सह्याद्री …सह्याद्री ..सह्याद्री !!!


सह्याद्री ..सह्याद्री ..सह्याद्री !!!
सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप ,
उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेकभिन्न कातळकडे …..तिथला सतत घुंगवत राहणारा…आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा …तो तिथला अलंकारित निसर्ग ….
सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज…
स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा ….
रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ….,
स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू …
त्यांचा तो रक्तरंजित इतिहास …
सह्याद्री म्ह्टलं कि आला कोकणकडा …ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकणकडा ….हरिश्चंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड
सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले …त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ……डोंगर दऱ्या …नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले …झाडे वेली…ती माती …तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .
असा हा ”सह्याद्री” आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ”निसर्ग”
मला नेहमीच वेडं लावतं .
संकेत य पाटेकर

३० जून २०१२

Leave a Reply

Your email address will not be published.