म्हणून बोलावं मनमोकळेपणाने..
मनात जे असेल ते बोलून टाकावं एकदाचं …मनात काही ठेवू नये. व्हायचा त्रास तो होऊ देss एकमेकांना,
जो काही व्हायचा तो एकदाच, पण त्याची पुन्हा पुन्हा उजळणी नको. तेच.. तेच अन तेच तेच…
मनाला तोच तोच विचार करण्यास भाग पाडून अस खिचपत पडण्यापेक्षा ..बोलावं..
मन मोकळेपणानं, त्यातून काहीतरी मार्ग निघेल. हव्या असलेल्या प्रश्नाच उत्तर तरी मिळेल.
पण असं एकटक शांत राहून .. एकमेकांशी न बोलताच …मनातल्या मनात प्रश्नांची जर उजळणी करत राहिलो. तर एक एक दिवस …जगण फार अवघड होउन जाईल.
अश्याने त्रासा शिवाय इतर काही गवसणार नाही. इतर कुठल्याच गोष्टीत मन रमणार नाही.
आहे ते प्रश्न सुटणार नाही. त्याच उत्तर मिळणार नाही. तो येऊ देsss एकदाचं …!
तो काही क्षणासाठीच असेल.
पण कदाचित प्रश्नाचं उत्तर मिळेल. पुढचं जीवन सुखरूप होईल.
आपलं मन हलक होईल.
म्हणून बोलावं मनमोकळेपणाने..
– संकेत य पाटेकर