मुंबईची जीवन वाहिनी

मुंबईची जीवन वाहिनी

कधी कधी एक विचार मनात येउन जातो कि येन गर्दीच्या वेळी मुंबईसारख्या ठिकाणी लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्या ज्या व्यक्तीमध्ये १५- २० मिनिटाच्या त्या अवधीचा  त्या प्रवासाचा , ‘ त्रास सहन करून घेण्याची बिलकुलच क्षमता ज्यांच्याकडे नसते.  त्या व्यक्ती त्यांच्या घरी,  त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या मित्रान सोबत कश्या वागत असतील बरे..?

प्रश्नच पडतो, पण त्या प्रश्नाला काही एक अर्थ नसतो. ज्याच्या त्याच्या जीवनाचा तो प्रश्न ..मला प्रश्न पडून काय तो उपयोग  ? पण असो,

सांगायचं तात्पर्य कि मुंबई ची हि लाखो लोकांची जीवनवाहिनी. आपली लोकल ट्रेन.. सर्वात मोठी आणि पहिली गोष्ट शिकवते ती सहनशीलता आणि मानवता धर्म.

काही लोकांचा अपवाद वगळता ह्याच दर्शन नित्य नेहमीच आपणास घडतं. पण ह्याच बरोबर अशा अनेकानेक गोष्टींच जीत जागतं दर्शन हि लोकल ट्रेन करून देते. पण त्यासाठी तशी डोळस वृत्ती हवी आणि संवेदनशील मन  आणि ते सर्वांकडेच असत नाही का..

मुंबईची जीवन वाहिनी

मनातले काही..

-संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.