शिकून सुद्धा अडाणी …ते अडाणीच

शिकून सुद्धा अडाणी …ते अडाणीच व्यवस्थित टापटीपपणा आणि सूट बुटात असणारी एखादी व्यक्ती ..घरात, ऑफिस मध्ये व्यवथित वागेल. पण घर बाहेर पडताच …. एखाद्या ना समज मुलासारखी …. अक्कल नासेलेली आपण इतकी पदवी घेतलेय शिकलोय ह्याच त्यांना काहीच मुल्य नाहि, खर तर लाज वाटायला हवी. आपण जे काही करतोय त्याची,  तुम्हाला वाटेल मी काय हे वायफळ बडबडतोय ……..काय लिहितोय, खर तर मित्र मंडळी … एक साधासाच विचार आहे . पण खरच शिस्तीची गरज आहे .

जाता येता रस्त्याने आपणास एक चित्र नक्कीच पाहायला मिळत असेलच.  एखादी व्यक्ती एखद्या दुकानातून काही खाद्य पदार्थ विकत घेते आणि त्याने पोट तृप्ती झाल्यानंतर त्यातून निर्माण झालेला केरकचरा, कागदाचा एखदा बोळा असो प्लास्टिक असो टरफलं असो वा इतर काही …आपल्या आसपास कुठे हि टाकून पसार होते.  ह्याउलट तंबाकूच्या पिच्कारया उडवण ..असे प्रकार हि सर्रास दिसतातच.

शिकून सुद्धा अडाणी …ते अडाणीच

बस मध्ये म्हणा ट्रेन मध्ये म्हणा रस्त्याने चालताना म्हणा  driving करत असतना म्हणा एखद्या ऐतिहासिक स्थळी म्हणा, ह्याना शिस्त नि नीती मुल्य ती नाहीच.

घरात ह्यांच्या स्वच्छता , टापटीपपणा. पण घरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी घाण करायची .

हे शोभत का ? हा प्रश्न स्वतःने स्वतःलाच विचारा ? रस्त्येन चालताना आपणच एका ठिकाणी कचरा करायचा …आणि तिथे कचर्याचा ढीग साचल्यावर मात्र दुसर्यांच्या नावावर बोंबा मारायची . हे असे प्रकार .. निदान शिकलेल्या माणसांनी तरी शिकल्या सारखं थोडं तरी वागा.

जिथे स्वच्छता असते, तिथले वातावरण हि छान,  मोकळ असत. मनाला ताजतवान करणार . देशात अनेक प्रश्न आहेत . पण सर्व प्रथम खरच मुल्यशिक्षणाची गरज आहे .

चला तर मग स्वच्छतेची शिस्त पाळू ……

– संकेत पाटेकर

१७.०८.२०१३

Leave a Comment

Your email address will not be published.