आज व्हेलेनटाईन डे…प्रेमाचा दिवस
प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस, मनातल्या भावना बोलून दाखवायचा हा दिवस.
खरं तर हा दिवस फक्त प्रियकर आणि प्रेयसी साठीच मर्यादित नाही आहे. आपण आपल्या आई- बाबांना , बहिण – भाऊ , आजी-आजोबा ह्यांना देखील आपल्या मनात त्यांच्या विषयी किती प्रेम आहे ते दाखवून देऊ शकता. मग ते एखाद गिफ्ट वगैरे देऊन असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारे असेल .
प्रेम हे जीवन आहे. जीवनातला एक अतिमहत्वाचा भाग. ते कोणाला मिळतं तर कोणाला नाही. ज्यांना प्रेम मिळतं…ते खरंच भाग्याशील.
आणि जे प्रेमावाचून वंचित राहतात…
जीवनात कितीही आपण उंच भरारी घेतली तरी माणूस हा प्रेमावाचून सुखी नाही राहू शकत. हे जीवन जगण्यासाठी प्रेम हे हवं. .मग ते बहिण – भावाचं असो , आई- वडलांच असो , आजी – आजोबांच असो , मित्र – मैत्रिणीच असो कोणाचंही असो..
मित्रहो..
प्रेमाने रहा , प्रेमाने जगा आणि प्रेम द्या, प्रेम घ्या .”खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” असं आपल्या साने गुरुजींनी म्हटलेलेच आहे.
संकेत य पाटेकर