सह्याद्री आणि सह्याद्री !

सह्याद्री आणि सह्याद्री !
सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप,
उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेकभिन्न कातळकडे, तिथला सतत घुंगवत राहणारा, आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि, पक्षी पाखरांना डोलवणारा मनमुराद वारा, ते धुक्याचे दाट पांढरे ढग, त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा, तो तिथला अलंकारित निसर्ग..

सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले, आपले आदर्श ‘छत्रपती शिवाजी महाराज’
स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड, राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा..
रायगडावरील तो सुवर्ण क्षण, राज्यभिषेक सोहळा ती आठवण,
स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू …
त्यांचा तो रक्तरंजित इतिहास..

सह्याद्री म्ह्टलं कि आला कोकणकडा …ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकणकडा, हरिश्चंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड.

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले …त्यांचा इतिहास ..तो निसर्ग, डोंगर दऱ्या, नदी, ओढे, पक्षी पाखरे ..विविध रंगी..फुले …झाडे वेली, ती माती, तो तिथला दरवळीत सुगंध, तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .

असा हा ”सह्याद्री” आणि मनाला भुलवणारा  हा ”निसर्ग” मला नेहमीच वेडं लावतं.
 – संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.