मराठी लेख | Marathi Lekh – मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय.

” मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. ” मुंबई -पुणे -मुंबई चित्रपटातील स्वप्नील जोशी ने म्हटलेला हा डायलॉग अगदीच फ़ेमस झाला सर्वत्र . मित्रांच्या टोळक्यात म्हणा किंव्हा कट्ट्यावर वा कुठे हि चारचौघात किंव्हा आपल्याच घरी घ्या ना , घरातले कुणी वडील धारी मंडळी किंव्हा बहिण – भाऊ रागा रागाने कधी म्हणतोच …

” चिटकून रहा त्या मोबाईल ला ..दिवसभर कामधंदे सोडून “
” मोबाईल मधून पाहेर पडूच नकोस. अक्खा दिवस तो मोबाईल नि मोबाईल ….”
” फेकून दे तो मोबाईल आधी “

” काय वेड लागलंय ह्या मुलाला ह्या मोबाईलच “

” आग लाव त्याला ” …अशी भन्नाट वाक्य कानी पडतात . 🙂 😉 

सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत (आणि झोपेतही रात्री अपरात्री )मोबाईल आपली साथ काही सोडत नाही . इतक त्यान झपाटलंय .. एक दिवस काय एक क्षण देखील मोबाईल शिवाय राहणं हि कल्पना देखील मनास शिवत नाही .
एक वेळ आपल्या लाडूल्या प्रेयशिचि आठवण होणार नाही .
पण एक क्षण मोबईल नजरेआड झाला कि हृदयाचा ठोका चुकू लागतो. 🙂 🙂

सकाळी जाग येताच भिंतीवरल्या तटस्थ घड्याळाकडे न पाहता आपली नजर थेट मोबाईल मधल्या डिजीटल आकड्याकडे सर्वप्रथम वळते . अन मग हळूच बोटं Whatsapp वरून फेसबुक वर फिरकू लागतात .

नाही म्हटलं तरी एकवार Whatsapp ओपेन करून पाहिला जातो .
कुणाचे मेसेज असो वा नसो . मग पुढचा कार्यक्रमास सुरवात होते . पुढे नाश्ता करता करता पुन्हा एकदा बोटं मोबाईल वर फिरकू लागतात . अन घरातून ऑफिसला जाईपर्यंत तो काही आपली साथ सोडत नाही .

ऑफिस मध्ये हि कामच्या वेळेस …. मधेच टीव टीव करत , ओरडत तो आपला लक्ष वेधून घेतो .   संध्याकाळच्या वेळेस ..हि तेच ..बस मधून अथवा ट्रेन मधून जाता जाता कधी गाणी कधी Whatsapp कधी फेसबुक कधी फोटो शूट तर कधी गेम्स अश्या विविध बिन कामाच्या कार्यक्रमामध्ये तो आपल्याला अगदी गुंतवून ठेवतो .

हल्ली आपण Whatsapp वर असू तर थेट संवाद न साधता बरीच लोक Whatsapp वर द्वारे आपल्याशी संवाद साधतात . खर तर तो संवाद न्हवेच .

एखादा मित्रांचा घोळका बरेच दिवसाने एकत्रित जमला असेल .
अथवा एखादा नातेवाईक बरेच दिवसाने भेटला असेल तर त्याच्याशी बोलताना , त्याचं बोलण ऐकताना आपलं अधिकतर लक्ष आपल्या मोबाईलकडे झुकलेल असतं.
हाताची बोटं देखील त्यावेळेस मोबाईल वर हळूच फिरकत असतात . ते सार बघून अर्थातच मित्र चवताळून उठतो , अबे , ठेवून दे फोन ..

घर असो अथवा बाहेर मोबाईल काही साथ सोडत नाही . रात्री उशिरापर्यंत मग घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत का असो आपण मात्र जागे असतो नजर मोबईल वर स्थिर ठेवत . कारण Whatsapp अन फेसबुक सुरु असते . मग कधी Whatsapp वर स्टेट्स अपडेट करत असतो. तर कधी फोटो .

तर कधी नुसतंच आपली आपली लाडकी व्यक्ती online आहे का ते पाहण्यात आपण गर्क असतो अन नसेल तर लास्ट सीन पाहून फेसबुक आहेच लाईक अन comments साठी…. त्यानंतरच जर आठवण झालीच , फार उशीर झालंय, आता झोपायला हवं , तेंव्हा कुठे आपण त्याला आपल्या उशापाशी किंव्हा हाताला लागेल इतक्या जवळ ठेवून घेतो.

असा हा मोबाईल दिवस रात्र आपल्या जवळ असतो . म्हणूनच ” मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. ” आणि ते व्यसन मला हि जडलंय. तुम्हालाही जडलंय का ? 🙂

असंच लिहिता लिहिता …:)

संकेत य पाटेकर

0 thoughts on “मराठी लेख | Marathi Lekh – मोबाईल हि गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय.”

Leave a Comment

Your email address will not be published.