” अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही…

 

” अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही. 

“आपल्याच व्यक्तीकडून ….आपल्याच स्वकियांकडून ”

हे लहाणपण एक बरं असतं.. एखादी गोष्ट नाही मिळाली तर निदान हट्ट तरी करता येतो.
आपल्या स्वकीयांसमोर…

त्यासाठी अश्रुंचा बांध फोडता येतो .रागाने हात पाय झटकता येतात.
घरभर गोंधळ घालता येतो.  हवा तसा आक्रोश हि करता येतो .
पण हवी असलेली ती गोष्ट मिळविता येते. कसे हि काहीही करून.
त्यात आपला आंनद जो सामावला असतो. आपल्याला जे हवं असत ते हवंच असतं …
बस्स आणि ते मिळवतो हि …

त्यावेळेस फारस कळत नसतं समजत नसतं उमगत नसतं . इतर मनाचा अंदाज घेता येत नसतो.
कुणा मनाला आपल्यामूळे किती कष्ट सोसावे लागत आहे .
किती त्रास सहन करावा लागत आहे ह्याचा हि विचार आपल्या मनाला शिवत नसतो .

आपल्याला जे हवं असतं ते बिन्धिक्तपणे आपण बोलून टाकतो .
इतर मनाचा विचार न करता . आणि ते आपलं हट्ट पुरवलं हि जातं. आपल्या मनाचा विचार करून ..
ते करावंच लागतं त्यांना…

इथे मोठ्यापणी मात्र तसं नसत. कारण अकलेचे अन समजुददारपणाचे नवे अंकुर आपल्या मनात फुललेले असतात. त्यामुळे इथे हट्ट करता येत नाही.
अश्रुंचा बांध फोडता येत नाही . रागाने हात पाय झटकता येत नाही.
हवा तसा आक्रोश हि करता येत नाही .मनातल्या मनातच कित्येक गोष्टी तश्याच दडून राहतात .
मनातल्या मनातच अश्रुंचा बांध आटुन जातो. शब्द निशब्द होवून जातात . विचारांच्या भाउक गर्दीत मन हरवून जातं.

कारण काळजी असते , थोडी भीती असते .. 
समोरील व्यक्तीची , तिच्या संवेदनशील मनाची . तिला होणारया त्रासाची.

त्यामुळे जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्या मनातच राहते.
त्याची पूर्तता होत नाही . काही वेळा …, काही वेळा मात्र होऊन जाते .

मोठेपण जे लाभलेलं असतं आपल्याला, अन म्हणून हवा तसा हट्ट करता येत नाही. 

आपल्याच व्यक्तीकडून ….आपल्याच स्वकियांकडून .. म्हणून लहाणपण एक बरं असतं.. नाही का ?

असाच लिहिता लिहिता..

मनातलं काही…

नातं तुझं माझं…

संकेत य पाटेकर

मराठी लेख | Marathi Lekh | Marathi Article

Leave a Comment

Your email address will not be published.