वपु काळे – पुस्तकांच्या दुनियेत

वपु ८५

‘प्रिय व.पु., तुमची एकूण कथा वाचताना असं वाटतं, की तुम्ही गोष्ट सांगत आहात आणि आम्ही ती ‘ऐकतो’ आहोत. मराठी कथा-वाङ्‍मयाच्या प्रवासात कथेनं जी वेगवेगळी वळणं घेतली आहेत, ती सर्व तुमच्या कथांतून दिसतात. मराठी कथेच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची कथा थांबून, थोडं मागं पाहून, पुढं सरकली आहे. व. पु. , तुमची कथा नव्यांत नवी आणि जुन्यांत जुनी आहे. तिनं परंपरेला सोडलं नाही, की नवतेला अव्हेरलं नाही. तुमची कथा धबधब्याप्रमाणे वाहत नाही, समुद्राप्रमाणे अथांग वाटत नाही, नदीप्रमाणॆ किनार्‍यालगत सुपीकता देत नाही. ती झर्‍याप्रमाणे झुळझुळ वाहते, गुणगुणते. रसिकांवर मोहिनी घालते...’
- मधु जामकर

Buy Book

वपु काळे- पुस्तकांच्या दुनियेत

भूलभुलैया
भुलभुलैय्या

भुलभुलैय्या हा वपुं काळे यांच्या चमत्कृतीप्रधान कथांच्या फॅण्टसीजाचा संग्रह. गेल्या वीस वर्षात वपुंनी लिहिलेल्या निवडक अश्याचा फॅण्टसीजाचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य कालीन मध्यम वर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळेंच्या चमत्कृतीपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत यांची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही. याचे श्रेय या कथांना दिलेल्या 'फँटसी' च्या अवगुंठनात आहे. वपुं काळे यांच्या मिश्किल ,खोडकर, निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्रे आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साऱ्या व्यवहाराचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकांची जीवनावरची श्रद्धा काळात नकळत दृढ होते. जीवनावर त्यांचे प्रेम बसते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते? - शंकर सारडा

Buy Book

वपु काळे - पुस्तकांच्या दुनियेत

गोष्ट हातातली होती
गोष्ट हातातली होती

घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि मानवी जीवनातलं अव्यक्त ते व्यक्त होऊ लागलं..
पूर्व म्हणाली, "केवळ काटकोनात आपल्याला उभं केलंय म्हणून आपल्याला भिंत म्हणतात.
आपली माती एकच आहे.
अंतरंग आणि बहिरंग ह्यात फरक नाही. आपण कुणाचंही विभाजन करीत नाही. माणसांनी त्यांच्या सोयीसाठी खोल्या केल्या. आपण त्यांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत.
माणसामाणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधणीच्या. अहंकाराच्या विटांवर नम्रतेचं, निगर्वीपणाचं प्लॅस्टर. पक्कं बांधकाम. आपल्याला अहंकार नाही ह्याचाच अहंकार. आणि हे दर्शविण्यासाठी सोहळे !"
पश्चिम म्हणाली, "मला माणसामाणसांतले हे व्यवहार कळत नाहीत. अहंकार नात्यानात्यांत गैरसमज निर्माण करतो. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज निर्माण होण्याचं काहीच कारण नाही. मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे माणसं आर्किटेक्ट, इंजिनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजिनियर ठराविक ठिकाणी ओल का येते, हे सांगू शकणार नाही. कारण ते असतात भिंतीचे अश्रू !"

Buy Book

का रे भुललासी
का रे भुललासी

"का रे भुललासी' हा वपुंचा कथासंग्रह "वरलिया रंगा'चा भेद करून माणसाच्या खऱ्या रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. प्रसंग निराळे तसा मुखवटाही निराळा, त्यात माणूस आपले अंतरंग, सुख-दु:खे, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा, सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे परिस्थितीनुरूप घालावे लागतात तर लबाडपणाने घातलेले बुरखे वेगळेच असतात !
प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. आपण आपल्याच रंगांनी माणसं, प्रसंग रंगवू पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसऱ्यावर आपले विचार लादू पाहतो. हे ही एक प्रकारचे मुखवटेच की !
वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत.

Buy Book

काही खरं काही खोटं
काही खरं काही खोटं

कथा - कथा सुखाची... दु:खाची भेटीची... विरहाची वेदनेची... अश्रूची अश्रूमधल्या फुलाची उपकाराची... अपकाराची उद्‍वेगाची... आकांडतांडवाची मुकेपणाने सोसण्याची भुलण्याची... झुलण्याची मोहधुक्यात हरवण्याची सावध राहण्याची सावज होण्याची आयुष्य उधळण्याची कातडी बचावण्याची उजेडा... अंधाराची उगवतीच्या क्षितिजाची उदास सायंकाळची जगताना मरण्याची मरूनही उरण्याची कथा वपुंची तुमची आमची सगळ्यांची जीवनाचे पुस्तक उघडल्याची - दत्ता हलसगीकर

Buy Now

नवरा म्हणावा आपुला
नवरा म्हणावा आपुला

या तुमच्या आमच्या कथा. दैनंदिन जीवनातले ते कवडसे. यात मोठे संघर्ष नाहीत हीच त्यांची व्यथा.
मोठ्या आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तश्या प्रसंगी सावरणारेही भेटतात.
छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे !
माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो; पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला काळात नाही, सावरणंही समजत नाही ! नव्या उमेदीनं, मागं पाहत पाहत प्रवास चालू असतो ; ठेवावा लागतो. त्या वाटेवरच्या व्यथा ! तुमच्या आणि माझ्याशी !!!

Buy Now

वाचाल तर वाचाल ( पुस्तकांच्या दुनियेत )

‘भोरप्याचा ईमानी बल्लाळ’
निशब्द शांतता -दिनेश काळे

Click Here

वाचाल तर वाचाल ( पुस्तकांच्या दुनियेत )
Like..Share & Subscribe my channel

'वाचाल तर वाचाल' I पुस्तकांच्या दुनियेत I सत्र १ I ''भोरप्याचा ईमानी बल्लाळ' I

Click Here

Leave a Reply

Your email address will not be published.