वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल

'भोरप्याचा ईमानी बल्लाळ'

ह्या अश्या धर्तीवर... एखाद इथलाच धागा पकडून, चौफेर नजरेच्या कमानीनं, मनाचं खुर उधळून, कल्पकतेचा जोरावर लिहलेली ही कथा..कादंबरी वाचायला घेतली की चैतन्य सळसळू लागतं. सृष्टीतला प्रत्येक घटक जणू धोंड्यारुपी आपल्यातूनच बोलायला सुरुवात करतो.

निशब्द शांतता -दिनेश काळे

सूर्य उगवतीला होता. अश्या ओळीने सुरवात झाली आणि निसर्गच्या नुसत्या त्या वर्णांनान हि सर्वांग अगदी मोहून गेलं. ह्या शब्दात देखील किती किमया असते न्हाई ? म्हणजे त्यांच्यातही ओढ लावण्याची अन आकर्षित करण्याची एक अमर्याद अशी शक्ती असते. जशी ह्या निसर्गात आहे. एकदा का ओढ लागली कि आपण त्यामागे पळत राहतो. तर असो, ग्रंथालयाच्या शांत आणि गहानीय वातावरणात आज एक वेगळ पुस्तक हाती आलं. ज्याचं नाव ‘निशब्द शांतात’ म्हटलं वाचू..

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?

हि पुस्तकं खरंच समृद्ध करतात आपल्याला आणि म्हटलं तर हे आयुष्यं हि पुरणार नाही इतकी उकृत्ष्ट, आणि रसिक साहित्य संपदा आपल्याला लाभलेली आहे. बस्स वेळ मिळेल तसं आपण वाचत जायचं.. आणि घडत जायचं..आपलं आपणच.. तुम्हाला देखील एखाद कुठलं पुस्तकं असंच आवडलं असेलच ना ? चला, सांगा तर मग .. तुमचं आवडतं ते पुस्तक कोणतं ? जे अजूनही मनाभोवती रिंगण घालून आहे.