आठवतोय तो संवाद .. शेवटचा अवघा मिनिट …
तू म्हणाली होतीस… तुझ्या हळुवार पण काहीश्या भावमग्न  आवाजात   ..
”लिहत रहा म्हणून ..छान लिहितोस.. तू ”
मी हि म्हणालो होतो त्याच अदबीनं  ..बोलत रहा म्हणून …
आठवतंय ?
शेवटचे  शब्द ..तुझ्या माझ्या हृदयातले. त्या संवादातले .
आठवतंय का ?
खरं  तर बोलायचं होत मला , त्याही पुढे  …माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून .. सोबत रहा , बोलत रहा रे ,
पण नाही म्हणू शकलो. तो अधिकार मला असूनही न्हवताच.
हृदयास किती घाव पडत होते तेंव्हा …ठाऊक आहे ? 

एकमेकांजवळ येऊन , कित्येक स्वप्नं नजरेशी रेखाटली होती आपण.
‘मला फोटो वगैरे काढायला आवडत नाही हं… आपण लग्नामध्ये एकचं फोटो काढायचा…’
इथपासून .. कितीतरी गोष्टी ऐकवल्या होत्यास तू अन मनातून कितीसा हसलो होतो तेंव्हा  मी .
पण त्या स्वप्नांची  ती रेख ..धूसर होत गेली हळूहळू ..
हाताची एक पकड , स्वप्ना पूर्तीच्या आधीच मोकळी होऊ लागली. असतील काही कारण त्याची हि किंव्हा आहेत …
पण मन न्हवतं  मानत  रे …. घेतलेला तो हात …आपल्या हातून मोकळं करू देणं . 
माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील ते मी केले.  आपल्यातले बंध तसेच टिकावे म्हणून …
पण नाही सफल होता आले त्यात . बहुदा ..हेच नियतीला मान्य असावं .
आपल्या दोघांना एकत्र आणून वेडी स्वप्नं तना मनाशी जोडून …त्याने योग्य वेळी योग्य ती खेळी केली . 
काय बरं सांगायचं असेल ह्या नियतीला अश्या प्रसंगातून ह्या घटनातून ? 
हृदयात जागा करून पुन्हा असं बेघर करून सोडून देणं ? 
प्रेमाचा अर्थ मनाशी लगावून द्यायचा होता . कि वेदनेची दाहकता  ? असो …
जे झालं ते झालंच…
नातं मनातलं होत त्यामुळे ते मनातून तुटणं कदापि शक्य नाही .
ह्या आठवणींना मरण नाही. 
तुला ठाव आहे. ?
त्या संवादा नंतर , कित्येक दिवस मी वाट पाहत राहिलो..अगदी व्याकुळतेने ..भावविव्हळ  होत.
म्हटलं येईल तुझा फोन एकदा तरी  …नक्की येईल. 
पण तो आवाज,  त्या आवाजातला नाद पुन्हा कानी घुमलाच नाही.
मी लिहत राहिलो ..तुझ्या एक एक आठवणींना ..शब्दमुलामा देत.
तू पाहत होतीस..वाचत होतीस  …लाईक हि करत होतीस .
पण ते सगळं ह्या आभासी दुनियेत……….
प्रत्यक्ष बोलणं ..भेटणं …नाहीच पुन्हा…
मी मात्र लिहतोय अजूनही …  तुझ्यासाठी .
हृदया एक स्वप्नं सखी…
संकेत पाटेकर
 

Leave a Reply

Your email address will not be published.