‘वाद’ हे होतंच असतात.. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी.

रागापेक्षा देवाने प्रत्येकाला समंजसपणा अधिक दिला असता तर मला वाटतं कित्येक नात्यांमधली जवळीकता नि त्यातली माधुर्यता कायम तशीच टवटवीत राहिली असती.
व्यक्ती व्यक्ती दुरावल्या नसत्या. नात्यातला सुगंधितपणा तसाच निखळपणे दरवळत राहिला असता.
पण हल्ली अस काही घडतं नाही . ऐकमेकांच कुणी ऐकूनच घेत नाही ? समजण्याइतपत माणसं आहेत तरी कुठे ? एक ऐकतो नि दुसरा संतापतो. मग दोघे हि एकेमेकांशी ऐकेनासे होतात.
हा वाद इथेच मिटत नाही हा ..,तो तसाच ज्वलंत राहतो. जोपर्यंत एकमेकांपासून जो तो दुरावत नाही.

पूर्वी एकत्रित कुटुंबीय पद्धत असे. आजही आहे, मी नाही अस म्हणत नाही. पण मोजण्या इतपतच असे काही कुटुंबीय असतील. बहुतेक जण हल्ली ह्या धावत्या पळत्या दुनियेत, एकमेकांपासून दूर असलेलंच पसंद करतो.

नात्यातली सुवासिकता हरवून बसतो. काही वेळा असं करणं भाग हि असतं. इथं मी घरातल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल बोलतोय हा, आई – बाबा – भाऊ बहिण , मोठा भाऊ – वाहिनी – जे कुणी घरात असतील.
वाद हे होतंच असतात हो , एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हवी. बस्स बाकी काही नाही.

– संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.