सांधण दरी – माझा अनुभव

SANDHAAN VALLY – माझा अनुभव

दोन दिवसाचा सांधण व्हॅली प्रवास खरंच खूप भन्नाट झाला. अजून अंग दुखतंय ,
पूर्णतः त्या व्हॅली तून प्रवास झाला. एक रात्र त्या व्हॅली काढली. टपोर चांदण्यात. मन
कसं खुश झालं.नाहीतर आपलं त्या घरात कसलं काय दिसतंय चांदणं ?
काँक्रीटचा छत ते.. त्यात कुठे काय दिसणार ?
घराचं छत कसं चांदण्यांनी भरलेलं असावं. सुंदर काळे – निळे ढग, चांदो मामा, लुकलुकणारे तारे, सारं काही दिसावं त्या छता मधून..
शनिवारी सकाळी ठीक ८ वाजून १५ मिनिटांनी आमचा प्रवास सुरु झाला.
वर उंचउंच कडे, खाली लहान मोठाले दगड – मधेच कुठेतरी कमरे इतकं पाणी आणि त्या पाण्यातून डोक्यावर सॅक घेत पुढे पुढे मार्ग काढणारे आम्ही.सारं काही कसं निराळाच..मनाला ताजतवानं करणारं. हूरहुरी आणणारं.
त्या बेअर ग्रिल्स ची आठवण करून देणारं ..भन्नाट एकदम..

व्हॅली उतरताना आम्हास तीन रॉक पॅच उतरावे लागले. रोपच्या सहायाने त्यातल्या दुसरा रॉक पॅच उतरताना मी दगडावर आदळलो. (दत्ता ने सांगितलं होतं कुठेही पाय ठेवू नको सरळ पाय खाली टाक म्हणून कुठेही पाय न टेकवताच..सरळ धुडूम ) थोडी फार हाताला जखम करून घेतली. बस तितकंच..


व्हॅलीच ते सुंदर दृश्य मनाला मोहित करत होतं. निसर्ग हा निसर्ग खरंच किती सुंदर आहे. विविध अंगांनी तो फुललेला आहे. त्याचं रुपच किती अनोखं आहे. नुसतं पाहत राहावं..त्याकडे.. टकमक टकमक बस्स .. अप्सरा देखील त्याच्या पुढे मान झुकवेल आपली, असं त्याचं ते भव्य मनमोहक रूप मनाला एकदम फ्रेश करतं,
निसर्गाशी खरच जवळीक साधावी, त्याच्याशी बोलावं, त्याकडून शिकावं, खूप काही दडलंय त्यात,
सायंकाळी आम्ही दरी उतरलो आणि एका ठिकाणी थांबायचं म्हणजेच रात्र तिथे काढण्याच ठरवलं.
त्या प्रमाणे एक जागा निवडली आणि तिथे लाकडं वगैरे गोळा केली आणि प्रत्येकाच्या सॅक मधील जेवणाचं सामान बाहेर काढू लागलो. रात्रीचं जेवण जे बनवायचं होतं.
हळू हळू काळोख वाढू लागला तसं तसं थंडी हि वाढू लागली होती.

जेवणाचं सामान एकत्र करून जेवण हि तयार झालं आणि मग मस्त पैकी आमटी आणि भाताचं चवदार एक एक घास पोटात जावू लागला. खूपच चविष्ट जेवण केलं होतं.
पोट कसं तृप्त झालं.
जेवून खावून रात्री टपोर्या चांदण्या पाहण्यात मी हरवून गेलो आणि तिथेच झोपी हि गेलो.
पहाटे लवकरच जाग आली तेंव्हा सारे कसे शांत झोपले होते. थंड गार वारा सोडून, पाण्याचा खळखळाट आवाज (पुढे एक तलाव होता )सोडून कसलाच आवाज येत न्हवता.
मी थोडा वेळ उठून बसलो आणि ते nरात्रीच निसर्गाचं मोहक रूप डोळ्यात साठवू लागलो. असे हे क्षण क्वचितच येतात.
सकाळचं मस्तपैकी पाय घसरून दगडावर पुन्हा आपटलो आणि दुसर्या हाताला जखम करून घेतली (ह्या वेली ब्रश करण्याकरीता गेलो होतो आणि चुकून पाय ओलसर जागेतून घसरला.

कडक चहा – आणि स्वादिष्ट फोडणीचा भात खावून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.
आणि आमचा हा ट्रेक .यादगार ठरला.
संकेत य. पाटेकर
दि. १९.१२.११

पाण्यातली वाट …

चिडवताना …दीप्ती


रॅपल्लिंग करताना ..मी 

0 thoughts on “सांधण दरी – माझा अनुभव”

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »