समज- गैरसमज

गुड नाईट ..शुभ रात्री ..! बोलयला आत्ता कुठे सुरवात केली असतानाच त्याने अचानक एक्झिट घेतली. आणि तो तिच्या व्हाट्सअप रिप्लाय ची वाट बघू लागला. त्याला वाटलं , तिचं हि तेच रिप्लाय येईल . तसंच काहीस, केवळ शुभ रात्री म्हणून …इतर काहीही न बोलता , पुढे संवाद न वाढू देता, पण झालं ते उलटंच… तिचे धडाधड मेसेज येऊ लागले.
”लगेच शुभ रात्री रागावला आहेस का ? कि असे काही बोलले , कि आवडत नाही. ?
क्षणभर ते वाचून बरं हि वाटलं ( म्हणजे तिला हि वाटतं तर आपल्याशी बोलावेस .ह्या हेतूने… ) आणि तितकंच लागलं देखील मनाला…(नाहक त्रास दिला म्हणून ) पण त्यावर काय रिप्लाय द्यावं ते सुचत नव्हतं . कळत हि नव्हतं
शेवटी.. ‘असं काही नाही” इतकंच तिच्या त्या प्रश्नाला अधोरेखित करत त्यानं उत्तर धाडलं. आणि तिथून पुन्हा त्यावर प्रतिक्रिया येऊ लागली .
”ठीक आहे सॉरी , यापुढे काही बोलणार नाही ….”
वेदनेची ठिणगी आता पुन्हा एकदा उडाली. आपण उगाच तिला त्रास देत आहोत , ह्या भावनेने मन व्यथित होऊ लागलं. आणि ते कळवळतच पुन्हा हाका देऊ लागलं.
अगं.. नको काही गैर वगैरे मनात आणू .. सॉरी.. रागावलीस …? बोल ना …. मला चैन पडणार नाही ग .., रिप्लाय दे सॉरी……
व्हाट्सअप मेसेज चा रिप्लाय येत न्हवता. मनात धडधड वाढू लागली होती. रात्रीचे साडे बारा वाजले होते . त्या शांत एकप्रहारी रात्री, मन अधीकच वेडावून गेलं होतं. अस्वस्थ अवस्थेत ..
कित्येक दिवस….कित्येक दिवस झाले होते, फोन वर बोलणं न्हवतं. हवा तसा मोकळा संवाद न्हवता . व्हाट्सअप वर अधूनमधूनच कधीतरी जुजबी बोलणं व्हायचं . इतकंच काय ते .., बाकी फुल स्टॉप. पूर्णविराम अगदी… आपण आता पूर्णपणे दुर्लक्षिले जात आहोत…हि भावनाच कुठेतरी , मनास छळ करू लागली होती.
जिच्यावर आपलं मन जडलंय. जिच्यासाठी ते तळमळतंय …ओढवतंय, तिच्याकडून असे दुलक्षिले जाणे… ह्याचा फार मोठा परिणाम झाला होता मनावर आणि त्याचंच रूपांतर आज तिच्याशी असं तुटक बोलण्यात झालं होतं. आणि त्यातूनच सुरवातीची , एखाद दोन वाक्य काय ती वाचून, पुढे काही बोलण्याआधीच , शुभ रात्री असा मसेज त्याने धाडला होता . त्याचाच तिला राग आला होता. आणि तेच तिच्या मनाला अधिक लागलं होतं .
माणसाला काय हवं असतं बरं ह्या आयुष्याकडून ? आपल्या माणसाकडून ? आपलेपणा असलेला प्रेम ओलावाच ना , है ना ? सतत नाही , पण मनाला बांधून ठेवणारा , जोडून धरणारा हा संवाद. आणि सहवासाचे एखाद दोन क्षण, इतकंच ना ? दुर्भाग्यानं तेच मिळत नाही .
इतक्या उण्या पुऱ्या अपेक्षा हि पूर्ण होत नसल्या कि नातं डबघाईला येतं. तुटतं ते आतून आणि कण्हत कण्हत दूर होत जातं हळुवार, आयुष्याच्या एकाकी वाटेकडे झुकत … त्याचंही तेच झालं होतं. मनाचं पोखरणं झुरू झालेलं… आणि नकळत त्यातून , तिला हि ठेच पोचली होती. जे actually त्याला नको हवं होतं .
” सॉरी , यापुढे काही बोलणार नाही ….” तिच्या ह्या बोलण्यावर त्याने आपला मनाचा हळुवार काठ ठेवला. अगं … नको काही असं गैर वगैरे मनात आणू . रागावलीस …? बोल ना …. मला चैन पडणार नाही अगं .., रिप्लाय दे सॉरी……न , मागोमाग एक एक मेसेज तो धाडत गेला. बस्स , तिचं रिप्लाय येणं केवळ आता बाकी होतं . त्याचीच तो वाट बघत होता. तेवढ्यात….
” बोल, रागावले नाही . ” पण तू रागावला आहेस किंव्हा काय झाले ते माहित नाही . मनात काही ठेवू नकोस. बिंदास बोल. मला राग येणार नाही.
थोड्यावेळाने त्यावर तिची हि प्रतिक्रिया उमटली आणि वाहता मनमोकळा संवाद दोघात सुरु झाला. जे मनात होतं ते उघड उघडपणे बोलणं होंऊ लागलं. संवादाची मनमोकळी देवाणघेवाण होऊ लागली. स्वतःच्या प्रश्न संचासोबत , तिच्या आयुष्यातील घडामोडींची , परिस्थितीची , आणि तिच्या एकंदरीत झुलत्या अस्थिर मनाची हि जाण झाली. ज्याची पुसटशीही कल्पना न्हवती.
” मलाच आतल्या आत घुसमटायला होतंय रे , कुणाला ते सांगता हि येतं नाही नि बोलता हि येतं नाही , आणि मी ते माझ्या फेसवरून (चेहऱ्यावरून ) कधी जाणवू हि देत नाही . अशी आनंदी दिसत असले नेहमी तरीही , मनात कुठेशी ती ‘दुखरी कढ’ असते . सळणारी , वेदनादायी , मला माझंच ते माहित आहे.
खूप काही घडत रे , आपल्या अवतीभोवती , आपल्या घरात ..घरा बाहेर , ज्याचा त्रास होतो. त्याने कुठे लक्ष लागेनासं होतं बस्स… आज मी तुझ्यापुढे एवढी मोकळी झालेय…. जे आहे ते सगळं मांडलंय.
तू मनात असं काही वेडंवाकडं आणू नकोस. मी आहे तिचं आहे. तुझी …. बस्स थोडं ….
मना आत कोंडून ठेवलेल्या त्या असंख्य भावनांना तिने आज मोकळीक देऊ केली. नि आपलं मन थोडं हलकं फुलकं करून घेतलं. वर वर हास्यतेजानं पुलकित दिसलेल्या , ह्या चेहऱ्यामागची हि अज्ञात बाजू आज नेमकी कळून आली. उमगली त्याने त्याचं मन हि थोडं स्थिरावलं. विचार ध्यान झालं .
आपण नेहमी एकपात्रीच विचार करत असतो . मनाची दुसरी बाजू मात्र काळोख्यात राहते. त्याचा विचार होतं नाही. विचार झाला तरीही तो तर्क वितर्कने केवळ …त्याला सत्याचा आधार असा नसतो . प्रति संवादाची जोड अशी नसते. आणि म्हणून ते फसतं. आणि त्याचंच उलटवार होतो . आपल्यावर ..आपल्या ह्या मनावर ..आणि आपल्या हसऱ्या गोजिऱ्या ह्या नात्यावरही ..
थँक्स, छान वाटलं बोलून .. शुभ रात्री , बोलू उद्या … मनमोकळेपणाने बोलून झाल्यावर ….तिने शुभरात्रीची घडी मोडली. त्यावर त्याने हि आपलं प्रतिउउतर दिल.
मला हि खूप हलकं वाटलं …थँक्स, शुभ रात्री …
लॅब्यू ..xxxxxx लॅब्यू ..टू… हलक्या मोकळ्या स्माईल निशी रात्र पुढे , हळुवार सरत गेली. – संकेत पाटेकर २३.०१.२०१८

Leave a Comment

Your email address will not be published.