”साद – प्रतिसाद”

”साद – प्रतिसाद”

नाते संबंधात अधिक जवळीकता आणणारे हे दोन शब्द.
नात्यातला गोडवा जशाचा तसा ठेवणारे हे दोन शब्द. खूप मोल आहे ह्या दोन शब्दांना.

आपल्या सादेला जोपर्यंत समोरच्याचा प्रतिसाद मिळत राहतो. तोपर्यंत सर्व काही ठीक असतं. पण समोरून प्रतिसाद मिळनच बंद झालं तर साद देण्याचा उपयोग तरी काय ?
मन निराशेच्या छायेखाली अशा वेळी वाहतं, वाहत राहतं अन मग नात्यातली ती अतूट गाठ हळू हळू सैल होऊ लागते.

एखाद्या इको पोईन्ट असेल तर तिथे आपण गळा काढून एखादी हाक मारतो. जोरात ओरडतो कुणाच्या तरी नावाने किंवा कसेही पण ओरडतो, का ? तर आपलाच ध्वनी ..प्रतीध्वनिच्या स्वरूपात ..आपल्यास पुन्हा येऊन मिळतो . तेंव्हा आनंदाला सीमा उरत नाही आपण अधिक उत्साहाने , आनंदाने पुन्हा पुन्हा साद घालतो.
नात्यात सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्ही नात्यातील कोणत्याही व्यक्तीला ..तिला, तिच्या सादेला प्रतिसाद दिला नाही तर त्या व्यक्तीचा तुम्हावरील विश्वास हळू हळू कमी होत जाईल. आणि नात्यात एक दूरत्व निर्माण होईल .

नात्यात ..साद – प्रतिसाद , विश्वासाला खूप मोठी किंमत आहे …!!
त्यानेच नातंबहरतं ..नव्या उमेदीत , नव्या उत्साहात , सुख दुखाच्या खळखळत्या प्रवाहात..एकरूपाने , एकजुटीने !

– संकेत

Leave a Reply

Your email address will not be published.