सिग्नल ( Signal)

इथे साईबाबा मंदिर कुठे आहे ओ ?
माझी दुचाकी रस्त्याकडेला घेत, तिथे उभ्या असलेल्या एका गृहस्थाला मी विचारलं.
त्याने माझ्याकडे पाहून, गोंधळलेल्या मनस्थितीसारखं ..अ sssअsss करत, हे काय पुढे..

सिग्नल क्रॉस केलं कि तिथेच..

अच्छा.. ठीक आहे. मी थँक्स असं म्हणायला जावंच तर त्याने आपला सूर पुन्हा ओढला.
नीट जा..सिग्नल क्रॉस करताना..गाड्या बघा,

थांबा पहा..आणि मग जा. मी आपलं सभ्यतेने मान डोलावली.
स्वतःशीच म्हटलं, आजवर असं कुणी कधी भेटलं नसेल, म्हणजे पत्ता विचारल्यावर, सिग्नल सांभाळून क्रॉस करा, असं म्हणणार,ते हि एकदा नाही हो, दोन तीन वेळा पाठोपाठ, स्लो मोशन चित्रफीत सारखं..

थांबा, पहा आणि जा… हसू खरं तर आवरत न्हवतं तेंव्हा, हा माणूस तेच तेच का पुन्हा पुहा बोलतोय. माझ्या चेहऱ्यावर अडाणीपणाचं लेबल लावलंय कि मी पहिल्यांदाच गाडी चालवतोय असं त्याला वाटलं असावं ?
मी क्षणभर विचारात गढल्यासारखा ? तोच त्याचा स्वर पुन्हा कानी दणाणला.


थांबा पहा आणि जा.. माझ्या सोबत असलेली ‘बहिणाबाई’ तीला सुद्धा आता हसू आवरेनासं झालं. मागच्या मागे, ती हि खळखळून हसू लागली.
शेवटी हो हो म्हणत मी हि.. तिथून धूम ठोकली. दोघेही हास्यात आकंठ डुबलो. तो पत्ता मिळेपर्यंत.

खरी गंमत पुढे अशी आहे कि, ते मंदिर येईपर्यंत ‘सिग्नल’ हा कुठेच लागला नाही.
आणि तो असा का बोलला ? ह्याचा हि उलगडा अजून झालेला नाही.

– प्रवासातल्या गोष्टी

– संकेत पाटेकर

 

 

https://youtu.be/bVRB2Yu_Vps

Leave a Comment

Your email address will not be published.