विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा‘ 

ऋतुरंग’ आयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ?
बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो. सदा अन सदा  …`वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर , त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत …त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा  निसर्ग …हि अथांग चराचर सृष्टी  आणिअभिमानाची पोलादी छाती फुगवून …ताठ मानेनं उभा असलेला हा  सह्याद्री ,

मनाला विट्ठलावणी आर्त अशी साद घालत राहतो.

त्याच्या ह्या  भक्तिओढीनंच  ह्या देहरूपी मनाची… मग अखंड पायपीट सुरु होते. कधी रुळलेल्या त्या पायवाटेतनं  तर कधी अनवट वाटा पायदळी घेत …आनंदाच्या स्वाधीन..आनंदी आंनदी होऊन जात ..

आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१ 

प्राचीन थळ घाट म्हणजेच आजचा कसारा घाट‘ त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्रंबकेश्वर मार्ग ‘ दृष्टीक्षेपात राखण्यासाठी,
थळ घाटाच्या समोरच मुख्य डोंगरा पासून विलगलेल्या डोंगरा कड्यावर ,  तटबुरुजाचा शेला चढवून…
स्वराज्याची कडी सांभाळणारा हा  एकेकाळचा बळरक्षक म्हणजेच 
बळवंतगड

( ‘शिलाहारांनी ह्याची निर्मिती केली’ असा उल्लेख ‘सदाशिव टेटविलकर’ ह्यांच्या ”दुर्गसंपदा ठाण्याची’ ह्या पुस्तकात मिळतो.
तसेच सुरत मोहिमेच्या पाऊलखुणा हि….हा किल्ला आपल्या उराशी जपून आहे, हे हि तितकंच महत्वाचं.. )

हाच बळवंतगड …
कधीकाळी हरहर महादेवच्या गर्जनेत गजबजुन गेला असेल.
तोरण फुलांनी आणि स्वस्तिकांनी सजला रंगला असेल .
मावळ्यांच्या गस्तीने दिन रात राबता राहिला असेल.
रयतेच्या सुख दुःखात आकंठ मिसळला असेल.
आनंद अश्रूत मोकळा झाला असेल.

ह्या अश्या बळवंतगडावर…
थळ घाटाच्या ह्या रक्षकावर  ‘दुर्गवीर आणि दुर्गसखा’ ह्या निस्वार्थ  भावनेने आणि निष्ठेने शिवकार्य करणाऱ्या , संस्थामार्फत ‘दसरा’ हा आनंदोस्तव , हा विजयदुर्गोत्सव संयुक्तपणे..उजळ मनाने आणि मोकळ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.

हे  भाग्य,  पुन्हा एकदा.. माझ्या वाटेल आलं.
मला नव्याने ते मिळालं.  (आणि ते मिळतंच रहावं ) ह्यातच सारं सौख्य आहे.
म्हणतात ना आनंदाला परिवार हवा असतो., सगेसोयरे हवे असतात .
तो परिवार इथे भेटला. एकत्रित मिसळला ,  रुळला आणि एकजूट हि झाला. इथल्या स्थानिकांना सोबत घेऊन, त्यांना विश्वासात  घेऊन , त्यांच्यात मिळून मिसळून ..सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्य मनाशी ठेवत आणि ती जपत. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ,

उरलेल्या पैश्यातून …

जि. प. विहिगाव-रेंज* ह्या शाळेसाठी…हवी असणारी ५०० लिटर ची टाकी, आणि गडावर फडकवण्यासाठी ६ फूट उंच असा भगवा ध्वज त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

‘सोनियाची दिनी सोनियाचे क्षण ‘

विजयदुर्गोत्साव खऱ्या अर्थानं असा आमुचा सार्थ झाला…

– संकेत पाटेकर

जि. प. शाळा. विहिगाव रेंज ..

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळ भेट द्या.   http://trekshitiz.com/marathi/Balwantgad-Trek-B-Alpha.html


HTC RE 16.0-Megapixel Digital Camera

  • Be ready to capture special moments with this HTC RE digital camera
  • Which allows 1-handed operation and features a Grip Sensor that turns the camera on automatically when it is picked up
  • The 16.0MP CMOS sensor delivers crisp

Leave a Reply

Your email address will not be published.