‘व्हाय नॉट आय’

‘व्हाय नॉट आय’

किती सुंदर होती ती…! 
अगदी रोजच्या जगण्यातला साधेपणा तिच्या त्या सौन्दर्यातून ही खुलून येत होता..
क्षणभर मी तिच्याकडे पाहतच राहिलो. एकामागोमाग पडणाऱ्या तिच्या पाऊला कडे आणि कुठलीही न्यूनगंडता न बाळगणाऱ्या तिच्या स्मित चेहऱ्याकडे… 
रेल्वेचा तो जिना त्याच आणि तितक्याच सहजतेणे ती उतरत असताना..
मी ही तेंव्हा त्याच बाजूने..जिना उतरत होतो.
क्षणभर तेंव्हा वाटलं तिचा हात धरावा..आणि तिला सोबत करत हळुवार उतरावं..
पण नाही…
कुठेतरी हे विचार मी सरसकट फेकून दिले..
आणि पाठमोऱ्या जाणाऱ्या त्या आकृतीकडे मी सॅल्युट करून..उभा राहिलो..
नजर मिट्ट काळोख्याने मिटली असली तरी मनभर पसरलेल्या प्रकाशाची प्रेरित किरणं, तिला दिशा देत होती..
तिच्या आयुष्याच्या वाटेवर..
खरंच, काहीतरी करण्याची जिद्द आणि त्यासासाठी चाललेली धडपड , न तुटलेला बिथरलेला..आत्मविश्वास , आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवून देतो.. 
‘व्हाय नॉट आय’ ..
ह्या पुस्तकातून भेटलेल्या त्या ‘सिद्धी देसाईच्या’ संघर्षमय पण प्रेरित जीवनाची तेंव्हा प्रकर्षाने आठवण झाली.
– संकेत पाटेकर
29.03.2019

Leave a Reply

Your email address will not be published.