मृगगड ( Mrugagad )

मृगगड ( Mrugagad )

आजवर इतके ट्रेक केले. पण हा त्यात फारच निराळा ठरला.
तस पाहायला गेलो तर..प्रत्येक ट्रेक चा अनुभव हा वेगवेगळा आणि अविस्मरणीयच असतो.
आजचा आमचा हा ट्रेक हि तसाच काहीसा , पण जरा त्याहुनी वेगळा आणि अविस्मरणीय असा ठरला.
वाट चुकण्यात जो आनंद असतो ना..तो नेहमीच्याच रुळलेल्या वाटेने जाताना नाही मिळत.
एक वेगळी वाट अन ते धाडस नेहमीच अविस्मरणीय अन तुफानी ठरतं.

निसरड्या गवतातून आणि माखलेल्या चिखलातून..भर पावसात, पावसाच्या सरींचा मारा खात अन एकएक पावूल हळूच सावकाश टाकत, मनाचा समतोल सांभाळत.. ती उभी निसरडी आणि एक बाजूला खोल दरी असलेली चढणं हेच मोठ्ठ धाडस होतं. ते आम्ही पेललं. आणि माथ्याशी कसे बसे पोचलो.

पण वर गेलो आणि समोरच दृश्य पाहून अवाक झालो.
आमच्या समोर मृगगड चा माथा उभा ठाकलेला आणि अर्थात आम्ही चुकीच्या डोंगरावर चाल केली होती.
जिथून आता पुन्हा उतरणं हे नवं धाडसं होतं आमच्यासाठी , कारण तिन्ही बाजूला आ वासून असलेल्या त्या दऱ्या…
बूड टेकवत कसे बसे उतरलो आणि वाटा धुंडाळत शेवटी योग्य वाटेला लागलो.
जाताना वाटेत लागलेली गुहा , पुढे दगडातल्या पायऱ्या , वर माथ्याशी असलेलं पाण्याचं टाकं , सभोतालचं रम्य देखणा परिसर ह्याने मात्र मन प्रफुल्लित झालं. .

कसे गेलो :
ठाणे ते खोपली – (२ तास )
लोकल ट्रेन (ठाण्याहून )
पहाटे : ५:११ ते ७:००

खोपोली ते परळी (अर्धा ते पाऊन तास )
एसटी
सकाळी : ७:२० ते ८:१० ते ८:१५

परळी ते भेलीव ( अर्धा तास )
टमटम :दहा आसनी रिक्षा
सकाळी : ९:३५ ते १०:०५

भेलीव(गडाच्या पायथ्याच गाव ) ते गडमाथा
सकाळी १०:०५ ते दुपारी 1:३०
आमचा बरासचा वेळ वाया गेला चुकीच्या वाटेने गेल्यामुळे त्यामुळे इथे अधिक वेळ लागला.
अन्यथा १ तासात आपण गडाचा माथा गाठू शकतो.

गडाकडे जाणारी वाट:
गडाकडे जाणारी खरी वाट हि भेलीव गावाच्या थोड्या वर असलेल्या कातकरी वाडीतून जाते . हि वाट थेट आपणास एका घळी पर्यंत पोहचवते मग तिथून वर आलो कि समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात . त्या पायऱ्या चढत आपण गडावर प्रवेश करतो .

गडावर प्रवेस करत असताना आपणास थोडी फार तटबंदी दिसते .
आपण जिथून प्रवेश करतो तिथेच त्याच्या उजव्या हाताला महिशासुर्वार्दिनी च एक शिल्प आहे आणि मधेच एक तडा गेलेली शिवपिंड दिसते आणि त्याच्या बाजूला हाती डमरू आणि त्रिशूल असलेल एक शिल्प.
तिथून सरळ पुढे पुढे जात आपण दोन टाक्यां जवळ पोहोचतो. त्या दोन टाक्याच्या मधून थोडा पुढे आलो कि समोरील सुंदर परिसर न्याहाळता येतो .

-संकेत य.पाटेकर
२७.०८.२०१२

मृगगड ( Mrugagad ) आणि एकीकडे मोराडीचा सुळका…

मृगगड ( Mrugagad )
 

मृगगड ( Mrugagad )

मृगगड ( Mrugagad )

मृगगड ( Mrugagad )
आम्ही चौघे ….आणि पाठीमागे मोराडीचा सुळका…
 
मोराडीच्या सुळक्याकडे ……….लक्ष्मन आमचा लक्षा उर्फ मेन इंजिन..
मोराडीच्या सुळक्याकडे
डोंगर दरयांच विहिंगमय दृश्य..
 
डोंगर दरयांच विहिंगमय दृश्य
गडाकडे कूच करताना …मृग गडाचा map पाहताना…
 
गडाकडे कूच करताना
एका बाजूला खोल दरी ….आणि निसरड्या ओल्याचिंब गवतातून त्या मातीतून सावकाशपणे पाउल ठेवत खाली उतरताना …..
 
गडाकडे जाणारी वाट
गडाकडे जाणारी वाट..
 
गडाकडे जाणारी वाट

 गुहा..

 गुहा..
 
ह्या घळी तून वर गेल्यावर …समोरच दगडात खोदलेल्या पायऱ्या दिसू लागतात ..तिथूनच गडावर जाता येते. 
गडाच्या माथ्यावर नेणारया पायऱ्या…
गडाच्या माथ्यावर नेणारया पायऱ्या...
पायऱ्या चढत असताना  दगडात कोरलेले एक शिल्प दिसतं
दगडात कोरलेले एक शिल्प दिसतं
महिषासुर्वार्धिनी देवी.
 
महिषासुर्वार्धिनी देवी.
 
महिषासुर्वार्धिनी देवी ….शिवपिंड आणि एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 
 
महिषासुर्वार्धिनी देवी.
एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 
 
एका हाती डमरू अन त्रिशूल घेतलेलं शिल्प. 
पाण्याच दोन टाकं..
 
पाण्याच दोन टाकं..
 
समोरील दृश्य..
 
 
मृगगड

अंबा नदीच्या पात्रात ,…
 
अंबा नदीच्या पात्रात ,
 
अंबा नदीवरील अरुंद पूल…
 
अंबा नदीवरील अरुंद पूल.
 
अंबा नदीवरील अरुंद पूल..
अंबा नदीवरील अरुंद पूल.
मानखोरे (माणगाव ) येथून परळी करता टमटम मिळते ( भेलीव पासून काही अंतर पार केल्यावर माणगाव लागते )
 
मानखोरे (माणगाव ) येथून परळी करता टमटम मिळते
 
सकाळ वृत्त पत्रात आलेली मृगगडाची/ भेलीवचा किल्लाची माहिती. 
 
मृगगड ( Mrugagad )
 

Trekking & Hiking- Kharedibazar

Kharedibazar | Online Store |

  • Trekking & Hikking 
  • Camera’s & Accessories
  • Antique Home Decor Products 
  • Book store

Leave a Comment

Your email address will not be published.