मित्रहो,
मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर २०१० रोजी ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आलं होतं. ते ३ दिवस सतत होतं आणि ते तीनही दिवस मी तेथे उपस्थित होतो.
ते तीन हि दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या तीन दिवसात मला अनेक मान्यवर लेखकांना , नेत्यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहता आलं. यांचे विचार ऐकता आले.

त्यात प्रसिद्ध गीतकार ‘जगदीश खेबुडकर’, ‘विश्वास राव पाटील’, ‘प्रवीण दवणे’ व अशोक बागवे याचं कवी संमेलन ..तसेच अनेक मान्यवरांच भाषण प्रत्यक्ष ऐकता आले.
त्यातील न विसरणारं म्हणजे ‘जगदीश खेबुडकर’ यांची पानिपत लेखक ‘विश्वासराव पाटील’ यांनी घेतलेली त्यांची ती मुलाखत.
काय दाद दिली होती प्रेक्षकांनी, त्यांच्या त्या मुलाखतीला , एक तासाच वेळ होता मुलाखतीचा पण दोन अडीच तास झाले तरी, कोणीही प्रेक्षक आसनावरून उठण्यास तयार होईनात.
त्यांचा एक एक शब्द कानात गुंजत होता. त्याच्या एक एक शब्द लोक जीव लावून मनाच्या एकाग्रतेने ऐकत होते. मी सुद्धा
त्याचं एक वाक्य सांगतो. जे मुलाखतीच्या शेवटी त्यांनी सांगितलं.

कोणतेही काम करा. पण ते निष्ठेने. प्रामाणिकपणे, फलाची कसलीही अपेक्षा न ठेवता.
प्रसिद्धीसाठी काम करू नये.
आज ते नाही आहेत परंतु त्यांच्या सुंदर गीतांचा साठा आपल्यासोबत आहे.
मी खूप भाग्यवान आहे अशा महान व्यक्तीची मुलाखत मला प्रत्यक्ष ऐकता आली पाहता आली.

– संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.