या घनदाट निर्जन जंगलात काय कधी घडेल. आम्ही होतो तेही चौघेच. दोन मुलं आणि दोघी मुली.
थोड्या वेळाने एक खोल दरीला वळसा घेत आम्ही पुढे आलो नि त्या एका क्षणाने स्तंभित झालो.
आनंदाला उधाण आला. जे मी पुस्तकात वाचलं होतं (शेकरू – रणजीत देसाई ) ते प्रत्यक्षात अनुभवत होतो.
शेकरू …खारी सारखा पण खारी पेक्षा हि मोठा असा हा प्राणी. टूणटूण फांद्या फांद्यावर उड्या घेत, एका मागोमाग एक असे ते दोन शेकरू आमच्या समोर झाडीच्या त्या उंच शेंडीवर बागडत मस्ती करत जात होते. त्यांच्या त्या यथार्थ दर्शनाने आम्ही सुखावलो.
आणि त्याच आनंदात पुढे जात असता, ते क्षण डोळ्यात तरळत असता,
एका विचित्र आवाजाने, त्या किंकाळीने मन सैरावैरा झाले. काहीच कळेनासं झालं. पाऊलं तिथेच जागीच थबकली. श्रवण ग्रंथी अन नजरां चुहीकडे त्या आवाजाच्या दिशेने घुमू लागल्या.
त्या कुणा मनुष्य व्यक्तीच्या किंकाळ्या होत्या. त्या किंकाळ्या त्या निरव शांततेत अजून भयग्रस्त वाटत होत्या. तो भयानक आवाज चारी दिशांना घुंगावत होता. मनाचा थरकाप उडवत होता.
दूरवर दिसणाऱ्या त्या मंदिरा जवळून तो आवाज येत होता. असं आम्ही गृहीत धरलं अन इथून त्वरित निघायला हवं म्हणून …पटापटा पाऊलं उचलू लागलो अन कोंढवळ गावाच्या दिशेने भीमशंकर च्या वाटेने त्या घनदाट निर्जन जंगलातून पुढे पुढे चालू लागलो.
काही तासानंतर आम्ही पठारावर सुखरूप पोहोचलो. इथून पुढे कोंढवळ गाव काहीच अंतरावर होतं आम्ही जात असता एक ५-६ जणांचा पुण्याचा ग्रुप आम्हाला दिसला.
सगळी वयस्कर मंडळी होती. रात्री मुक्कामी होती. सिद्धगडला आता कोंढवळ गावात मुक्कामी जाणार होती.आम्ही हि त्याच मार्गी असल्यामुळे आम्ही त्यांच्यात मिसळून गेलो. एकमेकांची ओळख झाली अन बोलत बोलत चालत चालत आम्ही कोंढवळ गावात पोहोचलो. ते साधारण सायंकाळी ६:३० वाजता, रस्त्याततून बोलत बोलत त्या ग्रुप मधील काकांनी (पाउने तीनशे किल्ले सर केलेलं काका ) नाव आठवत नाही आता, पण त्याच्याकडून आम्हाला सर्व हकीकत कळली. जी त्या भयग्रस्त आवाजाशी निगडीत होती.
घडलं होत काय, तर गावातील सारी पुरुष मंडळी त्या मंदिराजवळ ( गावापासून जरा दूर असलेल्या मंदिरापाशी )एकत्र जमली होती. ती शिकारी साठी. शिकार जाळ्यात फासण्यासाठी आणि त्यासाठी ते असे चित्र विचित्र आवाज काढत अन किंकाळत होते.
पण ते माहित नसल्यामुळे आमचा मात्र त्या निर्जन स्थळी भर जंगलात मनाचा थरकाप उडाला होता.
तर अशी हि गोष्ट. खरी खुरी जी आमच्या ट्रेक दरम्यान घडली होती.
आणि अशा त्या क्षणांमुळे आमचा हा ट्रेक यादगार ठरला होता नि आहे .तसं अजून बऱ्याच आठवणी बाकी आहेत. ते तुम्हाला मी नंतर कधी सांगेन .
धन्यवाद …!!!!!
संकेत य पाटेकर
- Trekking & Hikking
- Camera’s & Accessories
- Antique Home Decor Products
- Book store