लॉकडाऊन आणि मी

लॉकडाऊन आणि मी


लॉकडाऊन आणि मी

गावी येऊन..आता येत्या सप्टेंबर च्या 10 तारखेला..

मला 6 महिने पूर्ण होतील. किती 6 महिने ?

मी चक्क सहा महिने गावी आहे. हे मला अजूनही खरं वाटत नाही. म्हणजे इतके दिवस ? चक्क सहा महिने..? म्हणजे अर्ध वर्षच की,

इतकं मी कधी असा राहिलोच नाही. पण एवढं राहूनही

काल परवाच आल्यासारखंच वाटतय..

इथल्या हसऱ्या मुक्त निसर्गाने, प्रसन्नमय वातावरणाने मनावर मोहिनी घातलेय जणू,

पाऊलं म्हणूनच जड होत आहेत आता,

परतीचं नाव घेताना,

वेळ मात्र नुसतीच धावतेय…

तो दिवस ही आता जवळ येऊ लागलाय..

जाणं आहेच म्हणा, शहरांच्या उंच भीतीच्या त्या कोनाड्यात पुन्हा..

रोजच्या धावपळीत मिसळायला.

जे सध्या नको वाटतयं..

”प्रवासाचा प्रत्येक क्षण हा कुठे ना कुठे हृदयाशी कोरला जातो.

म्हणूनच परतीचे क्षण हे वियोगासारखे मनाला कधी कधी ओलांचिंब करून सोडतात. ”

माझंच हे वाक्य पुन्हा ओठाशी येतंय.Renewed Headphones

Shop for unboxed & refurbished headphones from top brands such as SennheiserPhilipsSonySkullcandy & more.
प्रवास ह फक्त काही जाण्या येण्याचा काळ नसतो.

एका ठिकाणी केलेला मुक्काम हा देखील एक प्रवासाचाच भाग..

A पासून B आणि B पासून पुन्हा A शी स्थिरावलेला…अनंत क्षणांच्या सोबतीने केलेला..
म्ह्णूनच सृष्टीच्या ह्या परिघात, निर्सगाच्या शांत कुशीत.. वाडीतल्या ह्या ठिकाणी इतके दिवस वाहिलेला हा प्रवास मला आता निघताना वियोगासारखा वाटतोय..मन हळवं करतोय,
एकूणच ७ वाड्यांचं मिळून असलेलं गाव, त्यात आमची एक वाडी,

त्यात शेताच्या वाटेकडे.. बांधाकडे जाताना कोपाऱ्याशी निमूट उभं असलेलं छोटंसं आमचं घर, घरासमोर असलेलं छोटेखानी अंगण..

त्याला,वेढा घालून असलेली सभोवतालची वृक्षराजी..

त्यावर चिमण्या-पाखरांची रोज ऐकू येणारी किलबिल गाणी, त्यांची न्हानी, छेडछानी..

हा देखवाच कित्ती सुंदर – आनंदी,

त्यात घराच्या उंबरठ्यातून हृदयाचा प्रांत काबीज करणारा हा अफाट बेलाग सहयाद्री..

नित्य नेमानं होणारं त्याचं दर्शन..ते ही विविधांगी..

अहा..! किती विलोभनीय…
त्याच्याच कुशीतून दिशा ह्या पूर्वसंचित होत आणि चैतन्याचा रम्य सोहळा सर्वत्र पसरे,

मनाभोवती हसरं गोंदणच जणू चिटकलं जाई..
उगवत्या क्षितिज छटा असो वा सांजवेळी उधळलेले बहुत रंग,

किंव्हा रात्रीची गडद शांतता..त्यात

आकंठ मिसळून जाण्याची सवयच झालेली एव्हाना..
कधी कधी तर मन फिरत फिरत तळ्याशी येई..

पाण्याच्या शांतलहरी आपल्या कवेत घेत जणू एकांतात कायमच गर्क असलेलं ते ‘ तळं ‘

म्हणजे सृष्टीचं ‘हसरं’ आणि ‘देखणं’ रूप.

ते नजरेत सामावून घेत असताना चेहऱ्यावर स्मित उजळत राही..

काठोकाठ भरलेलं तळ…

दमदाटी केल्यागत एका कोनाड्यात रुसून बसलेली, एखाद्या ठिपक्यासारखी दिसणारी विहीर,

मुक्त अंगाने सूर घेणारा पान कावळा ,ढंगाचे नाना विविध पुंजके, त्यांचे मानवी आणि दैवी आकार रूप हे चित्रच अफलातून…
पाऊस ही असाच,

कधी ताल धरणारा…कधी रिमझिम बरसणारा…

कधी टपोऱ्या थेंबा थेंबांनं पाना फांद्यावरून उंच उडी खेळणारा..कधी वाऱ्यासह बेहोश होऊन धुंदीत नाचणारा,

वेड लावी हे सारं.. Unboxed & Refurbished Mobiles

Shop for unboxed & refurbished mobiles from top brands such as OneplusSamsungMiNokia & more.

त्यातच पावलानजिकच असलेली भात शेती..घराच्या उंबरठ्यातून..एक एक पावलं टाकत..
बांधा बांधावरून चालत.. घेतल्या कष्टाचा (पहील्यांदाच केलेल्या शेतीचा) आढावा घेत हसत गुणगुणत जाणं,

म्हणजे रायगड ते रत्नागिरीचा फेरफटकाच असे,

संवादातून होणारं ..दोन हृदयी मनाचं ते मिलन..

मुक्त मोकळं…आणि तितकंच हसरं..

मन स्वच्छंदी फिरायचं असं..
देहाने जरी नसलो एकत्र तरी..

मनाचे पंख पसरत एकमेकांकडे..

उड्डाण घ्यायचो.. चालता बोलता..

हे सारं आता आठवणीत कैद राहील.

पुन्हा येईपर्यंत..

– संकेत पाटेकर
फोटो क्रेडिट : लक्ष्मण उर्फ बाळू दा…

 

Leave a Reply

Your email address will not be published.