‘मैत्री’

मैत्री   !

दंगात धुंद होऊन ‘दवगंधीत’ करणारी हि मैत्री…हास्याचा ‘गोफ’ हृदयाशी हळुवार झुलवणारी हि मैत्री ..

सह्याद्रीच्या कातळकोरीव प्रमाणे कधी कठोर, कधी सुमधुर वाणी ठरणारी हि मैत्री ..

मनाला ‘चिरतरुण’ करणारी, नवं हिरवशार पानातलं ‘जीवनमान’ होणारी हि मैत्री ..
सूर्याच्या ‘तेजाला’ हि ‘आवाहन’ देणारी हि मैत्री..
अथांग सागराच्या ‘विशालतेवढ़ी’ प्रेमाचं ‘जलस्रोत’ होणारी हि मैत्री..
क्षितीजाच्या रंगाइतकी आयुष्य ‘क्षितिजमान’ करणारी हि मैत्री..
अन मना- मनाने , अन आपलेपणाच्या स्नेह गोडीत जोडली गेलेली , विसावलेली हि लाडिक मैत्री ..
अहो, ह्या ‘मैत्रीला’ आणि आणि ह्या ‘प्रेमाला’ वयोमानाची कसलीच अट नाही..
आयुष्याच्या आपल्या प्रवाही मार्गे ती आपल्याला भेटत जाते..नवं नव्या रूपात ..नवं नव्या रंगनिशी नवं नव्या अंतरंगी गोष्टी घेऊनच…
– संकेत पाटेकर
 
 
Quotes आणि बरंच काही ..
Quotes आणि बरंच काही ..
Quotes आणि बरंच काही ..
Please Like ..Share & Subscribe my Channel

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..

Click Here

Leave a Reply

Your email address will not be published.